Skip to content

एकदातरी तुमच्या उज्वल भविष्यासाठी मोकळा श्वास घ्या……

एकदातरी तुमच्या उज्वल भविष्यासाठी मोकळा श्वास घ्या……


सौ. मयुरी महेंद्र महाजन

पुणे(चिंतामणी चौक)


कोरोना काळात लाॅकडाऊनची परिस्थिती सर्वांनीच अनुभवली, घरात राहणं खूप कठीण गेलं….तेव्हा आपल्याला आपण घेत असलेल्या मोकळ्या श्वासाची किंमत कळाली, आणि मग जेव्हा आपल्याला बाहेर जायला मिळाले,

तेव्हा आपल्यात किती ऊसाह जाणवला, आणि आता खरंच खूप बरं वाटते… मोकळ्या वेळेत…… याचा सुद्धा अनुभव घेतला असेलचं….

सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मोकळा श्वास आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे ….आता श्वास घेणे आणि मोकळा श्वास घेणे यात फरक काय ?

तर निम्म्याहून अधिक लोकांचे आपल्या श्वासांकडे लक्षच नसते, आता तुम्ही म्हणाल की मग ते जगतात कसं ? लक्ष नसणं म्हणजे श्‍वास घेणे आणि सोडणे ही नैसर्गिक क्रिया आहे, तुम्ही त्याकडे लक्ष नाही दिले तरी श्वास आत जाणारं आणि तसाचं बाहेरही,

मुळात आपले अस्तित्व या जगात टिकून आहे, ते फक्त आपल्या निरंतर चालणाऱ्या आपल्या श्वसन क्रियेमुळे , परंतु या अमूल्य गोष्टींकडे कधी-कधी नकळतचं आपले दुर्लक्ष होते, म्हणून मोकळा श्वास घेणे महत्त्वाचे आहे…..

बघा जेव्हा आपल्यावर कुणाचे दडपण नसते, दबाव नसतो, आपण अगदी मोकळेपणाने ,ती गोष्ट करत असतो, आणि त्यात आनंद अनुभवतो परंतु जेव्हा कोणी तरी आपल्याला दडपणाखाली दबावाखाली आणून एखादी गोष्ट करायला सांगत असेल, आपण ती मोकळेपणाने नाही करू शकतं, त्यामुळे त्यात तो खरा आनंद राहत नाही.

आज मानवाने जितकी प्रगती केली तितकेचं त्याचे जीवन धकाधकीचे, आणि समस्यांनी भरून गेलेय, पोटासाठी भाकरी, अंगावर अंगभर कपडे, आणि निवार्‍याला निवांत जागा….

यापलीकडे जाऊन माणसाच्या गरजा खूप वाढलेल्या आहेत, या जगाच्या स्पर्धेत चालणाऱ्या जीवघेण्या स्पर्धत, त्यात आपले आरोग्य, आपले शिक्षण, यासाठी होणारी आर्थिक ओढ-ताण माणसाचे जगणेचं असह्य करतेय.

या फक्त वरवरच्या समस्या झाल्या , यामध्येच व्यक्ती प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत आहे, आणि त्यात त्याने मोकळेपणाने श्वास घेणे म्हणजे आव्हानच वाटतेय….

पण काय फक्त जगण्याच्या वाटा… आपल्याला आपल्या उज्वल भविष्य घडवण यापासून थांबवू शकत नाही…. कारण प्रत्येकाच्या मनगटात ती ताकद आहेच …त्यात कुठलीही शंका नाही ….

नाही म्हटले तरी येणारी परिस्थिती कधीचं कुणाच्या हातात कधीचं नसते, पण त्या परिस्थितीत आपण जगायचे कसे हे मात्र सर्वस्वी आपल्याच हातात असते भविष्याची चिंता, नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणात प्रत्येकालाच असते ण काय आपण आपल्या येणाऱ्या त्या उज्वल भविष्यासाठी थोडं थांबून मोकळेपणाने श्वास घेतोय का ?

की फक्त आलो आयुष्यात मेलो, असं नाही .कासण जगणं मोकळेपणाने श्वास घेणे, आपल्या आयुष्याचे सप्तरंग उधळून लावणे…. स्वच्छंदीपणे आभाळात बागडणाऱ्या पक्ष्यांसारखे …..कधीही हातात न येणार्‍या त्या हवेच्या स्पर्शासारखे…. अगदीच झालं तर स्वतःच स्वतःच्या प्रेमात गहिवरून गेल्यासारखे …. जगलंचं पाहिजे हा सुंदर जन्म पुन्हा नाही,..

“”लाईफ सिर्फ चिजों के पीछे भागनें के लिए नहीं होती, जीने के लिए भी होतीं हैं, तो क्यु ना थोडा रुक के ईस पल को दिल खोल के जीयाँ जाँए….!””

पूर्वी लोकांच्या गरजा मर्यादित होत्या…त्याला एक सीमा होती…… बदलत जाणाऱ्या जगाबरोबर आपण स्वतःला बदललं पाहिजे, असं म्हणून आपण कितीतरी अनावश्यक गरजा याला…. आपण कधी प्राधान्य दिलं ….आपल्यालाच कळलं नाही……,

जेव्हा एखाद्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी खालावते, तेव्हा आपल्या सर्वांना चिंता वाटू लागते, का ? कारण आपण अन्न-पाण्यावाचून काही दिवस जगू शकतो परंतु श्वासाविना आपण अर्धा तास सुद्धा जगू शकत नाही… इतके त्याचे महत्त्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात आहे…..

उज्वल भविष्याची कल्पना प्रत्येक जण करतो ….पण आपण आपल्या आयुष्यात एकदा फक्त एकदा मोकळा श्वास घ्या ….आणि बघा तुम्ही स्वतःमध्ये एक नवीन चैतन्याचा अनुभव घ्याल….. प्रत्येक गोष्टीत तुम्ही तुमचे शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करणारं……

कोण आपल्यापुढे आहे ,कोण आपल्या मागे आहे, यामध्ये न अडगता, तुम्ही तुमच्या टाईमझोन मध्ये आहात ….निराशा हाताश्या सोडून द्या…. आपली वेळचं आपल्याला जगण्याचं शहाणपणं देत असते… त्यामुळे तिचे कायम ऋणी असावे,… चांगली असेल…. तर कोणाला तरी साथ द्यावी ,वाईट असेल तर धडा घ्यावा….. आपला जन्म छानपणे जगण्यासाठी झालेला आहे , ना की ऐकमेकांची ऊणीदुणी काढायला , स्वतः शी प्रामाणिक राहून वागायचं काहीच कमी पडत नाही,….

काही सलत असेल, बोचत असेल, मनात तर जवळच्या व्यक्तींजवळ नक्की बोला…. मोकळेपणाने जगा श्वास घ्या…. चला स्वतःला मोकळं करूया….. मोकळ्या श्वासांचा आनंद लुटुया …..

“अभी नही तो कभी नही मेरे दोस्त…..”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!