Skip to content

एका नवीन आयुष्याची सुरुवात करताना काही गोष्टींचे भान असू द्या…!!

एका नवीन आयुष्याची सुरुवात करताना काही गोष्टींचे भान असू द्या…!!


आकांक्षा किरणराव आळणे,

लातूर


आयुष्यात वेगवेगळे नवीन वळण येतात,आपल्यात काहीतरी बदल करून जातात, चांगले वाईट अनुभव देऊन जातात कधी चांगल्या अनुभवांनी मन अगदी ‘सातवे आसमान पर’ अशी अवस्था असते तर कधी वाईट आठवणी मन हेलावून टाकतात पण हेच आहे आयुष्याचं चक्र चढ-उतार निश्चित येणारच;सुख दुःख हे त्यांचा वेळ साधणारच.

पण खचून न जाता आयुष्याचा एका पॉईंटला तरी नवीन सुरुवात ही करावीच लागते मागचे वाईट अनुभव,वाईट नाते सोडून पुढे तर जावेच लागते उदाहरणार्थ एखाद्या कंपनीतल्या employee ला नेहमी नेहमी वाईट अनुभव म्हणजे insult होणे त्याच particular व्यक्तीला टार्गेट करणे मीटिंगमध्ये humiliate करणे असे होत असेल तर कुठेतरी या गोष्टीवर योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आलेली असते.

एखाद्या नाते जे अगोदर गोड होते समजुतदारपणाने भरलेले होते प्रेमाने ओतप्रोत होते पण आता हिंसक वळण घेतले आहेत शाब्दिक हल्ले हे सामान्यता बोलण्याचे माध्यम झाले असेल तर निर्विवाद पणे हे एक टॉक्सिक रेलेशनशिप आहे यातून बाहेर पडण्याचा विचार करायलाच हवा आणि नवीन सुरुवात ही करायलाच हवी.

नवीन सुरुवात करताना मात्र जुने lessons विसरून चालणार नाही जे काही लेसन आपल्याला मिळाले ते लक्षात घेऊन नवीन कारकीर्द आपण सुरू करायला पाहिजे नवीन वर्ष सुरू होतानाच बघा ना आपण किती विचार करतो प्लान्स करतो असे करू तसे करू म्हणून मग इथे तर पूर्ण आयुश्याची नवीन सुरुवात करायची आहे आपण तर खूपच सतर्क आणि जागरूक असायला पाहिजे.

कारण ही आयुष्याची नवीन सुरुवात नवीन दिशा आपल्याला भरभरून आनंद आणि उत्साह तेवत ठेवणारी असावी यासाठी आपण पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे.

सर्वात महत्त्वाचे आपण आपले आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपण कुठे चुकलो कारण अनेकदा गोष्टी विकोपाला जाण्यासाठी आपण त्या गोष्टींना कसे react करतो,कशी reaction देतो हे महत्त्वपूर्ण ठरते शक्यतोवर संयमाने गोष्टी हँडल करणे आपण शिकायला पाहिजे.नवीन गोष्टींची सुरुवात करत असताना clarity खूप महत्त्वाची आहे आपण आपल्या goals बद्दल क्लिअर आणि प्रामाणिक असले पाहिजे एखादा निर्णय घेताना तो निर्णय आपल्याला ध्येयपूर्तीकडे नेणारा आहे की आपली फसवणूक करणारा ठरू शकतो हे आपल्याला ओळखता आले पाहिजे.

जर business हा पार्टनरशिप मध्ये सुरू करण्याचा विचार असेल किंवा नवीन नात्यात प्रवेश करण्याचा विचार असेल तर समोरच्या व्यक्तीला पारखता आले पाहिजे खरंच समोरची व्यक्ती विश्वास पात्र आहे का??आर्थिक व्यवहार केल्यास काही फसवणूक होईल का?? कामाचे कमिटमेंट,वेळा ह्या पाळला जातील का आपल्याला अंधारात ठेवून व्यवहारात काही फेरफार केला जाईल का हे प्राथमिक प्रश्न स्वतःला विचारुन त्यावर योग्य तो आपल्या अनुभवाचा आधार घेऊन सखोल विचार करून निर्णय घ्यावा.

मित्रांनो अनेकदा आपण गोष्टींना खूप लाईटली घेतो. नंतर ह्याच गोष्टी आपल्याला खूप महागात पडतात. असे नका होऊ देऊ. आयुष्य लहान आहे,त्यात संघर्षाचा काळ हा खूप मोठा आहे. आर्थिक संघर्ष तर नाही पण भावनिक संघर्ष टाळता येऊ शकतात.

कारण भावनिक संघर्ष हे जास्तीत जास्त वेळ आपल्या हातात असतात आपण त्यांना कसे respond करतो ह्यावर पुढचे सर्व अवलंबून असते.
होता होईस्तोवर आपण प्रयत्न करुया ना मित्रांनो की चुकाच कमी व्हाव्या आपल्या हातून.एक साधी सरळ मार्गी लाईफ जगायला काय हरकत आहे..???

गोष्टी सिम्पल ठेवा. ध्येय निश्चित असले की मार्ग दिसू लागतात आणि अनेक मार्ग उपलब्ध असतात त्यातला आपल्याला कोणता मार्ग योग्य आणि ध्येय प्राप्ती कडे नेणारा आहे हे ठरवता आले पाहिजे मग यश हे आपलेच असते एखाद्या नात्या बाबतीत असो किंवा नोकरीबाबतीत….!!!

“खुद पे भरोसा करना सीख,
खुद को आजमाना सिख,
दुनिया बडी खतरनाक है बनदे
तू लोगोको परखना सिख..!!
उनकी गलत इरादो को
तु झुठलाना सिख,
कामयाबी से तेरी तू
इन को जवाब देना सिख,
जजबातो के सहारे वो
कर लेंगे घर मन में तुम्हारे,
फिर षड्यंत्र कर सब हो
जायेंगे खिलाफ सारे,
इन सबको तू पहचानना सिख,
तू लोगोको परखना सिख..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!