आयुष्यात सगळं काही मिळालेली लोकं डिप्रेशनमध्ये का जात असतील ?
आकांक्षा किरणराव आळणे
“आयुष्य”-किती अपेक्षा असतात ह्या आयुष्याकडून,आयुष्य कसे असावे एकदम सुखदायी,आरामदायी अश्या संकल्पना असतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याकडून.नकारात्मकता नको असते कुठलेही tension,दडपन,मानसिक अशांतता नको असते.
फक्त सकारात्मक गोष्टी घडव्यात आपल्यासोबत ह्या भ्रमात प्रत्येक व्यक्ती जगतो. संघर्ष कोणाला टळत नाही.प्रत्येक व्यक्ती इथे संघर्ष करतो.संघर्षाचे स्वरूप अनेक असतात.कोणी आर्थिक बाबतीत संघर्ष करतो कोणी शारीरिक व्याधींनी त्रस्त असतो.काही लोक मात्र खूप सुखी असतात आयुष्यात.
आयुष्यात जे पाहिजे ते सर्व काही असतं त्यांच्याकडे धन-दौलत,शोहरत,पॉवर,रुतबा,high social status कॅटेगरी…!!! पण निरीक्षण करता असे आढळून येते की सर्व काही मिळवले असताना देखील काही लोकं खुश नसतात. कदाचित self-satisfaction त्यांना मिळत नसेल.
मुळात self-satisfaction ही संकल्पना खूप मोठी आहे.
ह्याची सुरुवात मुळात self-actualization,self-esteem ह्या गोष्टींपासून होते.तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे,तुमचे उद्देश्य काय आहे,ते उद्देश पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय काय पाऊल उचलले पाहिजे हे सर्व प्रश्न स्वाभाविक पणे कोणत्याही व्यक्तीला पडले पाहिजे.आयुष्याबद्दल स्वतःबद्दल एक clarity असणे गरजेचे आहे.In short स्वतः च स्वतःची ओळख असणं गरजेचं आहे.
आज काल लोक peer pressure मध्ये येऊन मनाच्या विरुद्ध ही गोष्टी स्वीकारतात म्हणून मग एक अस्थिरता येते आणि ह्याच्या परिणाम self-esteem वर होतो-परिणामी low self esteem होतो.
एक उदाहरण जे आपण समाजात सर्रासपणे बघतो- एक मुलगी अर्पिता जिचे खूप चांगल्या नावाजलेल्या घराण्यात लग्न झालेले आहे.सर्व सुख-सोयी आहेत. हाती सत्ता आहे,बक्कळ पैसा आहे,गाड्या आहेत,महला सारखे घर आहे.तरी सुद्धा ती मुलगी नाखुश आहे तिच्या आयुष्यात.
कारण समाजमान्य चौकटी प्रमाणे घरंदाज स्थळ आले म्हणून तिच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले.पण त्या मुलीच्या इच्छा-‘आकांक्षा’ चा कोणी विचार केला का???
तिला खूप उंच भरारी घ्यायची होती आयुष्यात,IAS बनण्याचे स्वप्न बाळगून ती अभ्यास करायची,अश्या ध्येयवेड्या मुलीचे लग्न लावून देण्यात आले,तिचे विचार लक्ष्यात न घेता.अशी मुलगी सर्व सुख सोयी असताना देखील कशी खुश राहू शकणार???
कारण तिचे मानसिक समाधान ज्या गोष्टी मध्ये(ध्येय गाठण्यामध्ये)होते ते तिला आयुष्यात करताच आलेले नाही परिणामी तिचा low self esteem झाला,घुसमटलेले आयुष्य ती जगत आहे,लादलेले नाते इच्छा नसताना ती निभावत आहे परिणामी ती डिप्रेशन चा शिकार झाली आहे.काय अर्थ उरतो अश्या जगण्याला???तिला वारंवार suicidal thoughts येतात,अनेकदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला,severe डिप्रेशन मध्ये गेलेली अर्पिता आता कसे बसे मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याचा प्रयत्न करते आहे.
सांगायचे तात्पर्य हेच की समाजाच्या चौकटीत बसण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो त्याने आपली खूप घुसमट व्हायला लागते,मानसिक समाधान ही एक अशी गोष्ट आहे ती तेव्हाच साध्य होते जेव्हा आपण आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करतो,आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करतो,शेवटी माणूस आयुष्य हे स्वतः साठीच जगतो ना,
प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे,कोणीही आपल्यावर त्यांचे निर्णय लादत असेल तरी आपला stand हा क्लिअर असावा,कोणाच्या ही दडपणात येऊ नये नाहीतर होते असे की आयुष्य तर जगतो माणूस पण घुसमटत आणि डिप्रेशन मध्ये..!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


