Skip to content

उघड्या स्त्री किंवा पुरुषांचे सतत स्वप्न का पडतात ??

उघड्या स्त्री किंवा पुरुषांचे सतत स्वप्न का पडतात ??


सोनाली जे.


माफ करा विषय थोडासा वेगळा आहे. यावर उघड उघड बोलणे आपल्या इकडे अजून मोकळेपणाने होत नाही…याच असे नाही आपल्या इकडे बऱ्याच गोष्टींची शंका मनात असेल तरी आपण विचारत नाही तसेच मनात दाबून टाकतो..

मागच्या लेखात स्वप्ने आणि त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध यात स्वप्नं का पडतात आणि त्याविषयी इतर ही माहिती घेतलीच आहे आपण..
मानसशास्त्र हे मानवी मन व वर्तन म्हणजे वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्त्र..मन म्हणले की भावना आल्या..विचार आले …आणि वर्तन ..

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ फ्राईड यांच्या मते स्वप्नांचे नाते हे मानवी मनातील सुप्त भावना ..hidden emotions, anxiety.. म्हणजे चिंता किंवा desires .. इच्छा किंवा cognitive state म्हणजे विचार..thinking..reasoning , remembering… आठवण , स्मृती , प्रोब्लेम solving याच्याशी संलग्न आहे.उदाहरण द्यायचे झाले तर भूक लागली असेल आणि गाढ झोपेत असू तर स्वप्नात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ दिसतील..किंवा अगदी सेक्स सारखी सुप्त भावना असेल तर स्वप्नात एखादी सुंदर तरुणी दिसेल किंवा आवडती स्त्री..
आता विचार करू की उघड्या स्त्री किंवा पुरुषांचे सतत स्वप्न का पडतात ??

१. स्वप्न म्हणजे आपल्या तीव्र इच्छा व्यक्त करणे…

आपल्या तीव्र इच्छा पूर्ण करण्याची भावनिक गरज म्हणून स्वप्न पडतात.. आता ज्या स्त्री किंवा पुरुषाच्या स्वप्नात उघड्या स्त्रिया किंवा पुरुष येतात त्याचे कारण त्यांच्या मनात कामवासना जागी झालेली असते. यात गैर काही नाही जसे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ फ्राईड यांच्या मते basic needs मध्ये अन्न..भूक लागली की आपण खातो..तहान लागली की पाणी पितो आणि एकदा खावून किंवा पाणी पिऊन समाधान होते का..तर ते तेवढ्यापुरते होते..

परंतु परत थोड्या वेळाने तहान लागते ..याचप्रमाणे स्त्री किंवा पुरुष यांच्यातील हार्मोन्स मुळे शारीरिक संबंध आणि त्याची गरज निर्माण होते..जेव्हा ही गरज प्रकर्षाने वाढते आणि काही कारणास्तव गरजपूर्ती होवू शकत नाही तेव्हा मात्र ती तीव्र इच्छा आपल्याला स्वप्नात दिसते..आणि मग तेव्हा स्वप्नात आपल्याला आवडणारे किंवा जोडीदार यांची विविध रूपे दिसतात..काही वेळेस स्वप्न दोष ही संभावना असते.
थोडक्यात मनातील सुप्त इच्छा स्वप्नातून बाहेर येत असतें.

२. स्वप्न म्हणजे संभाव्य धोक्याना सामोरे जाण्याचा सराव करणे..

भविष्यकालीन धोके आपल्याला माहिती असल्यास अशी स्वप्ने पडतात.. उदाहरण द्यायचे झाल्यास विद्यार्थी दशेत असताना परीक्षेला सामोरे जाताना ज्या विषयांचा अभ्यास झाला नाही त्या विषयांची भीती निर्माण होते.आणि परीक्षा हॉल मध्ये बसलो आहोत आणि काही येत नाही अशी स्वप्ने पडतात. यामागे कारण काय असते तर पेपर अवघड जाण्याची भीती.आणि परिणामी नापास होण्याची भीती.

तसेच आहे जेव्हा स्त्री किंवा पुरुष आपल्या जोडीदाराला योग्य प्रकारे शारीरिक सुख देवू शकत नसतील तर स्वप्नात ही त्यांच्यामध्ये ती एक भीती निर्माण झालेली असते..तेच विचार असतात…सुख, satisfaction देण्याकरिता असमर्थ आहोत ही भावना तीव्र असते…किंवा हे दोष कमी करण्याकरिता अजून काय प्रयत्न करावे यांचे विचार , भावना सुप्त मनात दडलेल्या असतात त्यामुळे ही अशा प्रकारची स्वप्ने पडतात. किंवा नवीन लग्न ठरले असेल तरी पुढे कसे होईल कसे जमेल याचे विचार , चिंता ही कारणे ही असतात.

३. विविध ॲप्स, you tube किंवा पोर्न व्हिडिओज..

आजकाल सर्व गोष्टी सहज उपलब्ध आहेत आणि वातावरण ही बदलत चालले आहे…सिनेमे यातून खूप गोष्टी उघडपणे दाखविल्या जातात, मित्र मैत्रिणीचे विचार , खूपच लहान वयात एकमेकांविषयी ओढ निर्माण होणे, किंवा खूप लहान वयात बघितल्या जाणे ..अर्थात वय हा फॅक्टर कुठेच नाही ..लहान असो मध्यम वयाचा असो किंवा वयस्क या सहज उपलब्ध असलेल्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी बघत असतात त्याचा परिणाम त्यांना उद्दिपित करत असतो आणि सतत तेच बघणे त्यातच राहणे तेच विचार यामुळे ते सतत उत्तेजीत होत असतात म्हणूनच स्वप्नात सुधा तसेच दिसते.

४. स्वप्न म्हणजे आठवणी एकत्र ठेवणे किंवा लक्षात ठेवणे.

जसे की पूर्वी एखादी सुंदर मुलगी ..मुलगा कायम बघत असतील..किंवा एखादा जोडीदारां सोबतचा शारीरिक सुखाचा अनुभव खूपच लक्षात राहणारा असेल तर तोच परत परत जेव्हा आठवतो तेव्हा ही अशा प्रकारची स्वप्ने पडतात.

५. एखादा कमी खातो कारण त्याची भूक ही कमी असते आणि पोटही लवकर भरते किंवा खाण्याची तेवढी आवड ही नसते याउलट एखादा खूप खात असतो कारण त्याला खाण्याची आवड ही खूप असते आणि पोटभर खात असतो..काही थोड्या थोड्या वेळाने भूक लागते म्हणून खात असतात..हेच चक्र शरीराच्या गरजा पूर्ण करण्याचेही असते..ज्यांची भूक जास्त ज्यांना आवड जास्त ते कायम त्याच विचारात राहतात किंवा थोडा रिकामा वेळ मिळाला की हेच विचार त्यामुळे सतत त्याच गोष्टीत राहिल्यामुळे ही स्वप्नात ही असे attract करणारे..विचार दृश्य दिसतात..

म्हणजेच काय की उघड्या स्त्री किंवा पुरुषांचे सतत स्वप्न पडतात याला वरच्या सारखी अनेक कारणे आहेत. अशी स्वप्ने सतत पडली किंवा कधी तरी जरी पडले तरी त्यात काही पाप नाही, चुकीचे नाही , गैर नाही..निसर्ग नियमानुसार हे बरोबरच आहे..फक्त लोकांना हे पटत नाही त्यामुळे लोक काय म्हणतील..मित्रांना सांगितले तर ते काय म्हणतील अशा शंका मनात निर्माण होतात..असे जर कधी वाटले की हे कोणाचं बरोबर बोलता येत नाही काय करावे ..काही guidance पाहिजे असेल तर त्या करिता कौन्सेलर, डॉक्टर ची नक्की मदत घ्या..
आयुष्य मोकळेपणाने जगा.. घाबरत, आपल्या इच्छा ..गरजा , भावनांचे दमन करू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “उघड्या स्त्री किंवा पुरुषांचे सतत स्वप्न का पडतात ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!