Skip to content

इतरांचं बोलणं मनाला खूपच लागत असेल तर…तुमची सध्याची मानसिकता खूपच हळवी आहे.

इतरांचं बोलणं मनाला खूपच लागत असेल तर…


सोनाली जे


तसे तर बरेचदा प्रत्येकाला अनुभव येत असतो की इतरांच बोलणं आपल्या मनाला लागत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीत जसे बायको नवऱ्यासोबत बाहेर जाताना तिच्या परीने खूप छान आवरून तयार होते आणि सहज म्हणून नवऱ्याला विचारते मी कशी दिसते? नवरा न बघताच आहे तशीच दिसणार ना असे उलट उत्तर देतो ..त्याचे हे उत्तर बायकोला लागते कारण तिने तिच्याकडून खूप प्रयत्न केले असतात ती सुंदर दिसेल या करिता व्यवस्थित आवरण्याचे .आणि तिला अपेक्षा असते की नवरा उत्तर देईल की खूप छान किंवा सुंदर दिसतेस याउलट नवरा बघत ही नाही आणि त्यात काय एव्हढे , आहे तशीच दिसणार आहे असे म्हणून दुर्लक्ष च करतो जणू.ही तशी रोजच्या व्यवहारातील गोष्ट झाली.

असे रोजच्या व्यवहारात बऱ्याच घटना मनाला लागत असतात.. एखादे शिक्षक म्हणतात तुला हे येतच नाही.तेव्हा ती गोष्ट मनाला लागते. तर कधी स्नेहसंमेलन असेल आणि मित्र मैत्रिणी एखादा ग्रुप डान्स बसवत असतील आणि एखाद्याला त्या स्टेप्स जमत नसतील तर लगेच त्यातले काही जण म्हणतात हे एवढेसे जमत नाही तुला आणि मग ती गोष्ट मनाला लागते..त्यातले काही मित्र मैत्रिणी आपल्याला शिकवतात ही ..ते दोन तीन वेळा त्या स्टेप्स करून दाखवितात ही.जमते ही आपल्याला..

आपल्या सगळ्यांच्या बाबतीत अशा घटना सतत घडत गेल्या , जर तुला समजतच नाही , येतच नाही , तू अशीच आहेस , तुझे विचारच असे आहेत असे सतत कोणी ना कोणी बोलत राहिले तर मनाचे खच्चीकरण होते. काही वेळेस सतत कठीण प्रसंग , अपयश आपल्याच बाबतीत घडते असे प्रसंग घडतात ही. त्यातून व्यक्ती हळवी बनू लागते. स्वभाव , वृत्ती , थोडेसे काही झाले तरी परत परत त्या प्रसंगाना तोंड द्यावे लागले तेच तेच अनुभव येवू लागली तर व्यक्ती हळवी होते..मग कधी ते अश्रू रूपातून बाहेर पडेल तर कधी शांत राहून , किंवा स्वतः guilty आहोत , दोषी आहोत अशी ही मानसिकता निर्माण होते. एवढेसे काही झाले की वाईट वाटू लागते..येणाऱ्या प्रसंगात strong राहण्या ऐवजी मन कमकुवत होवू लागते.आत्मविश्वास कमी होवू लागतो.

एका मेडिकल दुकानात खूप गर्दी असते.दुकानाचा मालक ही नोकरांना मदत करत असतो. त्याचे लक्ष रस्त्यापलिकडे झाडाखाली उभ्या असलेल्या आणि अत्यंत आशेने दुकानाकडे पाहत असते त्या आजीकडे जाते ..ते त्या मालकाच्या लक्षात येते.तो स्वतः त्या तिथे जातो आज्जीना विचारतो की तुम्ही दुकानात का आला नाही? तुमच्याकडे पैसे नाहीत का ? तुम्हाला औषधे पाहिजे असतील तरी मी देतो ..

तर आजी म्हणाल्या दुकानात खूप गर्दी होती म्हणून आले नाही.पैसे आहेत माझ्याकडे . मग तुम्हाला काय पाहिजे आजी असे तो medical दुकानदार विचारतो , तेव्हा आजी सांगतात काल माझ्या मुलाचा फोन आला होता , दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत तो , माझी सून आणि नातवंडे माझ्याकडे राहायला येतात.पण काल त्याने फोनवर सांगितले की या सुट्टीत आम्ही तुझ्याकडे येणार नाही , आम्ही हील स्टेशन ला जाणार आहोत , तिकडे मोठे पहाड आहेत , थंड हवा , बर्फ आहे अशा ठिकाणी , त्यातून मुलांना आणि आम्हाला सुट्टी नाही मिळणार म्हणून तुला भेटायला येणार नाही..

दुकानदार आजीला विचारतो : मग ? आजी दुकानदाराला : मग तुम्हाला तेच विचारायचे होते की मनाच्या हळवेपणा करिता तुमच्याकडे काही औषध आहे का?? दुकानदार ही विचारात पडतो .

आजी म्हणतात अरे वर्षातून एकदा मला भेटायला येतात म्हणून मला किती उत्साह येतो, त्यांच्या करिता काय करू आणि काय नको असे होते मला. तरुण होते तेव्हा शरीर ही साथ देत होते , ताकद होती. आता रोजचे व्यवहार , स्वैपाक असेल, आजारपणे माझी , हे सगळे माझे मी करत असते..आता शरीर ही साथ देत नाही त्यामुळे छोट्या छोट्या प्रसंगात मन हळवे होते. आणि आता असे वाटते की कधी एकदा भेटू मुलांना , नातवंडांना कारण पुढे भेट होईल न होईल, शरीर साथ देईल न देईल..अचानक आपल्याला काही झाले तर आपली शेवटची भेट ही होवू शकणार नाही..

आता अनेकवर्षाच्या एकटेपणा मधून , सतत आलेल्या प्रसंगाना स्वतः खंबीरपणे तोंड देवून देवून, इतक्या सततच्या अनुभवातून आणि आता वय झाले त्यामुळे शरीर साथ देत नाही यातून मानसिक थकवा आला आहे,मन कमकुवत झाले आहे. मन छोट्या छोट्या प्रसंगात हळवे होते, उगीचच भरून येतो जीव, डोळे भरून येतात.या वयात पैशापेक्षा कोणाचा तरी आधार पाहिजे असतो , आपल्या कोणाच्या मायेचा स्पर्श हवा हवासा वाटतो..आपले कोणी आहे वेळेवर हा मानसिक आधार आपल्याला असे मानसिक हळवे बनवत नाही.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वारंवार असे मानसिक आघात होत गेले , सतत कठीण प्रसंगाना तोंड द्यावे लागले, कधी कोणी बोलले जरी ते आपल्याला उद्देशून नसेल तरी आपल्यालाच बोलले असे वाटते. किंवा सहज जरी कोणी बोलले तरी आपल्या मनाला ते लागते. कारण आपण वारंवार अनेक छोट्या मोठ्या मानसिक प्रसंगातून गेलो असतो, जात असतो , त्यामुळे इतरांचं बोलणं मनाला खूपच लागत असेल आणि आपल्या मनाचे बांध फुटत असतील, एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून मनाचे स्वास्थ्य बिघडत असेल , स्वतः ला इतरांच्या मुळे दोषी समजत असाल , तर…तुमची सध्याची मानसिकता खूपच हळवी आहे.

हळवे होणे हा खूप भावनिक असलेल्या लोकांचा स्वभाव बनतो..पण बरेचदा याचा गैरफायदा लोक घेवू शकतात.म्हणून आपल्या मनावर आपलाच कंट्रोल असणे जास्त महत्वाचे असते. आपण कोणत्या गोष्टींनी हळवे होतो , कोणाचे टोमणे आपल्या मनाला लागत असतील तर आपण आपल्या मनाला शिकविले पाहिजे ना की कोणाच्या बोलण्याने आपण आपल्या मनाला का त्रास करून घ्यायचा,. ती समोरची व्यक्ती तिच्या मनातले बोलून रिकामे होत असते ..म्हणजे ती बोलून तिच्या भावना मोकळ्या करते आणि मग त्या गोष्टी आपण का पकडुन ठेवायच्या? ती बोलून रिकामे होते तसे तुम्ही लगेच बोलून रिकामे व्हा..किंवा मग आपली मानसिकता अशी घडवा की ती समोरची व्यक्ती काही बोलली तरी ते माझ्याकरिता नाहीच ..मला त्याने काहीच फरक पडत नाही.

इतरांच्या बोलण्याचा , वर्तनाचा आपण आपल्यावर किती प्रभाव पडू द्यायचा हे आपण ठरवायचे.. आपण आपल्या स्वतः ला समजून घेण्याची जास्त गरज आहे. आयुष्य खूप सुंदर आहे.इतरांचं बोलणं मनाला खूपच लागत असेल तर… आणि तुमची सध्याची मानसिकता त्यातून खूपच हळवी होत असेल तर मनाला वेळीच बांध घाला.

जसे राजा जेव्हा वयस्क होतो तो संन्यास घेण्याचे ठरवितो तेव्हा त्याच्या चार राण्या असतात त्यापैकी चौथ्या राणीला पहिल्यांदा विचारतो ती नकार देते..तुम्ही जा म्हणते ते म्हणजे आपले शरीर , तिसऱ्या राणीला विचारतो ती म्हणते की नाही ..ती म्हणते मला अजून जगायचे आहे ..ते म्हणजे ज्या भौतिक गोष्टी..मोबाईल असेल, दागदागिने , पैसे असतील , वस्तू असतील त्या..दुसऱ्या राणीला विचारतो ती म्हणते नाही..पण तुम्ही जा संन्यास घ्या तुमचे जर देहावसान झाले तर तुमचे अंत्यसंस्कार शाही थाटात करेन.ती असते आपली फॅमिली जी आपल्याला साथ देते पण त्यात ही मर्यादा..शेवट हा आपण एकटेच हे सत्य आहे.

पहिली राणी तिच्याकडे काही नसते..अंगावर दागिने ही नाही ती म्हणते मी येईन महाराज तुमच्या सोबत .. महाराज यांना आश्चर्य वाटते ही पहिली असून आपण हीच्यकडे दुर्लक्ष केले , इतर राण्याना पैसा, दागिने, मान दिला . हिला काही दिले नाही तरी ती कशी काय येते..तरी त्याला आनंद होतो..तो तिच्या सोबत जातो.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही पहिली राणी असते ..जो आपला आत्मा म्हणजेच मन , soul , ज्याकडे आपण इतर गोष्टी करिता दुर्लक्ष करतो पण शेवटपर्यंत आपले मन म्हणजे आपला आत्मा आपल्याला साथ देत असते त्यामुळे आपण आपल्या मनाला healthy ठेवले पाहिजे..त्याची जपणूक आणि काळजी सर्वात जास्त घेतली पाहिजे..

कधी कधी हळवे व्हावे पण इतरांच्या बोलण्याने ती गोष्ट आपल्या मनावर परिणाम करून हळवे कधी होवू नये.. मनावर स्वतः चा कंट्रोल ठेवा.. आयुष्य सुंदर आहे ..रस्त्यात ही board बघतोच की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ..

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!