Skip to content

इंडिकेशन मिळत असतील तर तो एक ‘फेक कॉल’ सुद्धा असू शकतो.

इंडिकेशन मिळत असतील तर तो एक ‘फेक कॉल’ सुद्धा असू शकतो.


हर्षदा पिंपळे


इंडिकेशन….अर्थात संकेत…! कुणाला हे सहजासहजी मिळतात तर कुणाला इंडिकेशन्स मिळालेलेही समजत नाही. आणि इंडिकेशन्स मिळाल्यावर ती परिस्थिती कशी हाताळायची हेही समजत नाही.आपल्या आयुष्यात वावरताना आपल्याला नेहमीच कोणते ना कोणते संकेत हे मिळत असतात. कधी हे संकेत चांगल्या प्रकारचे असतात तर कधी हे वाईट प्रकारचेही असतात.

Positive vibes आणि negative vibes या दोन्ही गोष्टी अशावेळी आपल्याला जाणवतात. आपण म्हणतोही की हल्ली काही चांगले इंडिकेशन्स मिळत नाहीएत…किंवा मला खूप छान इंडिकेशन्स मिळाले.इतकच नाही तर कधी कधी तर आपण अगदी इंडिकेशन्स नुसार behave करत असतो.जसे इंडिकेशन्स मिळत जातील त्याप्रमाणे पुढची step करत असतो.पण अनेकदा आपल्याला ते इंडिकेशन्स चांगले की वाईट हे कळत नाही. अर्थात ते इंडिकेशन्स किती खरे आणि किती फेक आहेत हे सहजासहजी समजत नाही.

आपल्या सभोवती असंख्य माणसांचा वावर हा चालू असतो. ती कशी असतात आणि कशी नाही हे त्यांच्या सहवासात वावरल्याशिवाय समजत नाही. माणसं समजायला थोडा वेळच लागतो. पण वेळीच लक्षात घ्या….आपल्याला काही कुणाच्या बाबतीत इंडिकेशन्स मिळत असतील तर तो एक फेक कॉल सुद्धा असू शकतो.जसं की आपण पाहतो काही अशा व्यक्ती आपल्या अवतीभवती असतात की ज्या खूप गोड गोड बोलत असतात.अगदी काहीतरी (स्वार्थ) हेतूपूर्वक बोलत असतात.

कारण कितीतरी लोकं केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याशी सातत्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतातत. पण तीच लोकं स्वतःचा स्वार्थ यशस्वी झाला की पुन्हा आपल्याशी वैर धरतात. खरं तर असे काही इंडिकेशन्स तुम्हाला कुणाकडून मिळत असतील तर वेळीच सावध व्हा.अशा फेक कॉल्सना शक्यतो अनावधानानेही आपल्या आयुष्यात कायमच स्थान देऊ नका.चार हात त्यांच्यापासून लांबच रहा.

आणि अशी वेगवेगळी इंडिकेशन्स आपल्याला मिळतच असतात. कधी नात्यात / करिअरमध्ये… अगदी आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर ही इंडिकेशन्स मिळत रहातात. मैत्रित म्हणू नका की प्रेमात…. इंडिकेशन मिळाली की आधी विचार करा.ती इंडिकेशन चांगल्या गोष्टीसाठी आहेत की वाईट गोष्टीसाठी…? आणि सतत पुढे-मागे करणे,सतत गोडगोड बोलणे, सतत वरवर स्तुती करणे,मी-मी माझं -माझं करणे ही आपल्याला मिळणारी एकप्रकारची इंडिकेशन्सच आहेत.आणि माणस कधी काय इंडिकेशन्स देतील काही कळत नाही.

आपल्यालाही या इंडिकेशन्सची ईतकी सवय झालेली असते की आपण कोणतही इंडिकेशन मिळाल्याशिवाय पुढेच जात नाही. माणसाला समजणं जरा अवघडच आहे. एखादं मांजर नाही तर कुत्रा भूकेला असेल तर त्यांच्या हालचालींवरून , त्यांच्या इंडिकेशन्स वरून समजतं तरी त्यांना राग येतोय , माया वाटतेय हे सगळं समजतं.पण माणसांची इंडिकेशन्सही लवकर समजत नाही.

कारण गोड बोलणारी सगळीच माणसं ही वाईट नसतात. आणि चांगली वागणारी सगळीच माणसं काही चांगली नसतात. म्हणून केव्हाही काही इंडिकेशन्स मिळाले तर सावध व्हा.कोण कसं वागतय..? किती गोड बोलतय..? त्यांचा हेतू काय../ स्वार्थ काय…? वागणं-बोलणं कसं आहे…? या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन समोरचा कॉल फेक आहे की खरा आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करा .

अनेकदा तर ही माणसं आपलीच असतात. आपल्या माणसांची आपल्याला सवय झालेली असते.त्यांच वागणं-बोलणही आपल्या सवयीच झालेलं असतं.अर्थात आपल्याला त्याची पूर्णतः कल्पना आलेली असते.त्यामुळे कधीतरी असं होतं की रोज एका पद्धतीत वागणारी माणसं अचानक आपल्याशी वेगळं वागतात. त्यांचा बोलण्याचा tone ही बदलतो.शब्द बदलतात.

खोटं हसणं आणि नैसर्गिक हास्य यातील फरक तर आपण ओळखूच शकतो.त्यामुळे कधी कधी हे हास्य देखील एक प्रकारच इंडिकेशन असू शकतं.थोडक्यात हळुहळू त्यांच वागणच बदलायला लागतं.अशावेळी थोडी सावधगिरी आपण बाळगणे आवश्यक आहे. म्हणजे नेहमीच काही काळंबेर असू शकतं असं नाही पण सतर्क राहणं केव्हाही चांगलंच…! म्हणून अशी काही इंडिकेशन्स मिळत असतील तर वेळीच सतर्क राहून योग्य तो निर्णय घेऊन प्रत्येक परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळायला शिका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!