Skip to content

इतरांच्या आयुष्यामध्ये आपली जागा शोधणं बंद करायला हवं..हो ना?

इतरांच्या आयुष्यामध्ये आपली जागा शोधणं बंद करायला हवं..हो ना?


मयुरी महाजन


जेव्हा आपण सर्वांनी जन्म घेतला तेव्हा सर्वात आधी आपली जागा आपल्या आई-वडिलांच्या हृदयात असते ,किंबहुना आपल्या जन्माच्याही आधीचं, कारण आपल्याला बघण्याच्या अगोदर ते आपल्यावरती प्रेम करतात, आणि काळजी घेतात ,त्यात आई-वडील कधीच बोलून दाखवत नसतात की आपली नेमकी त्यांच्या आयुष्यात काय जागा आहे, आता सर्वांसाठी हे अनुभव सारखे असतील असे मात्र नाही.

इथून सुरु होतो आपल्या प्रत्येकाचा प्रवास मग जसं-जसे मोठे होत जातो, तस-तशी माणसं कळायला लागतात, माणसं समजायला लागतात ,मग रक्ताची असोत की आपण जोडलेली आपण प्रत्येक मनाला जिंकण्यासाठी प्रयत्न करतो, समोरचा आपल्याला काय समजतो हे कळायला हवं, नाहीतर आपण नाती निभावत असतो आणि समोरच आपल्याला चुना लावत बसतो, नात्यांच्या सहवासात खरंतर निस्वार्थपणा असावा, परंतु आजकाल तसे ते कमीच बघायला मिळते,

इतरांच्या आयुष्यात आपण नेहमीच कुठेतरी असायला हवं, एखाद्या जवळचा मित्र किंवा मैत्रीण की त्यांनी आपल्याला लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून त्याच्या आयुष्यात आता माझी ती जागा राहिलेली नाही, जेव्हा सोबत होतो तेव्हा मात्र त्याच्या आयुष्यात माझी जागा खूप महत्त्वपूर्ण ठरत होती, आता लग्नाच्या उंबरठ्यावरती ती जागा आता हक्काच्या व्यक्तीने घेण्याची तरतूद झाली म्हणजे संपलाच विषय .जवळचा काय आणि दूरचा काय मित्र शेवटी मित्रच असणार नां…. असं म्हणून आपणचं आपला त्रास करून घ्यायचा नाही,

इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं बंद करायला हवं, हो… ना ….कारण की गरजेला भाऊ दादा म्हणणारी माणसे चं आपल्याशी नाही तर त्यांच्या स्वार्थाशी एकनिष्ठ असतात, आपल्या आयुष्यात असलेली रिकामी पोकळी आपल्याला इतरांच्या आयुष्यात जागा शोधण्यासाठी परावृत्त करत असेलं, त्यासाठी आपल्या आयुष्याला चहुबाजूंनी इतकं समृद्ध करूया, आपल्या स्वभावातले गुण-दोष त्यातील कमतरता भरून काढण्यासाठी तसेच माणूस म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाला सर्व बाजूंनी फुलायला बहरायला आणि हवं तिथे कुणाच्या तरी मदतीला जाण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर बनवूया, जेणेकरून इतरांच्या आयुष्यामध्ये आपली जागा शोधण्याची गरज भासायला नको .

रोज कितीतरी जणं जन्माला येतात आणि रोज कितीतरी लोक मरतातही , मरणाऱ्या व्यक्तींमध्ये किती जणांनी इतरांच्या आयुष्यात ती जागा शोधली खरच ती जागा मिळवली हाच प्रश्न आहे, काही वेळेस बरीच लोक असे दाखविण्याचा प्रयत्नही करतात की माझ्या आयुष्यात तूझी जागा खूप स्पेशल आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र अशी माणस आपल्याशी नाही तर आपल्या स्वार्थाची एकनिष्ठ असतात, म्हणून वरपांगी दिसणाऱ्या प्रेमाला भाळू नका, कलियुग आहे सावध राहा,

आपण ठरवून कोणाच्याही मनात जागा मिळू शकत नाही, आपण आपल्या आयुष्यात कोणाला जागा द्यावी हे आपण ठरवू शकतो ,पण इतरांच्या आयुष्यात आपली जागा काय शोधणं बंद करायला हवं, कारण ज्या गोष्टीला आपण भाळलोय त्या गोष्टीसाठी इतर जण आपल्या कामासाठी लाडीगोडी लावून आपलं काम करून घेत असतात, संत तुकाराम महाराज म्हणतात

” जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही”
फक्त कामासाठी आणि गरजेपोटी ती जागा असेल तर उगाचच इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणे बंद करायला हवं हो ना ….कारण आपण जितक्या प्रेमाने निस्वार्थपणे नाती सांभाळतो, जपतो, तितक्याच प्रामाणिकपणे समोरचाही नाती निभावेलं हे आपल्या हे सांगता येत नाही, त्यामुळे आपण आपला त्रास वाढवून घ्यायचा नाही, आपल्यासाठी आपल्या आयुष्यात आपली जागा कुठे आहे, हे नक्की शोधायला हवं, आपला आनंद दुप्पट होईलं,

आपण इतरांचा विचार जास्त करतो, मग कुणी काय म्हणेल यापासून ते मी असं केल्यामुळे लोक माझ्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतील ,यापासून ते इतरांच्या आयुष्यात आपली जागा कुठे ईथपर्यंत हा सर्व शोध सुरू असतो, पण जगण्याच्या पद्धतीत आपण इतरांचा विचार करत असताना थोडा का होईना स्वतःला मोकळेपणाने मोकळा श्वास घेऊ द्यायला हवा नाही का???


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “इतरांच्या आयुष्यामध्ये आपली जागा शोधणं बंद करायला हवं..हो ना?”

  1. खूप छान आणि मार्गदर्शक👌
    धन्यवाद 🙏🏻

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!