Skip to content

एकमेकांवरचा विश्वास टिकविण्याच्या ६ टिप्स !

एकमेकांवरचा विश्वास टिकविण्याच्या ६ टिप्स !


मिनल वरपे


विश्वास किती साधा सरळ शब्द आहे.. कोणतंही नविन नात निर्माण करायचं असो नाहीतर असलेलं नातं दीर्घकाळ टिकवायचं असो तर त्याला गरज असते ती फक्त आणि फक्त विश्वासाची..

विश्वास निर्माण करायला खूप वेळ लागतो आणि तोच विश्वास तोडायला एक क्षण सुद्धा पुरेसा ठरतो. मग ते नात पती पत्नी च असो, मित्र मैत्रिणीच असो नाहीतर कामाच्या ठिकाणी असो.

पती पत्नी च नात फक्त त्यांच्यापूर्ती मर्यादित नसून संपूर्ण कुटुंब या नात्यावर आधारित असते. घरात आई वडील एकमेकांशी उत्तम वागत असतील तर त्या घरात मुलं सुद्धा आनंदी असतात आणि मोठ्या माणसांना सुद्धा कसली काळजी राहत नाही.

पण तेच जर या नात्यात विश्वास नसेल तर सतत वाद होत राहतात. घरातलं वातावरण पूर्ण बिघडते. विश्वास जर टिकवायचा असेल तर प्रत्येक नात्यात खालील बाबी गरजेच्या असतात.

१) पारदर्शकता.

पती पत्नीने एकमेकांपासून काहीच लपवू नये मग तर व्यवहार असो नाहीतर अजून काही. पती पत्नी नात म्हंटल की माझं तुझ अस नसून आपलं असते.आणि पती पत्नी हे दोन वेगवेगळे व्यक्ती जरी असले तरी ते एकच असतात. म्हणून वागताना सुद्धा एकमेकांचा विचार करूनच वागायचं.

२) संवाद.

संवाद हा तर पती पत्नीच्या नात्याचा पाया आहे. आज काय काय घडलं, कोण भेटलं फक्त या गोष्टी सांगणे म्हणजे संवाद नसतो तर एकमेकांच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना मोकळेपणाने सांगणे म्हणजेच संवाद. आणि या संवादामुळे आपण एकमेकांना चांगलं ओळखू लागतो.आणि आपल्यातला विश्वास वाढतो.

३) संशय येईल अस वागू नये.

पती पत्नी च नात हे पूर्णपणे पारदर्शक असल पाहिजे. एकमेकांना न सांगता आपण काही वागत असू आपलं काही secret ठेवत असू तर अशावेळी संशयाला जगा निर्माण होते.आणि विश्वास कमी पडतो. उदा. कोणाचे फोन आले तर गुपचूप बोलणे, chatting delete करणे या सारख्या चुका करून नात कमजोर होते.

४) खोटं बोलण्याची चूक करू नये.

बहुतेक वेळा आपल्या जोडीदाराला जे आवडत नाही अशा गोष्टी आपण करतो आणि त्या गोष्टी त्याला कळू नये म्हणून भीतीने खोटं बोलतो.पण कधी अशी वेळ येते की आपण न सांगता त्याला ती गोष्ट दुसरीकडून कळते आणि मग त्याचा आपल्यावर विश्वास राहत नाही.

५) आवडत नसलेल्या गोष्टी टाळाव्यात.

आपल्या जोडीदाराला ज्या गोष्टी आवडत नसतील आणि खरचं त्या गोष्टी चुकीच्या असतील तर नक्कीच त्या गोष्टी, ते वागणं टाळावं. काय चांगलं आणि काय वाईट याचा सारासार विचार करून वागल तर उत्तमच. आणि जर मतभेद होत असतील तर एकमेकांना समजून घेणं कायम उत्तमच.

६) वागणूक.

पती असो वा पत्नी दोघांनी सुद्धा फक्त एकमेकांसोबत च नाही तर कोणासोबत हि अस वागावं की त्यांचा एकमेकांवरील विश्वास कुठेच कमी होणार नाही. एकमेकांपासून कितीही दूर राहिलो, कोणी कितीही वाईट सांगितलं तरी इतका विश्वास असला पाहिजे की तो विश्वास कुठेच डगमगनार नाही.आणि असा विश्वास हा आपल्या वागण्या बोलण्यातून जाणवला पाहिजे.

७) मोकळेपणाने जगू द्या.

मला हे आवडत नाही म्हणून ते करू नकोस, मला अस वागलेल आवडत नाही म्हणून तस वागू नको अशा मत लादण्याचा सवयीमुळे जोडीदार कंटाळतो आणि काही गोष्टी न सांगता, लपवून करतो आणि मग गोष्टी लपवल्या की विश्वास कमी होतो.त्यापेक्षा मोकळेपणाने जगू द्यायचं.आपल्या मर्यादा आपल्याला माहीत असतील तर मोकळेपणा चा गैरफायदा कोणी घेणार नाही.

नवरा बायकोच नात हे जर घट्ट असेल आणि त्यामधे जर विश्वास नावाचा मजबूत पाया असेल तर संसार हा उत्तमच होणार.त्यामुळे एकमेकांना त्रास होईल आणि नात्यातला विश्वास कमी होऊन नात कमजोर होईल अस कधीच वागू नका.

विश्वास टिकवायचा असेल तर आपलं वागणं सुद्धा तेवढच खर असावं.खोटा विश्वास निर्माण करून एकमेकांना लपवून आणि अंधारात ठेवून आज जरी आपण आनंदी राहिलो तरी एक दिवस नक्कीच सत्य समोर येईल आणि त्याचा त्रास हा आपल्यालाच होईल म्हणून नात जिवंत ठेवायचं असेल तर नात्यातला विश्वास अबाधित ठेवा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एकमेकांवरचा विश्वास टिकविण्याच्या ६ टिप्स !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!