Skip to content

आयुष्यातले अर्ध्यापेक्षा जास्त दुःख खऱ्या माणसांवर संशय घेतल्याने उद्भवतात.

आयुष्यातले अर्ध्यापेक्षा जास्त दुःख खऱ्या माणसांवर संशय घेतल्याने उद्भवतात.


मयुरी महेंद्र महाजन


“जिंदगी में झुठें आदमी से प्रेम, और सच्चे आदमी के साथ गेम,”

कभी नही करना चाहिए”
आयुष्याच्या प्रवाहात खरी माणसें ओळखता आली, तरं…व्वा…. जगण्याचा आनंद खऱ्या अर्थाने जाणवतो,सत्याला नेहमी कसोटी असते, असे म्हणतात, तसेच खर्‍या माणसाला , तो खर आहे, हे पदोपदी सिद्ध करावे लागते, पण हेही तितकेच खरे आहे ,की जो खरा आहे, त्याला ते कोणालाही सांगण्याची गरज नाही ,कारण जी माणसे आपल्याला ओळखतात ,त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते ,आणि जी आपल्याला ओळखत नाही ,त्यांना आपल्या स्पष्टीकरणावरती अजिबात विश्वास नसतो,..

आपण एक मजेदार आणि गंमतीशीर गोष्ट बघणार आहोत, बघा एका ऑफिसमध्ये बॉस, वर्कर आणि इतर लोक काम करत असतात, आता जो कंपनीचा मालक असतो, त्यांनी आपल्या कंपनीला शून्यातून निर्माण करून इथपर्यंत आणलेले असते, आणि त्या सर्व कारकिर्दीत ईथपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना बघितले, कितीतरी संघर्षातून त्यांनी आपल्या जीवनाला समृद्ध केलेले असते,

परंतु त्यांचे या पॉइंटला असणे ,त्याच्या जवळच्या लोकांसाठी ते जरा हेव्यादाव्याचे होते, त्या गोष्टीचा त्यांना हेवा वाटायचा ,त्यामुळे ते नेहमी संधीच्या शोधात असायचे, परंतु त्यांचा हा संघर्ष आणि या संघर्षातून त्यांना कुठेही थांबता साथ देणारा एक साथी ,त्यांच्या सोबत असायचा, की ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक चांगला ,वाईट प्रसंग या सर्वांचा तो भागीदार होता, त्याचे नाव शाम ….

शाम तसा हुशार ,आणि बुद्धिमान परंतु जगण्याच्या प्रवासात कधीतरी एखादी चूक होते, त्यामुळे केलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी वरती पाणी फिरते, मालकाच्या विरोधात विरोधकांनी कांड करायला सुरुवात केली, आणि या सर्वांमध्ये फासे फिरले, की त्या सर्व सर्व गोष्टींचे ब्लेम हे शामवरती आले, आता विश्वास किती असला तरी सगळ्या गोष्टी मात्र शामच्या बाजूने झुकत होत्या, त्यामुळे त्याची शिक्षा शामला व्हावी, असे सर्वांचे म्हणणे होते ,

मात्र या गोष्टीचा मालकाला मनस्ताप झाला खरे, तू असा दगा देशील, असं वाटलं नव्हतं ,तुला शेवटचे काही सांगायच आहे का ?श्याम म्हणतो मालक इतकी वर्षे ज्या भावनेने आणि ज्या विश्वासाने तुम्ही मला सांभाळलं, त्याच विश्वासाने सांगा, तुमच्या मनाला विचारून तुमचा श्याम चुकला कुठे????????? आयुष्याच्या अशा कितीतरी संकटांचा आणि अडचणींचा सामना केलास रे, पण मी कुणाला फसवून पुढे गेलो नाही, त्यामुळे कोणी मला फसवतयं हे कळल्यावरती, स्वतःची फसवणूक करून मी कोणाला पुढे जाऊ देण्याची चूक करणार नाही, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते पण….

ज्या दिवशी कंपनीच्या मालकाला झालेल्या घटनेचा सूत्रधार हा शाम नसून, त्यांच्यातील असणारी व्यक्ती आहे ,हे कळाले, त्या दिवशी मालकाच्या डोळ्यात पाणी ,आणि आपण निर्दोष असणार्‍या आपल्या खऱ्या जिवलगाला शिक्षा केल्याचे दुःख होते, माझ्याकडून एवढी मोठी चुकी कशी झाली??? मी मूर्ख आहेस,,,,, मी असे कसे करू शकतोस ??????श्यामने मला प्रत्येक परिस्थितीत मदत केलेली आहे ,,,,तो प्रत्येक वेळेस माझ्यासोबत न थांबता उभा होतास ,,,,आणि मी हे काय केलं????? मी शामचा गुन्हेगार आहे?????

असे म्हणत मालक स्वतःचं, स्वतःला, विचारू लागला की मला त्या वेळेस का ओळखता आले नाही, की माझा शाम खरा होतास ,आयुष्यात सगळीच माणसे खोटी नसतात,,,, काही आपल्या कामाप्रती पूर्ण समर्पण देणारीसुद्धा असतात, अशी माणसे चुकू शकतात, पण कधी तुम्हाला फसवू शकत नाही, खऱ्या माणसांवरती कधी संशय घेऊ नका ,,,

कारण आयुष्यात अर्ध्यापेक्षा जास्ती दुःख खऱ्या माणसांवरती संशय घेतल्याने उद्भवतात,,,, जर तुम्ही कोणाला फसवून यशस्वी झाला, तर हे समजू नका, की तुम्ही खूप हुशार आहात, फक्त एवढेच की त्या व्यक्तीचा तुमच्यावरती विश्वास जास्त होता ,आपल्याला किती जण विश्वासू आणि खरा समजतात, आणि आपण त्या पात्रतेच्या आहोत का ??????

हे सुद्धा कधीतरी तपासायला हवेत, कारण आपल्या आयुष्यात खरी माणसे गमावून ,आपल्याला कधीच खरी माणसे मिळत नाही, पदोपदी आपण ह्या गोष्टी अनुभवतो, खरी माणसे हि हिरे आणि मोत्यां प्रमाणे असतात, जी खुप नशीबावंताला मिळतात ,जर आपल्या आयुष्यात अशी खरी माणसे आहेत, जे आपल्या निस्वार्थ समर्पण आपल्याला देत असतील ,तर त्यांना गमवू नका, कारण संशयाचा वारा जरी लागला, तरी या मोत्यांची माळ कधी हातून निसटून गळून पडेलं, सांगता येत नाही,

संत तुकाराम महाराज म्हणताता….
।।संशयाचा वारा ,न लागो देवा ।। ।।कुबुद्धी न येवो, घडो सदा संत सेवा ।।


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!