Skip to content

इतरांना हवे तसे वागणाऱ्या व्यक्तींकडे स्वतःचं असं काहीच शिल्लक नसतं.

इतरांना हवे तसे वागणाऱ्या व्यक्तींकडे स्वतःचं असं काहीच शिल्लक नसतं.


मयुरी महेंद्र महाजन


माणूस आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो परंतु तोच आनंद आपल्या आतच दडलेला आहे याचा मात्र कधी कधी विसर पडतो, इतरांना खूष करण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करतो, परंतु स्वतःला खुश करण्यासाठी साधा विचार सुद्धा करत नाही इतरांना खूष केले म्हणजे त्यातच आपण खूश आहोत असे समजून त्यातच आनंद मानतो, वास्तविक आजकाल दुसऱ्यांच्या खुशीत खरच खूश असणारे निव्वळ योगायोगाने सापडतात.

आपण सर्वच एका नाटकात जसे पात्र असतात त्याप्रमाणे आपले पात्र जगतांना निभावतो, मग जसे आपले पात्र असेल त्याप्रमाणे वागणे बंधनकारक आहे, असे मानून चालतो, निव्वळ कशासाठी?? तर आपल्या पात्राला ते शोभणारं नसते म्हणून किंवा इतरांना आपल्या कडून काय अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्णत्वाला नेण्यासाठी…,

आयुष्य आपले आहे ते आपल्या पद्धतीने सुद्धा जगायला हवे,, सतत इतरांचा विचार करत राहिलो तर आपल्या अस्तित्वाला काळीचीसुद्धा किंमत राहत नाही प्रत्येकाला खुश करण्यासाठी आपण आपलेच अस्तित्व विसरून जातो आणि मला तरी असे वाटते काही प्रमाणात आपण सर्वचं ईतरांचा विचार करतोचं,,, त्याला आपण कुणीच नाकारू शकत नाही ,,,

परंतु जिवंत बेडकाला तराजूत मोजण्यासारखी परिस्थिती उद्भवते जेव्हा आपण सर्वांनाच खूश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ,,,कारण एकाला खुश केले तरी दुसरा त्यातून लगेच उडी मारतो,,, याप्रमाणे इतरांना काय हवे आहे काय नको याचा विचार पटकन होतो परंतु कुटुंबात आपले असणारे पात्र मात्र इतरांसाठी झटण्यात आणि इतरांसाठी जगण्यातच निघून जाते ,,,जसे की घरातील कर्ते असणारी मंडळी,, या ठिकाणी असा अर्थ अजिबात नाही की घराची असलेली जबाबदारी नाकारुन फक्त स्वतःचाच विचार करत बसायचे,,,

परंतु आपले सुद्धा काहीतरी अस्तित्व आहे आपण सुद्धा काहीतरी आहोत आपल्या स्वतःसाठी…..,, याची जाणीव असणे फार गरजेचे आहे, अन्यथा कुणाच्यातरी हाताची कटपुतली होऊन आपण त्यांचा विचार करून त्यांच्याप्रमाणे वागू लागतो या सर्वांमध्ये स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो ,इतरांना हवे तसे वागणार्‍या व्यक्तींकडे स्वतःचं असं काही शिल्लक नसतं… खूपदा मनात खूप सार्‍या इच्छा असतात ,आणि त्या इच्छा पूर्ण कराव्यात अशी तीव्र इच्छा सुद्धा असते परंतु इतरांना तसे आवडणार नाही ,म्हणून इच्छांचे दमन केले जाते किंवा करावे लागते ,,

या ठिकाणी लक्षात घ्या आपण आपल्या वागणुकीत इतका सुद्धा बदल करू नये की फक्त मी माझाचं विचार करणार आहे, कारण की मक्तेदारी सुद्धा निर्माण व्हायला नको आणि स्वतःच्या अस्तित्वावर अन्यायसुद्धा व्हायला नको ,कारण मक्तेदारीच्या विळख्यात नाही ईतरजण आनंदाने जगू शकतील नाही ,आपण स्वतः आणि स्वतःच्या अस्तित्वासोबत झालेल्या अन्याने नाही आपल्याला जगण्याचा आनंद अनुभवता येणार आहे ,त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाची किंमत आपण स्वतः केली पाहिजे ,,am alwas right अशी भूमिका नको परंतु माणूस आहोत, चुकी प्रत्येकाकडून होते म्हणूनच तर आपण मानव आहोत परंतु त्या प्रत्येक चुकीतून शिकायचे आणि पुढे चालायचे तरच त्याला अर्थ…

कधी कधी ईतरांचा इतका विचार होतो की आपले स्वतःचे काही विचार आहेत हे सुद्धा व्यक्ती विसरून जातो इतरांना हवे तसेच वागणारं, इतर काय म्हणतील याचा विचार सतत करत करत स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न शून्य होतो, इतरांनी म्हटले तेच खरे मग त्यामध्ये स्वतःच्या विचारांचा वाटा संपुष्टात येतो… आणि स्वतःकडे स्वतःचं असं काही शिल्लक नसतं…

जे काही असेल ते सर्व इतरांकडून घेतलेले ऊसने अवसन असते त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाला किंमत असावी असे वाटत असेल तर आपल्या अस्तित्वाला आपल्याच दमा वरती जिंकणे ,शाबूत ठेवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे अन्यथा शिल्लक असलेल्या गोष्टीची किंमत एखाद्या सांगाळ्याप्रमाणे असते हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही…

फक्त आपल्या मनाला एकदा विचारावे की ज्यासाठी मी इतरांचा विचार करत आहे तो विचार खरच बरोबर आहे का??? कारण संघर्षाचा काळ एकट्यानेच पार करावा लागतो विजयाच्या वेळेस तर सर्वच हार घेऊन उभे असतात, कारण एकच तुमच्या अस्तित्वाची झलक फक्त तुम्ही स्वतः जाणता इतरांना हवे तसे करत राहिलात तर तुमचे अस्तित्व शिल्लक रहात नाही, मित्रांची कॉपी करून पेपर पास झालो तरी त्यामध्ये विजयाचा खरा आनंद नसतो याप्रमाणे सुरुवात तुमच्या अस्तित्वापासून सुरू होते आणि संपणार सुद्धा तुमच्या अस्तित्वावरच असते मग तुम्हीच ठरवा तुम्ही तुमच्या अस्तित्वाला कसे शिल्लक ठेवून जाणार आहात….!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!