एखादं क्षणिक निमित्त शोधून तुम्ही वेळ काढून हसता का ? त्याचे फायदे वाचा.
सोनाली जे.
राग , लोभ , मोह , मद , मत्सर , आनंद हे माणसाचे षडरिपू आहेत.
या प्रत्येक भावना या परिस्थिती , स्वभाव , वेळ , अनुभव , स्थैर्य यानुसार बदलत असतात. कोणतीच भावना किंवा परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते. सगळ्या खरे सांगायचे तर क्षणिक च आहेत.
एखादं क्षणिक निमित्त शोधून तुम्ही वेळ काढून हसता का ?
आता हसणे आले म्हणजे आनंद ही भावना ही त्या सोबत आलीच ना ! Laughter therapy .. आयुष्यात खूप महत्वाची आणि गरजेची आहे. अनेक गोष्टींचे ताण तणाव , स्ट्रेस , निराशा – depression , उन्माद , किंवा दुःख विसरून पुढे जाण्याकरिता आशावाद निर्माण करणारे , उत्साह निर्माण करणारे हे हास्य. सगळ्यातून रिलॅक्स करणारे हे हास्य.
हो खरे तर बरेच लोक एखादं क्षणिक निमित्त शोधून वेळ काढून हसतात. हसण्याला पैसे पडत नाहीत. मुक्तपणे आणि मुफ्त .. डॉक्टरांच्या मते, मानसिक दृष्टया , हसण्याने ऊर्जा निर्माण होते.
माझ्या घरामागे कॉर्पोरेशन ची बाग आहे तिथे हास्य क्लब मध्ये येणारे तरुण आणि वृद्ध रोज वेगवेगळ्या पद्धतीने जे हसत असतात ते ऐकून आणि बघून ही मला स्वतः ला खूप हसू येते. त्यांचा तो हास्य फवारा ..ते तुषार मी खरेच क्षणभर सगळे विसरून मोकळेपणाने हसते.
सुरुवातीला मीच या लोकांना नावे ठेवत होते. काय हे लोक हसण्याचा प्रयत्न करतात. खोटे खोटे आहे हे सगळे. हे हसू म्हणजे खरेच मनातून येणारी आनंदाची भावना आहे. असे कुठे असते का.. पण आता मी या लोकांच्या येण्याची वाट बघत असते. प्रत्यक्षात बागेत जाणे शक्य नसते मला पण त्यांच्या हसण्यात सामील होण्याची मी संधी सोडत नाही.
यातून मध्यंतरी मी इतकी प्रेरणा घेतली की एक मानसशास्त्रीय सल्लगार म्हणून काम करत असताना प्रत्यक्षात मी स्वतः माझ्या आजारपणात एवढी निराश झाले होते की हे त्रास नकोत , हे आयुष्य ही नको . पण मी कशी हार मानणार .. ? मी लोकांना त्याच्या मनसिक त्रासातून बाहेर पडण्यास मदत करते . तर मीच त्यात अडकून कसे होईल .
या बागेतल्या हास्य क्लब मधून मला खूप प्रेरणा , ऊर्जा मिळत होती.
यातून आपण ही समाजा करिता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या लोकांच्या करिता हा उपाय करून बघितला तर ? असे मनात आले आणि मी दुसरे दिवशी पासून माझ्या सगळ्या व्हॉटसॲप ग्रुप वर morning laughter पाठवायला लागले. एखादी घटना , एखादा जोक पाठवू लागले. आणि मग जेव्हा त्या त्या ग्रुप वर आपल्या लोकांचे हसण्याचे जितके जास्तीत जास्त ईमोजी येत ना तेव्हा तेही मला हसवून जात.
एखादं क्षणिक निमित्त शोधून तुम्ही वेळ काढून हसता हे अनुभव खूप आनंदात ठेवत मला. बरेचवेळा हास्याचे एक कारण असते खरेच ते क्षण इतके महत्वाचे असतात. आणि खरेच तेव्हाचे जुने क्षण आठवून ही हसू येते. तर काही नवीन क्षण ही असेच हास्याचे निर्माण करावे लागतात. किंवा आपसूक होतात.
तर काही वेळेस आपल्याला कामाचा प्रचंड ताण असतो किंवा इतर व्यवहारिक , नात्यातले , आर्थिक , सामाजिक , आरोग्यविषयक इतके ताण असतात की त्यातून मन हलके होणे गरजेचे असते. अशावेळी आपण मनोरंजनाचे कार्यक्रम बघतो ..पण तेही हलके फुलके .. जसे मराठी मधले महाराष्ट्राची हास्य जत्रा , चला हवा येवू द्या , the great Indian laughter challenge , असे आपल्याला कायम हासू देणारे दर्जेदार कार्यक्रम आपण बघत असतो.
एकदा माझा खूप जवळचे दोन मित्र एका मित्राच्या घटस्फोटाचे दुःख हलके करण्याकरिता आणि थोडे तणावातून रिलॅक्स होण्या करिता आणि मैत्री दिन साजरा करण्यासाठी पिकनिक ला गेले. आणि खरेच दोघे तिकडे खूप मोकळेपणाने , जे वाटेल तसे दंगा , गप्पा बडबड , लहान मुलासारखे दंगा करत होते. हसत होते अक्षरशः गाडी चालवताना गाणी ऐकताना गाणी म्हणत ही होते आणि गाडीत बसून नृत्यावर ठेका ही..
आणि हे जेव्हा मला इकडे पाठवत होते व्हॉटसॲप वर तेव्हा मी प्रचंड हसत होते. आणि त्या हास्याची एक आठवण म्हणून मी मोकळेपणाने भरभरून हसताना तेव्हा चा माझा selfie काढला ..जो आजही बघताना मी माझ्या या मित्रांच्या दृढ मैत्री आणि लहानपणीच्या मैत्री सारख्या वेड्यासारख्या गमती जमती आठवणीत बरेचवेळा बघते ही आणि dp ही ठेवते.
एकदा Imagica water park ला आम्हीं गेलो होतो. मला पोहायला येत नसताना ही वॉटर स्पोर्ट्स खूप आवडतात म्हणून गेलों . एकदम उंचावरून घसरगुंडी जी डायरेक्ट पाण्यात गटांगळ्या खा .त्याक्षणी घाबरले पण त्या फार खोल पाणी नसलेल्या पाण्यातल्या गटांगळ्या एवढ्या आवडल्या आणि एवढी हसले की त्यानंतर पोहायला शिकले आणि आता त्या आठवणी काढून मुद्दाम
गटांगळ्या खाताना हसत सुटते.
एखादं क्षणिक निमित्त शोधून तुम्ही वेळ काढून हसता त्याचे फायदे वाचा. :
१. ऊर्जा निर्मिती : तुम्ही जेव्हा क्षणिक निमित्त काढून हसता तेव्हा तुमच्यात हसू येतेच पण सगळ्या सुखद भावना , आनंद , सुख निर्माण होते. Positive sensation आहे ते. मानसशास्त्रीय दृष्टया विचार करता cognitive – behavioral therapy आहे जी शारीरिक , मानसिक आणि सोशल relationship healthy बनविते.
Laughter therapy basically sirum levels cortisol, epinephrine levels decrease करते.
Depression एक प्रकारचा मानसिक रोग आहे. ज्यात मेंदू मधल्या neurotransmitter madhye बिघाड निर्माण होतो. जसे norepinephrine, dopamine, serotonin.
जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्याला एक अद्भुत अनुभूती मिळते, जी हसणे थांबल्यानंतरही बराच काळ टिकते. हसण्याने स्नायूंमधील तणाव संप्रेरक कमी करते. हसण्याने डोपामाइनची पातळी देखील वाढते, जे नैसर्गिकरित्या तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते. Laughter किंवा हसू हे स्ट्रेस आणि depression कमी करण्याकरिता रामबाण औषध आहे.ज्यामुळे तुमच्यात निराशा , ताण कमी होवून ऊर्जा निर्मिती होते.
२.रक्ताभिसरण : हसल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. कारण जेव्हा आपण मोकळेपणाने हसतो, तेव्हा तुलनेने जास्त ऑक्सिजन शरीरात पोहोचतो, त्यामुळे हृदयाचे पंपिंग चांगले होते. उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकार असलेल्या आणि होवू नये याची काळजी म्हणून ही तरुणांनी किंवा वृद्धांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 ते 2 मिनिटे हसले पाहिजे.
३. रागावर , negative emotions वर नियंत्रण: हसण्याने तणाव कमी होतो. राग आला असेल तरी हसण्याने क्षणात त्यावर नियंत्रण मिळविले जाते
एक प्रसिद्ध गाणे माहिती आहे आपल्याला अशोक सराफ यांचे. नाकावरच्या रागाला औषध काय ? जेणेकरून तो त्या लहान चिडलेल्या मुलीला त्या गाण्यातून हसवून , गमती जमती करत तिचा राग दूर करतो म्हणजे तिच्या रागावर नियंत्रण आणतो.
४. निद्रानाशाचा आजार दूर होतो : रात्री झोप येत नसेल किंवा झोपण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील तर झोपेचे औषध घेण्याऐवजी जीवनात हास्याचे औषध म्हणून वापर करणे सुरू करा. कारण हसण्याने शरीरात मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार होतो, जो आपल्याला शांत झोपायला मदत करतो.
५.रोगप्रतिकारक शक्ती सुधारते:
माझी एक मैत्रीण rheumatoid arthritis ने गेली दोन वर्ष त्रस्त .सगळ्या प्रकारची औषधे झाली. Alopathy , आयुर्वेदिक , कसली कसली तेले, होमिओपॅथी. आता alopathy आणि होमिओपॅथी ने थोडे फरक पडले आहेत. पण जेव्हा होमिओपॅथी ची तिची डॉक्टर मैत्रीण हिने सगळी case history घेतली तेव्हा सांगितले की basically arthritis म्हणजे immune system ही कमकुवत असणे. ती वाढवायची असेल तर सगळे स्ट्रेस , तणाव दूर ठेवणे गरजेचे आहेच परंतु ,
हसल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते, ज्यामुळे आपण सर्व प्रकारच्या रोगांशी लढण्यास सक्षम होतो. म्हणूनच, निरोगी आयुष्यासाठी, आपण आपल्या दिवसाची सुरुवात हसून करणे चांगले होईल. आणि खरेच त्यामुळे माझ्या मैत्रिणीला तेव्हा थोडा फरक पडला होता. पण परत तिने ते सोडले आणि परत तिचा रोग त्रास देवू लागला. म्हणून immune system चांगली करण्याकरिता , रोगपरतिकारकशक्ती वाढविण्याकरिता हासणे हे झक्कास उपाय आहे.
६. हृदय मजबूत होते: आणि आयुष्य वाढते : मोकळेपणाने हसल्याने हृदय अधिक चांगले कार्य करते. दररोज सकाळी मनमोकळेपणाने हसल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येते.
कर्करोगाच्या रुग्णांना ही हसण्याचा नक्कीच फायदा होतो. एक तर त्यांचे ते प्रचंड pain विसरून जाण्यासाठी आणि क्षणिक हास्यात मन रमविण्यासाठी फायदा होतो.
७.व्यक्तिमत्व सुधारते, आकर्षक दिसते : दररोज हसल्याने तुमची एक खास प्रतिमा तयार होते. तुम्हाला आकर्षक आणि मोहक दिसायचे असेल तर मनमोकळेपणाने हसायला सुरुवात करा. कारण जेव्हा तुम्ही मोकळेपणाने हसता तेव्हा तुमचे चेहऱ्याचे स्नायू अधिक सक्रियपणे काम करतात, ज्यामुळे चेहऱ्याभोवती रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि तुम्ही अधिक तरूण आणि आकर्षक दिसता.
८. आयुष्य वाढते. : हसणे ही सकारात्मक भावना आहे ज्यातून सकारात्मक संप्रेरके निर्माण होतात . आणि negative गोष्टी दूर करतात. त्यातून सकारात्मक भावनेमुळे आयुष्य वाढते.
आयुष्य सुंदर आहे. एखादं क्षणिक निमित्त शोधून तुम्ही वेळ काढून हसा आणि इतरांना ही हसवत रहा. आणि दीर्घकालीन निरोगी , निरामय जीवन जगा. आणि इतरांनाही जगायला मदत करा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

एकच नंबर अप्रतिम