Skip to content

एक लक्षात घ्या, साधं-सरळ-सोपं आयुष्य नियतीने कोणालाही दिलेलं नाही.

एक लक्षात घ्या, साधं-सरळ-सोपं आयुष्य नियतीने कोणालाही दिलेलं नाही.


काव्या धनंजय गगनग्रास


अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर

बहिणाबाई चौधरींच्या या ओळी आयुष्याबद्दलची खूप मोठी शिकवण देऊन जातात. आपलं हे आयुष्य एकप्रकारे आव्हानांच्या, दुःखांच्या, अडीअडचणीच्या चुल्ह्यावर तळपत असत. तापत असत. हा आव्हाहन रुपी अग्नी आपली परीक्षाच पाहत असतो. त्यातून आपण तावून, सुलाखून निघालो तर जशी चांगल्या तव्यावर भाजलेली भाकरी मस्त शिजते, गोड लागते तसा सुख आपल्या वाट्याला येत. ते गोड क्षण आपल्या वाट्याला येतात.

कोणाचही आयुष्य अगदी सरळ सोप नीट असत नाही. प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्याच्या त्याच्या पातळीवर व्यक्तीने हे सर्व कष्ट, चांगले वाईट क्षण अनुभवलेले असतातच. तेव्हा कुठे नंतर चांगले दिवस ती व्यक्ती पाहते. आपल्याला मात्र पाहताना फक्त चांगलं दिसत. आपण म्हणतो देखील, अरे यांना काय कमी आहे, चांगलं आरामात जगत आहेत. सर्व मिळालं आहे. पण त्यामगाचा संघर्ष आपण पाहिलेला नसतो. जो प्रत्येक व्यक्ती जी यशस्वी असते तिने केलेला असतो. कारण तो करण अपरिहार्य आहे. आणि तो वाट्याला येतोच. त्यातूनच आपण अधिक खंबीर आणि मजबूत होत असतो.

आपल्याला कितीही वाटलं की आयुष्य कसं छान गुडी गुडी असावं, त्रास विरहित असावं तरी अस होत नाही आणि अस होऊ ही नये. कारण मग अश्या आयुष्यात मजा काय?

अगदी आपल्या नेहमीच्या उदाहरणातून पण हे लक्षात येईल. जत्रे मध्ये जे पाळणे येतात, त्यातल्या अश्या पाळण्यात आपण बसायला पाहतो जो जास्तीत जास्त वळणदार, थ्रील देणारा असेल. ज्यात वेडीवाकडी वळणे जास्त असतील. त्यात बसायला आपल्याला अधिक मजा येते. कारण तो अनुभवच वेगळा असतो. प्रत्येक वळणाला हृदयाची वाढणारी धडधड आणि परत परत ती शांत होण हा अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. आयुष्य पण तसच आहे. इथे सुख मिळवायचं असेल तर दुःखाला पण समोर जावं लागत, कष्ट हे करावेच लागतात. हीच खरी अग्निपरीक्षा असते.

अनेक अनाथ मुलांच्या माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ. कित्येक मुलांना त्यांनी सांभाळलं, शिकवलं, त्यांना आधार दिला आणि त्या त्यांच्या माई झाल्या. पण एक साधी बाई ते माई होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. गरोदर असताना नवऱ्याने संशय घेऊन घराबाहेर काढलं, गोठ्यात मुलीचा जन्म झाला आणि तिची नाळ त्यांनाच काढावी लागली. स्मशानात राहणं, चीतेवरच खाण, या सर्व गोष्टी नंतर घडल्या.

पण यातूनच त्यांच्या आयुष्याला वळण मिळालं. त्या नेहमी आपल्या भाषणात म्हणायच्या, मी जेव्हा अनाथ झाले तेव्हा मला त्या मुलांचं दुःख समजलं. त्यांनी त्यांच्या या दुःखाला चांगलं नवीन वळण देऊन कित्येक मुलांचं आयुष्य निरपेक्ष मनाने घडवल आणि हे कार्य मायेमुळे अडखळू नये म्हणून स्वतःच्या मुलीला जाणीवपूर्वक दूर ठेवलं. हा त्याग खूप मोठा आहे.

डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे यांनी हेमालकसा येथे तिथल्या लोकांसाठी आपल अख्ख आयुष्य वाहून दिले ते प्रेरणा देणार आहे. त्यांना पण सुरुवातीला अनेक त्रासांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत आणि म्हणूनच तिथला दुर्गम भाग विकसित करण्यात त्यांना यश मिळालं. मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या थोर महिला सावित्रीबाई फुले यांना शेणीचा मार सहन करावा लागला होता. त्यांनी पण तो सहन केला पण आपलं ध्येय अर्धवट सोडल नाही.

म्हणूनच आज मुली शिक्षणासाठी वंचित नाही आहेत.त्यांनी जर साध्या सोप्या आयुष्याची अपेक्षा केली असती तर हे सर्व होण शक्यच नव्हत. अशी बरीच उदाहरण आपण ऐकली असतील, वाचली असतील. आपण स्वतःही या गोष्टींचा आपल्या आपल्या पातळीवर अनुभव घेतला असेल. पण नुसतं अनुभव घेऊन उपयोग नसतो तर त्यातून शिकणं महत्त्वाचं असत. हे शिकणं येणार कधी? जेव्हा आपण हे मान्य करणार की या सर्व गोष्टी आपल्याला आतून अधिक भक्कम करत आहेत, पुढच्या गोष्टीसाठी तयार करत आहेत. तर आपली त्या अनुभवाकडे पहायची दृष्टी बदलेल आणि आपण त्यापासून पळ न काढता त्याचा सामना करू. ही दृष्टी जेवढी चांगली विकसित होईल तितक आपण येणाऱ्या गोष्टींना तयार असू.

कितीही मोठं वादळ आलं तरी झाडाची मुळ जर घट्ट असतील तर ते तग धरून राहते. तसच आपली दृष्टी रूप मुल जर घट्ट असतील, आपण सरळ सोप्या आयुष्याचा अट्टाहास न करता जर अडचणींवर मात करत पुढे गेलो तर आयुष्यात तग धरू शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “एक लक्षात घ्या, साधं-सरळ-सोपं आयुष्य नियतीने कोणालाही दिलेलं नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!