Skip to content

आहे ते स्वीकारलं तर नको तेथे बदलाची अपेक्षा राहत नाही.

आहे तेथे स्वीकारलं तर नको तेथे बदलाची अपेक्षा राहत नाही.


मिनल वरपे


आपल्याला एक सवय असावी ती म्हणजे समोर जे आहे ते जसे त्या तसे स्वीकारणे… मग तो स्वभाव असो वस्तू असो किंवा व्यक्ती. जेव्हा आपण जे आहे तसे स्विकारले तर आपल्या अपेक्षांचं ओझ ना दुसऱ्याला होत ना आपल्याला…

आता बघाना एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर असे बहुतेक लोक असतात ज्यांना समोर जे वाढलंय ते आनंदाने पोटभरून खाण्याची. मला ही भाजी आवडत नाही, मला तसे जेवण जमत नाही, मला फक्त अमुक अमुक भाजीचं जास्त आवडते आणि मग अशी लोक आवडीच जेवण नसेल तर अर्धपोटी राहतात.

पण तेच जी लोक ताट वाढलं की काय आहे ते बघत वेळ न घालवता जे वाढलंय ते तसेच स्वीकारून जेवतात ते कधीच अर्धपोटी राहत नाही. त्यांचं मन आणि पोट कधी तक्रार करत नाही.

हे झालं खाण्याच.. पण आपण माणसांबद्दल बघायचं झालच तर खर प्रेम करणाऱ्या व्यक्ती बघायच्या .. जी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसकट स्वीकारते ती व्यक्ती ते नात कायम टिकवते.. आणि यात सर्वात मोठं दाखला द्यायचा झाला तर ती व्यक्ती म्हणजे आपले आई वडील..

आपले आईवडील आपल्याला कायम जीव लावतात. आपण किती चुका करोत पण ते आपल्याला कधीच दूर लोटत नाही कारण त्यांनी आपल्याला त्यांचं मुल म्हणून आहे तसच कायम स्वीकारलेले असते.

पण जे समोरच्या व्यक्तीला आहे तसे स्वीकारत नाहीत ज्यांना समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दल, स्वभावाबद्दल कायम तक्रारी असतात ते कधीच आनंदी राहत नाही कारण त्यांना समोरच्या व्यक्तींमधे बदल व्हावेत अशी कायम अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की त्यांना दुःखी वाटते, निराश वाटते.

आपल्याला जर कोणी एखादी वस्तू मनापासून दिली आणि ती आपण आनंदानें स्वीकारली तर नक्कीच त्या वस्तू देण्यामागचा खरा आनंद त्या व्यक्तीला सुद्धा मिळेल. पण तेच आपण वस्तू अशीच का दिली,मला दुसरी हवी होती अशा तक्रारी करत बसलो तर त्या व्यक्तीला आपल्याला पुन्हा काही देण्याची इच्छा सुद्धा राहणार नाही.

अगदी असच समोर जी परिस्थिती आहे ती जशीच्या तशीच स्वीकारायची आपल्याला सवय असेल तर नक्कीच आपल्यातील ऊर्जा योग्य दिशेने काम करत असते कारण आपण ती परिस्थिती स्वीकारून आपल्यात हवे ते बदल करतो आलेल्या वेळेनुसार आपण स्वतः adjust केलं की आपल्याला तक्रार न करता आयुष्य जगण्याचे वेगवेगळे मार्ग मिळतात.

उदाहरणार्थ, आपण एखाद्या नविन ठिकाणी गेल्यावर तिथे असणार वातावरण, तिथली माणसं यांच्यात आपल्याला सहज मोकळं वागता येईल जर आपण जे आहे ते जसेच्या तसे स्विकारले तरच.

कोणतीही वेळ असो , माणसं असो किंवा कोणतीही परिस्थिती जर आपल्याला जे आहे तसे स्विकारता आले तर आपल्याला त्यांच्याकडून बदलाची अपेक्षा राहत नाही , तक्रार करायला वेळ आणि कारण मिळत नाही आणि अगदी सहजच आपण कुठेही आणि केव्हाही स्वतःला उत्तम प्रकारे मॅनेज करू शकतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!