Skip to content

आयुष्य कठीण आहे, पण सतत तक्रारी करून ते सोपे होणार नाही.

आयुष्य कठीण आहे, पण सतत तक्रारी करून ते सोपे होणार नाही.


सोनाली जे.


सकाळपासून एक गोष्ट धड होत नाही .. घरातून निघताना उशीर झाला , नेहमीची ७.४० ची बस चुकली , म्हणून रिक्षाने ऑफिस ला जाताना सततची चिडचिड , घरात वेळेत डबा देत नाहीत. रोज धावपळ असते. कसरत असते. त्यांचे काय जाते ? ते घरात आरामात असतात.
अशा रोजच्या आणि सततच्या तक्रारी.

आयुष्य कठीण आहे. पण सतत तक्रारी करून ते सोपे होणार नाही. तुम्ही केवळ तुमच्या पुरते विचार करता पण समोरच्या विषयी कधीच विचार करत नाही.
खरेच प्रत्येकाचे आयुष्य हे कठीण आहे. आपल्या प्रत्येकाचे होत काय असते की जन्माला आलो की आपल्या भोवती आई वडील , आजी आजोबा , भावंडे यांचे एक वलय किंवा कोश असतो. त्यात comfort zone असतो. आणि आपण तिथे safe असतो. पण त्या कक्षेबाहेर गेलो की जगणे अवघड वाटू लागते. आणि मग सतत इतर लोक , वस्तू , कामाचे स्वरूप , रोजची धावपळ , इतर लोकांचे वागणे , आर्थिक प्रश्न , सामाजिक प्रश्न या विषयी सतत तक्रारी करू लागतो. पण पण सतत तक्रारी करून ते सोपे होणार नाही हे रोजच्या अनुभवावरून लक्षात येते .आणि मग लक्षात येते की आयुष्य कठीण आहे तरी ते सोपे करण्याकरिता किंवा आहे हे आयुष्य जगण्याकरिता सतत प्रयत्न करत राहिले पाहिजेत.

नाचता येईना अंगण वाकडे असे म्हणून कसे चालेल ? नृत्य जर अंगात भिनले असेल तर अंगण वाकडे असो अथवा पाय नसोत बसून ही नृत्य करणारे आहेत. छोट्या जागेत ही उत्कृष्ट नृत्य करणारे आहेत.

तसे बंगला नसेल तरी फ्लॅट मध्ये राहणारे , फ्लॅट नसेल तरी झोपडी मध्ये राहणारे , आणि झोपडी नसेल तरी रस्त्यावर राहणारे आणि तेही कोणतीही तक्रार न करता आनंदाने राहणारे लोक आहेत. कारण त्यांनी आयुष्य कठीण आहे, पण सतत तक्रारी करून ते सोपे होणार नाही या तत्वाचा स्वीकार केला आहे. आहे त्यातून आनंद शोधण्याचा , जगण्याचे प्रयत्न करण्याचा ध्यास त्यांना कायम आनंदी ठेवतो.

माझ्याकडे हे नाही , पैसे नाहीत , घर नाही , गाडी नाही , एक हात नाही , पाय नाही , डोळा नाही म्हणून हे लोक सतत तक्रार करत नाहीत. जे आहे त्यातून काही तरी नावीन्य करण्याचा प्रयत्न करतात. हात नसलेले लोक ही पायाने ड्रॉइंग काढतात.
म्हणजे काय तर त्यांना ही रोजचे आयुष्य जगणे कठीण असताना त्या दुःखावर , अपंगत्व यावर मात करून सतत तक्रार करण्यापेक्षा जे आपल्याला करता येईल त्याकरिता धडपड करतात. प्रयत्न करतात.

एक पोस्टमन दाराची बेल वाजवुन बराच वेळ थांबतो , परत बेल वाजवतो , तेव्हा आतून आवाज येतो आले. तरी बराच वेळ जातो. मग हा पोस्टमन अस्वस्थ होवून चिडतो , एव्हढा वेळ लागतो का दार उघडायला , एव्हढा उन्हातून आलो मी.किती वेळ लावावा .. शेवटी दरवाजा उघडला गेला .. पोस्टमन ने बघितले दोन्ही पाय नसलेली एक मुलगी दरवाजा उघडुन पत्र घेते. ती त्या wheel chair वर असते. तेव्हा मात्र त्याला थोडे वाईट वाटते. या कठीण आयुष्यात ही ती मुलगी हसत हसत पोस्टमन दादा माफ करा तुम्हाला थांबावे लागले असे म्हणून थोडा खावू आणि पाणी देते त्यांना. ती म्हणते हे सगळे एकत्र घेवून येण्यास वेळ लागला. कारण मला इतरांच्या सारखे पटपट गोष्टी करता येत नाहीत. मी दार उघडुन परत आत जाणार आणि मग तुम्हाला निघण्याची घाई असणार म्हणून मी सगळे घेवून आले. माफ करा दादा ..

पोस्टमन ना काही सुचत नाही. खावू आणि पाणी पिवून जातो. पुढच्यावेळी पत्र घेवून येतो तो शांतपणे दर उघडेपर्यंत थांबतो. तेव्हा ती मुलगी त्या पोस्टमन दादांना एक बॉक्स देते तो उघडुन बघतात तर त्यांना चप्पल चा जोड दिसतो .. ती मुलगी म्हणते लगेच घाला. तो खुश होतो आणि ते मवू चप्पल पायात घालून खुश होतो. त्याला त्या मुलीचे खूप कौतुक वाटते.स्वतः पाय नसताना तिने पोस्टमन दादांच्या पायात चप्पल नाहीत हे observe करून त्यांना आठवणीने ती गिफ्ट दिली जी त्यांना उन्हा तन्हात त्या मुलीची रोज आठवण करून देत असे.

प्रसंग खरे तर बघा विचार करा पगार असून चप्पल घेणे परवडत नाही पोस्टमन दादांच्या खडतर , कठीण आयुष्याचा विचार करते. उन्हा तान्हात आपली पत्रे देण्यासाठी हे दादा एव्हढे कष्ट घेतात. त्रास सहन करतात कधी तक्रारी करून ही आहे त्याचा स्वीकार करून पुढे जातात. आपल्या कर्तव्यात चुकत नाहीत तर आपण त्यांना थोडा comfort द्यावा हा विचार ती मुलगी करते. म्हणजे अजून आनंदाने ते आपल्या सारख्या लोकांना घर बसून आपली पत्रे , पार्सल आनंदाने देतील हा विचार करते.

रस्त्याने बडबडत चालणारा एक माणूस बघितला परवा . असे का होते ?

सध्याची लाईफ स्टाईल बदलली आहे. साधे पेट्रोल चे दर विचार केले तर एव्हढे महाग झाले आहे की सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे ? दूर अंतरावर नोकरी करिता जायचे कसे ? महिन्याचा घर खर्च कसे भागवायचे? घरच्या स्त्रीने हातभार लावायचा म्हणून नोकरी केली तर नवऱ्याला बायको मुलांना सांभाळता येत नाही असेही बोलतात लोक. ते सहन करायचे. तर बायकांनी नोकरी केली तर आपलेच लोक नक्कीच ती बाहेर असते म्हणजे काही तरी असणार बाहेर असेच.. म्हणजे तिला चारित्र्यहिन ठरवून रिकामे होतात.

पण या लोकांच्या विष्यी सतत तक्रार करून काय होणार ? आयुष्य कठीण आहे. रोजचा दिवस जगणे कठीण आहे. दे हरी पलंगवरी असे आयते कोणी देणारे नाही. आणि जे असे देतील त्यांचे हेतू माहिती नाही. त्यामुळे अनेकदा इतर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या सतत तक्रारी करण्यापेक्षा दुर्लक्ष करून आपली energy चांगल्या ठिकाणी invest करावी असे होते आणि जगण्यासाठी ची रोजची धडपड चालू ठेवली जाते.

आता करोना काळात संपूर्ण लॉक डाऊन काळात ज्यांचे हातावरच्या पोटाची कामे आहेत त्यांची कामे बंद. सर्वं लोकांना घरी बसावे लागले. पण जे कायमस्वरूपी नोकरदार होते त्यांना कधी पैशाचे प्रश्न आले नाहीत की रोजच्या जेवणाचा प्रश्न पडला नाही. अमेझॉन वरून ऑर्डर करा नाही तर एकदम धान्य साठा करा ..पैसे कधी येणे थांबले नाही. पण ज्यांचे रोजचे कमावणे आणि पैसे येणे थांबले त्यांना जेवणाची ही भ्रांत होती. अनेक लोकांनी आत्महत्या ही केल्या.

पण बरेच लोकांनी आयुष्य कठीण आहे, पण सतत तक्रारी करून ते सोपे होणार नाही हे लक्षात घेवून त्यातूनही मार्ग काढून तग धरले.

महाभारतात रणभुमीमध्ये आल्यावर अर्जुन हताश होतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतो असे एक वाक्य सांग की ज्या एका वाक्यात आनंदी, सुखी माणूस दुःखी होईल आणि दुःखी माणूस सुखी , आनंदी होईल असे वाक्य सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो ये वक्त भी गुजर जायेगा.. हेही दिवस जातील.

हाच विचार करून आयुष्य कठीण आहे, पण सतत तक्रारी करून ते सोपे होणार नाही हे लक्षात घेवून हेही दिवस जातील असे विचार करून आयुष्य खूप उमेदीने , उत्साहाने घालविणारे लोक आहेत. आणि खरेच तर आहे. कायमस्वरूपी कोणतीच गोष्ट राहणारी नाही. फक्त तक्रारी न करता सातत्याने प्रयत्न कारणे गरजेचे आहे. तर यश , आनंद , सुख ही मिळेल. पण यशाने हुरळून जाणे ही चूक कारण ते यश कायमस्वरूपी टिकविणे याकरिता ही सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे.

आयुष्य सुंदर आहे .तसे ते कठीण ही आहे. म्हणून तर दुःखातून आनंद मिळविताना , काही गोष्टी साध्य करताना , धडपड करून मिळविताना पुढे जाताना जो आनंद मिळतो त्यातून जगण्याची ओढ वाढते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!