Skip to content

आयुष्यात कोणावरही फार काळ रुसू नका….

आयुष्यात कोणावरही फार काळ रुसू नका..


सौ.मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणी चौक)


आयुष्याच्या प्रवासात आपण कितीतरी लोकांना भेटत असतो, सगळ्यांशीच आपले पटतं नाही, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या जगात आहेत , आपण आपल्या अर्थाने त्या गोष्टीचा विचार करतो आणि समोरच्या त्याच्या अर्थाने….

घटना किंवा प्रसंग कुठलाही असेल , बरेचदा काही जणांशी आपले पटत नसते, त्याचा मनात कुठेतरी राग धरून आपण रुसलेलो असतो, काही वेळेस दोन प्रेमळ व्यक्तींमध्ये लटका राग धरून रुसने वेगळे आणि काही वेळेस खरोखरचं रुसून बसणे वेगळे…

काहीजण नमतं घ्यायला तयार नसतात , मीच का स्वतःहून बोलायचे जर एखाद्या वेळेस समोरच्या व्यक्तीशी भांडण झाले असेल, तर झालेल्या घडून गेलेल्या गोष्टी किंवा कोणी अपमान केला असेल, तर मनुष्य आयुष्यभर त्या गोष्टी विसरत नाही, आणि त्या व्यक्तीशी सुद्धा बोलत नाही, अशी टोकाची भूमिका भरपूरदा आपल्याला बघायला मिळते….

आता कुठली गोष्ट असेल , कोणी दुखावले असेल, तर माणूस आहे, शेवटी काही गोष्टी स्वाभाविकच आहे , परंतु त्यासोबतच आपण विचार केला पाहिजे, कुठली गोष्ट निदान किती वेळ ताणून धरायची, आपण फार काळ आयुष्यात कुणावरही रुसू नका….

हे बघा एक खूप मजेदार गोष्ट आहे, माणसाला कुठली भाषा बोलता येवो अथवा ना येवो , परंतु शरीराची भाषाशैली ज्याला इंग्रजीत बॉडी लैंग्वेज म्हटले जाते, ही एक मात्र अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला कळते , कोणी तरी ओळखीची व्यक्ती दिसल्यावर आपण फक्त स्माईल जरी केली, तो सुद्धा एक भावनेचा संदेश असतो,

तसेच जर आपण कुणावर रुसलेलो असेल ,तर समोरच्या व्यक्तीला बघून त्याला सुद्धा ते कळते आणि आपल्याला सुद्धा म्हणजे कुणाच्या मनात काय चाललंय हे माहिती असते, परंतु त्याची दखल घ्यायला कुणाकडेच वेळ नाही, आयुष्य खूप सुंदर आहे चांगल्या लोकांसोबत घालवा आणि आयुष्यात कोणावरी फार रुसू नका ….

काय माहिती त्या व्यक्ती सोबत रुसल्यामुळे आपण त्या आनंदाच्या क्षणांचा आनंद घेऊ शकणार नाही, बऱ्याचदा असे होते की आपण रुसून बसलेलो असताना समोरची व्यक्ती आपल्याला मनवण्यासाठी खुप प्रयत्न करते, परंतु आपण मात्र तीच गोष्ट घेऊन बसलेला असतो,

शेवटी मात्र ती व्यक्ती प्रयत्न करून सगळे उपाय करून थकून जाते आणि सोडून देते गोष्टी प्रत्येकाकडून घडतात कधी आपल्याकडून तर कधी समोरच्याकडून पण आपण फक्त त्या गोष्टीला सर्वतोपरी आपल्या साच्यात सामावून घेण्याचा विचार करत असणार ,तर मात्र कुठेतरी आपली गफलत होते ,….

कारण आपल्या आयुष्याचा आनंद आपल्याला पूर्णतः घ्यायचा असेल, कोणाविषयी आपल्या मनात राग ,रुसवा मनात ठेवून आपण तो आनंद नाही घेऊ शकणार …..

पाण्याच्या मध्ये काही अडकले असेल, तर तिथे पाण्याचा प्रवाह बंद होतो , त्याप्रमाणे कोणाविषयी रुसवे-फुगवे मनात ठेऊन जर आपण जगलो तर आपल्या आयुष्यात सुद्धा असेच ब्लॉक तयार होत जाणार , आणि गंमत म्हणजे यामुळे समोरच्या व्यक्तीचे काहीचं नुकसान होत नसते, आपणचं आपल्या नुकसानाला जबाबदार असतो, आपले मानसिक आरोग्य जर आपल्याला खरंच सुव्यवस्थित ठेवायचे असेल तर असे छोटे छोटे तयार होणारे ब्लॉक वेळीचं आपण काढून टाकले पाहिजे,
अन्यथा नुकसान आपलेच असते….

ते म्हणतात ना

“मन मे कुछ भरकर जिएंगे,
तो मन भरकर कैसे जियेंगे”

याप्रमाणे कारण आपल्या शरीराचे दुखणे आपण लवकर मनावर घेतो, परंतु आपल्या मनाच्या दुखण्याकडे आपण लक्ष देत नाही त्यामुळे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे ,
काही वेळेस आपल्या स्वभावामुळे सुद्धा आपल्याला काही गोष्ट करायला जड जाते, कारण आपणच आपल्याला असे बनवून ठेवलेले असते आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो…

आमच्या मॅडम म्हणतात जर तुमच्याकडे मी टोमॅटो दिले पाच आणि सांगितले की टोमॅटो तुम्हाला पंचवीस दिवस तुमच्या सोबत ठेवायचे आहेत असेचं, शक्य आहे …का.? त्यातून एक किंवा दोन चांगले असू शकतात,

परंतु नंतर त्यातून तुम्हाला घाण वास येईल ते सडतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला गुदमरल्यासारखे होईल .. अगदी आपल्या मनाचे सुद्धा असेच असते , आपण अशा काही गोष्टी साठवत राहिलो तर ते आपल्या फायद्याच्या तर मुळातच नसतातचं.

परंतु त्यामुळे आपण आपल्या मानसिक आरोग्याशी खेळ करून घेतो…, असे नाही की कुणावर रुसू नका, परंतु काही गोष्टींना विशिष्ट मर्यादा असते, फार काळ रुसून बसणे योग्य नाही ,कारण आपण आपल्या आरोग्यासाठी इतके तर जरुर करु शकतो….

बघा पटतंय का…….?


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आयुष्यात कोणावरही फार काळ रुसू नका….”

  1. गिरीश गजानन गानू

    आपण नाते जपायचे सर्व प्रयत्न करतो. पण समोरच्या व्यक्तीला आपली कदरच नसेल आणि येता जाता आपला अपमान करण्यातच त्या व्यक्तीला धन्यता वाटत असेल तर आपण त्या व्यक्तीवर का रागावू नये ? शेवटी आपल्याला ही स्वाभिमान आहे की. Sorry. पण काही व्यक्ती आशा आहेत ज्यांच्याशी मी बोलत नाही. आणि या पुढेही बोलणार नाही. माझा त्यांच्यावर राग आहे आणि तो कायम राहील.कारण मला त्यांचा अत्यंत वाईट अनुभव आला आहे . मला त्यांची चीड आहे आणि ती ह्या आयुष्यात तरी जाणार नाही.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!