आयुष्यात प्रेमळ व्यक्ती असणं किती महत्त्वाच आहे, पहा!
अपूर्वा विजय तांबे
आयुष्यात प्रत्येक जण हे महत्त्वाचे आहे पण तिची किंमत वेळ आल्यावरच कळते . आयुष्यात तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टी पासून लांब ठेवते जी तुमच्यावर मनापासून प्रेम करते. कुणाला मिळवल म्हणजे प्रेम नसत. तर त्या समोरच्या व्यकतीला आपली कदर असण गरजेच असत, आपल्यावर त्यांचा विश्वास असण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती असायला हवी असे, माझे मत आहे. तुंम्हाला काय वाटते ? जग बोलत स्वःतवर प्रेम करा, देशावर करा , आई- बाबांवर करा तेच प्रेम तिच माया तुंम्हाला दुप्पटीने भेटेल. आयुष्यात खुप अडी- अडचणी येतात पण , मदत करण्यासाठी फक्त आपलेच पुढे येतात. प्रेम माया आपुलकी दाखवणारी मोजकीच लोक असतात बाकी दुनियेला आपण कितीही चांगल वागल तर वाईटच दिसतो .
आपल्या असण्या नसण्याचा त्यांना काही फरक नाही पडत हे आपण जानले पाहिजे . म्हणून म्हणते जेंच्याकडून प्रेम भेटत ते घेत चला माणूस आज आहे , तर उद्या नाही जीवाला जीव देणा ऱ्या मोजक्याच व्यक्ती असतात जे , ” आपल्याला समजून घेतिल , विश्वास ठेवतील ” का ही ओळी आठवल्या मला ,
” गिरगिट जैसा रंग बदलने वाला नही तो ”
” मुझे मुझमें ही रेहने देने वाला चाहिए ”
बाक़ी टाईमपास काय रस्त्याने पण होत असतो पण , खर प्रेम हे खुप ठोकर खाल्यानंतर भेटत . ते ही सांगू शकत नाही आयुष्यभर सोबत राहील की नाही ? मला लोक पसंद करो या न करो मला काही फरक नाही पडत . पण एखादी व्यक्ती अशी हवी जी माझ्या एका साठी पूर्ण दुनियेच्या विरोध्दात जाईल ! भेटेल का अस कोणी मनासारखा ? मी असा विचार नाही करत की पूर्ण जगाने मला चांगल समझाव ज्याच्या नजर जशी तशे आपण दिसतो त्यांना हे लक्षात घ्या . कायम चांगला विचार ठेवायचा मनाला सांगायच ” आयक रे मना ”
आपल्या सोबत कोणी असो नसो , एकटा चालायला शिक दुनिया खुप मतलबी आहे .
प्रेम ह्या नावावर पण , दुनिया बाजार करत आहे . प्रेम हा एक व्यवसाय बनवूण टाकला आहे . माझ्या आयुष्यात पण मी प्रेम केल , पण ते मला भेटले नाही तुंम्हाला ही समजुदे प्रेमळ व्यकती आयुष्यात असण किती महत्त्वाच असत . आम्ही ही एकमेकांवर खुप प्रेम करायचो पण माझ प्रेम आज माझ्या सोबत नाही याच थोड दुःख वाटत . साता जन्माच्या शपथी खाल्या होत्या आम्ही .
जी व्यक्ती मला पाहूण एवढी खुष व्हायची आज त्याच व्यक्तीला मी सोबत असल की त्रास होतो का वो अस ? काय चुक ही नव्हती माझी प्रेमाची इतकी सवय लागून गेली होती की , एक मिनिट ही त्या विना घालव अवघड झाल होत . पण माझ्या भावणेची त्यांना कदर नव्हती . माझ्या भावना त्यांना खेळ वाटत होत्या . माझी काय चुक नसताना त्यांना माझ प्रेम एका ऐकी त्रास दायक का वाटू लागल याचा विचार करून मला खुप त्रास झाला .
तेव्हा समझल एखाद्याला जीव लावला आणि आपली काही चुक नसताना ती जर आपल्याला सोडून जात असेल तर ह्याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात आपल्याला काहीच किंमत नाही . कीती त्रास होतो ना एवढ प्रेमळ व्यकतीला सोडण ज्यांनी चार दिवसच प्रेम दिल पण , ते चार वर्षासारख झाल .
कधीही आयुष्यात कोणावर प्रेम करायच झाल तर , एकच विचार येतो पहिल्या सारखच झाल तर , म्हणून एकच व्यक्ती अशी ठेवावी जी कायम प्रत्येक संकटात माझ्या सोबत राहील . वाईट परिस्थिति आल्यावर मी कामात आहे , आई- बाबा ओरडतील , बॉस सुट्टी देणार नाही , ट्रॅफ्की होत अस कारण देणार नको तर , 2 मिनिटात तुझ्या समोर असेन काम काय नंतर पण करीन अस म्हणून आपला शब्द खर करून दाखवेल अशी साथ देणारी व्यक्ती हवी . कारण तर काय कधीपण भेटतेत . कधी – कधी वाटत एक दिवस मरुण बगाव कोन- कोन रड त आपल्यासाठी जो पर्यंत तिथे आहे दाखवण्या पुरते अश्रु येतील त्यांच्या डोळ्यात तेथिन निघून गेले की पुन्हा जसे होते तसे आनंदी राहतील असलो काय नसलो काय ! आपल्या सारखी खुप भेटतील त्यामुळे कोणी कोणाच विचार नही करत .
आयुष्य असच जगायच असत जे आहे त्यातच सुख मानायच असत जे नाही त्यासाठी रडत बसण्या पेक्षा आहे त्यातच सुखी राहण कधी ही चांगल . जेंव्हा कधी तुम्हाला अस वाटेल एखाद नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा आपल्या मनाला एकच प्रश्न विचारा हे नात तोडायचच होत तर एवढ्या काळ का जपल ?
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख आवडला