आपल्या सर्वांसाठी एक विरंगुळा किती महत्वाचा असतो माहितीये का ?
टीम आपलं मानसशास्त्र
आजचे युग हे superfast युग मानले जाते. सगळ्या गोष्टी पटापट करणे गरजेचे असते. दिलेली वेळ महत्वाची असते. टार्गेट असतात. सतत काम मग घरकाम असेल नाही तर ऑफिस काम यात अडकून पडतो आपण.
जेंव्हा एकसुरी काम करून करून कंटाळा येतो तेंव्हा मनाला ताजे तवाने करण्यासाठी आपण जो वेळ काढून त्यात आपल्याला आवडणारी कोणतीही कृती करतो त्याला विरंगुळा म्हणतात. तो आपला एखादा छंद असेल जसे, चित्रकला, गायन, वादन ,नृत्य ,वाचन , संगीत , स्वैर भटकंती , शांतपणे एखाद्या झाडा खाली बसणे , झोपाळयावर झोके घेणे , विहिरीत, तळ्यात पोहणे आदि काहीही विरंगुळा म्हणून करता येते .मित्र मैत्रिणीच्या सोबत गप्पा , लहान मुलांच्या सोबत लहान होवून खेळणे . काही तरी नावीन्यपूर्ण करणे.
अट एकच, त्यामुळे आपल्या मना ला प्रसन्न वाटले पाहिजे आणि मूळ कामाकडे परत जाताना, अधिक उल्हासाने, उर्जेने जावेसे वाटले पाहिजे.
असेच आहे कुटुंब यात ही. कुटुंबात नवरा बायको दोघेच आहेत किंवा त्यात नवऱ्याचे आई वडील . लग्नानंतरची सुरवातीची काही वर्ष आनंदाने जात असतात. एकमेकांना समजून घेणे , स्वभाव , आवडी निवडी काय ते समजून घेणे. त्यानुसार वागणे , खाण्या पिण्याची आवडी निवडी . तसे खाद्य पदार्थ करणे. सुरुवातीला सगळ्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष जाते.
जोडीदाराला समजून घेणे ही होत असतें . परंतु कालांतराने त्यांच्या संसारात ही एकसुरीपणा येतो. रोज तेच चेहरे , तेच बोलणे , तशाच गमती जमती. रोज तेच तेच झाल्यावर एकसुरीपणा आल्यावर कंटाळा येवू लागतो. काही वेळेस व्यक्ती असतील किंवा त्याच गोष्टी त्याचा. मग काही वेळेस दोष दिसू लागतात. जसे बघू तसे . गुण दोष .. यात कधी गोडी गुलाबी तर कधी भांडण ही वाढतात. तेच तेच आयुष्य याचा ही कंटाळा येवू लागतो.
अशा परिस्थिती मध्ये जर घरात बाळ येणार याची चाहूल लागली . तर सगळे विसरून सगळे त्या तयारी मध्ये लागतात. बाळ येते तेव्हा सगळे घर त्याचा विरंगुळा म्हणून अवतीभोवती फिरत असते.
आपल्या सर्वांसाठी एक विरंगुळा किती महत्वाचा असतो माहितीये का ?
१. एकसुरीपणा कमी करणे. कोणताही छंद असो किंवा विरंगुळा असो . तेच तेच वातावरण, तेच काम , त्याच घरातल्या व्यक्ती , स्वभाव , अपेक्षा यात अडकून एकसुरीपणा येत जातो. तो कमी करण्याकरिता कोणताही विरंगुळा कधी ही चांगलाच. यातून एकसुरीपणा कमी होतो.
२. प्रेरणा मिळते. विरंगुळा आपल्या मूळ कामातून थोडा बदल घडवून आणतो . मूळ कामाकडे परत जाताना, अधिक उल्हासाने, उर्जेने जावेसे वाटते. काम करण्याकरिता नवीन प्रेरणा मिळते .
३. उत्साह निर्मिती , तणाव कमी करता येतो ..लहान बाळ , वयस्क व्यक्ती यांच्यात , त्यांचे बोलणे त्यांचे करणे, बाळाच्या नविंनविन गोष्टी असतील किंवा संगीत , नृत्य , वादन , पेंटिंग , हस्तकला , यात व्यक्ती दंग होते आणि आधीचा ताण , तणाव असेल , निराशा हे सगळे विसरून नवीन उत्साह निर्मिती होते.
४. नाती नव्याने फुलविण्यात मदत…नात्यामध्ये ही तोच तोपणा आला की. कंटाळवाणे होत जाते. त्यापेक्षा काही विरंगुळा असेल , कधी आवडीच्या गोष्टी असतील , सहली असतील , कधी निसर्गरम्य ठिकाणी जाणे असेल , समुद्र किनारी फिरणे असेल ,एकमेकांसाठी एकत्र वेळ घालविणे असेल. किंवा दोघांच्या नात्यात चिमुकल्या तीसऱ्याची हजेरी असेल तर तो खूप मोठा विरंगुळा असतो. सगळे विसरून त्याचे एक नवीन विश्व तयार होते. . तर त्याच्या करण्यात , त्याच्याशी खेळण्यात , नवनवीन गोष्टी शिकविण्यात एक आनंद मिळत असतो. आणि एकमेक बांधील ही राहत असतात.
मग लहान असताना असो किंवा मुले मोठी झाली तरी असो. मुलांच्यामध्ये सगळे विसरून जायला होते. अगदी आपापसात जे वाद असतील ते ही ..किंवा मुलांचे अभ्यास , त्यांची प्रगती , कधी मनोरंजन , त्यांचे छंद , या गोष्टीत सगळे विसरून तो विरंगुळा नाती नव्याने फुलाविण्यास मदत होते.
मुलांच्या शिवाय जीवन अर्थहीन होते नाही तर. तोच तोचपणा . एक मेकांच्या स्वभावाचे कांगोरे माहिती झाले असतात. त्यामुळे स्वभाव गुण या पेक्षा नंतर दोष च पाहिले जातात. त्यामुळे दोघांच्या व्यतिरिक्त आयुष्यात मुले हे घराला घरपण देण्याचा नकळत दुवा असतात.
५. मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्या भेटी गाठी यातून जुन्या आठवणी , नवीन गोष्टी discuss होतात . त्यातून उत्साह आणि मन प्रफुल्लित होते.
६. नवीन स्किल develop करताना , रोज नवीन गोष्टी , techniques शिकावी लागतात. त्यातून ही नवे काही शिकण्याचा उत्साह वाढत असतो आणि विरंगुळा ही मिळतो तो महत्वाचा असतो.
आयुष्य खूप सुंदर आहे . आणि ते अजून सुंदर , उत्साही बनविण्यासाठी , त्यात चैतन्य निर्माण होण्यासाठी तोच तोच एकसुरीपणा काढून आपल्या जीवनात थोडा बदल , थोडा विरंगुळा यांची जोड देवून ते अधिक उल्हसित करा. आपला सकारात्मक विरंगुळा शोधा. थोडा काळ सोशल मीडिया हा विरंगुळा ठीक आहे पण त्याच्या व्यसनाधीन होवू नका.
अनेक व्यक्ती , छंद , वाचन , कला , नृत्य असेल , वादन असेल , गायन असेल , पेंटिंग , हस्तकला , नवीन गोष्टी शिकत राहणे असेल . अगदी निसर्गात भटकंती असेल जरूर करा. आपले मूड सोशल मीडिया किंवा इतर व्यक्तींच्या वागण्याने नकारात्मक करू नका.
सकारात्मक गोष्टीतून आनंद मिळवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


