Skip to content

आयुष्य केवळ compromise करण्यासाठीच असतं का??

आयुष्य केवळ compromise करण्यासाठीच असतं का??


मयुरी महेंद्र महाजन


आयुष्य हे आपल्या सर्वांना मिळालेले एक वरदान आहे, त्याला दिलखुलासपणे जगता यायला हवं, पण खरं सांगू आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत कधी कधी आपल्यावर जबाबदारीचे ओझे असते, ते सांभाळून कधीकधी आर्थिक अडचणी, तर कधी सामाजिक तर कधी न अनुभवलेल्या अनामिक अडचणी जे की दिलखुलासपणे जगू न द्यायला कारणीभूत ठरतात,

पण म्हणून काही आपण आपले आयुष्यात थांबवू शकत नाही ,आपण सर्वच ठिकाणी आपल्या आनंदाबरोबर कॉम्प्रोमाइज करत असतो ,आणि सतत तेच करतो ,आज नाहीतर उद्या याप्रमाणे आपला आनंद ढकलला जातो, हे आयुष्य आहे अडचणी ह्या असणारच आहे, आणि त्या नेहमीचं असतीलं, म्हणून काय आपण त्या अडचणींचा बाऊ करत compromise करत राहायचं का ????आणि कधीपर्यंत?????

आयुष्य जगण्यासाठी असतं, तसंचं ते एकमेकांना आनंद देण्यासाठी असतं ,आयुष्य जगताना अडचणी आहेत, नसलेल्या गोष्टींची खंत व्यक्ती तडजोड करून जगत असतो, पण त्या तडजोडी करत करत आयुष्य फक्त तडजोड करण्यातचं निसटून चाललाय का ???

हे सुद्धा बघायला हवे, कुठे कुठे compromise करणारं आहोत आपण, फक्त पैशाच्या बाबतीत असं नाही, बरेचदा समोरची व्यक्ती दुखावली जाईल ,त्यासाठी आपण आपल्या मनासोबत तडजोड करून घेतो , प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा अपेक्षा असतात ,आणि त्या पूर्ण व्हाव्यात ही मनोमन इच्छा असते, मग त्यात स्वप्न असतीलं, आपल्या गरजा असतील, असं बरंच काही पण प्रत्येक इच्छा अपेक्षा ही पूर्ण होतेचं असं नाही,

त्यावेळेस आपण आपली इच्छा मारून त्या ठिकाणी कॉम्प्रमाईज करतो, उत्पन्न होणाऱ्या ईच्छा हि मानव होण्याची पहिली पायरी आहे, बरं मग प्रत्येक ठिकाणी ऊधळपट्टी करूनही चालत नसतं, आपल्याला कॉम्प्रमाईज करावेच लागते , परिस्थिती कितीही चांगली वाटत असली, तरी एखादी वेळ अशी येते की ज्या ठिकाणी आपल्याला कॉम्प्रोमाइज करण्यावाचून पर्यायच नसतो, पण संपूर्ण आयुष्य काही compromise करण्यासाठी असतं का??? तर नाही

आयुष्यात फक्त compromise करत राहिलो, तर मग जगायचे कधी हा प्रश्न पडतो, कारण ईतकं सुंदर आयुष्य मिळालेलं आहे, मग काय फक्त कॉम्प्रमाईज करत जमापुंजी गोळा करत करतच घालवायचं का,???? उभ्या आयुष्यभर compromise केले, परंतु ज्या वेळेनुसार आपले आयुष्यात मागे सरत गेले ,त्याचे काय???

कारण उगवणारा प्रत्येक दिवस आपले आयुष्य एक दिवसांनी मागे सारतोय, हे आयुष्य किती बाकी आहे हे आपण कोणीचं सांगू शकत नाही, त्यामुळे असले दिवस फक्त आपले आहेत ,ते जगता यायला हवे,

असे नाही की ऊधळपट्टी करावी, पण आयुष्य फक्त compromise करण्यासाठी नसून ते जगण्यासाठी सुद्धा असते ,हे जरी आपल्याला कळून चुकले तरी खूप आहे, त्यामुळे आयुष्य जगा ,भरभरून जगा, आयुष्याची वयोमर्यादा आपण ठरवू शकत नाही ,

पण आयुष्य कशा पद्धतीने घालवायचे आहे हे मात्र आपण ठरवू शकतो, त्यासाठी आयुष्याचा पूर्णपणे आनंद घ्यायला हवा, फक्त मन मारून जगण्यात अर्थ नसतो जे पाहिजे असं वाटतं त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आयुष्य केवळ compromise करण्यासाठीच असतं का??”

  1. Ashwini Bhadange.

    छान होता. पण आणखी अजून काही हव होत अस वाटल..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!