Skip to content

आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना आयुष्यभर छळत राहते.. यावर काय करावं?

आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना आयुष्यभर छळत राहते.. यावर काय करावं?


सोनाली जे.


माझीच भाची ३६ वर्षाची आहे. लग्नाकरिता स्थळे बघत आहेत . जशी २६ वर्षाची झाली. नोकरी ला लागली तेव्हापासून “वर स्थळ मोहीम ” सुरू आहे. चांगली शिकलेली एमएससी. झालेली आहे. चांगल्या MNC मध्ये permanent job आहे. दिसायला सुंदर आहे. गालावर सुंदर खळी पडते. केस silky , अतिशय लाघवी आहे , स्वभावाने सगळ्यांच्या मध्ये मिसळणार, मदतीला तत्पर , अनेक नाट्य स्पर्धेत बक्षिसे मिळविली आहेत. गाण्याच्या स्पर्धेत यश मिळविले आहे.
भरपूर पगार , हौशी , आक्ख्या भारतभर भ्रमण झाले च आहे. संपूर्ण युरोप ही . ती हौशी तसे घरात आई , वडील , धाकटी बहीण , आजि ही खूप हौशी.

१० वर्ष तिच्या करिता स्थळे बघत आहेत. पण अजून काही योग्य स्थळ तिच्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. सुरुवातीला खूप चांगली चांगली मुलांची स्थळे येत होत होती. पण अजून चांगले मिळेल , अजून थोडे तिच्या योग्यतेचे मिळेल, तिची पात्रता खूप आहे तसाच किंवा तिच्या पेक्षा थोडा जास्त पात्र असा मुलगा बघुयात. तसा शोधू ..असे करत करत चांगली स्थळे ही नाकारली.

आणि बरोबरच्या मुलांची , एक दोन वर्ष मोठी मुले त्यांची ही लग्न झाली. आता वय वाढू लागले तसे तिच्या वयाची स्थळे खूप कमी ..जवळजवळ मिळतच नाहीत आता.

आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना आयुष्यभर छळत राहते.. यावर काय करावं?

१. माझ्या भाचीने आता मनाची तयारी केली आहे. जेव्हा जे मिळेल तेव्हा ते मिळेल. कारण आता past मध्ये आपल्याच कडून काही गोष्टी दुर्लक्षित केल्या गेल्या. आणि आता तिला हे पटायला लागले की तेव्हा ज्या कारणांवरून चांगल्या चांगल्या मुलाना नकार दिला. का तर त्यांची पात्रता नाही. ती आपल्या एवढी किंवा आपल्या पेक्षा थोडी सरस नाहीत.

पण आता जेव्हा तीच मूले आता एवढी प्रगती करून पुढे गेलीत हे बघून आपण तात्पुरत्या दिसणाऱ्या गोष्टींचा विचार केला आणि दूरदृष्टी ठेवली नाही या नकारात्मक भावना आता आयुष्यभर छळत आहेत. पण म्हणून त्यातच राहिले तर अजून त्रास होतो म्हणून जे आहे ते स्वीकारायचे ही मनाची तयारी केली आहे तिने.

२. आपल्याला आनंदी ठेवण्याकरिता जे करता येईल ते प्रयत्न करते. बाहेर पर्यटन , adventure , नाटक , गाणी , मित्र मैत्रिणी यांच्या सोबत धमाल मस्ती.

आवडते छंद जपण्यातून उत्साह वाढवू लागली, विविध ठिकाणी पर्यटन , विविध देश फिरताना तिथल्या गोष्टी शिकता आल्या , तिथल्या लोकांची वृत्ती , त्यांचे चांगले गुण अभ्यासता आले. त्यातून ही वैचारिक प्रगती आणि यातून तिचा wide angel निर्माण झाला.

जग , आपले विश्व हे केवळ मर्यादित नसून ते भरपूर विशाल आहे. त्यात घेण्यासारख्या , शिकण्यासारखे अनेक विषय आणि गोष्टी आहेत. Sky is the limit. आपल्यावर आहे आपण किती घ्यायचे.

३. प्रगल्भता येत गेली , maturity येत गेली :

वारंवार जे अनुभव येत गेले त्यातून वैचारिक प्रगल्भता येत गेली. निर्णय प्रक्रिया पक्की होत गेली. Logical आणि reasoning capacity develope करत गेलीं त्यातूनच प्रोब्लेम solving capacity वाढवत गेली.

पूर्वी जे मर्यादित ज्ञान होते त्यामुळे काही निर्णय घेणे चुकले असेल . तसे आयुष्यात पुढे चुकू नयेत . म्हणून स्वतः ची सर्वांगीण प्रगती करत गेली. विविध अनुभवातून शिकण्याची वृत्ती आणि वैचारिक प्रगती वाढली. त्यातून बौध्दिक प्रगती करत गेली.

तसे बघायला गेले तर अनेकदा प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये. एखादा हुशार , topper मुलगा नोकरीला आधी लागतो त्याला दहा वर्ष मेहनत करून प्रमोशन आणि पगारात बढती मिळते . तर दहा वर्षानंतर अगदी दोन चार वर्षात जॉईन झालेला त्याच कंपनी मधला मुलगा त्याच्या एव्हढा पगार आणि डायरेक्ट त्याच्याच पोस्ट वर काम करत असतो . तेव्हा साहजिकच मनात ही भावना निर्माण होते की, आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये..

पण ही भावना त्रासदायक ठरू नये. आपल्याला आयुष्यभर छळू नये म्हणून हा विचार करतो तो senior employee की तो नवीन मुलगा आपल्या पेक्षा पुढच्या generation मधला आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञान , अभ्यासक्रम होता त्यामुळे तो updated आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्याने लेटेस्ट स्किल्स ही develop केली आहेत.

त्यामुळे तो ही त्याच्या पात्रतेनुसार ही पोस्ट आणि salary deserve करतो हा सुज्ञ विचार करून आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना आयुष्यभर छळत जरी असेल तरी मनातून काढून टाकेल.

मुलींच्या आईचे एक वाक्य प्रसिद्ध झाले आहे की, “मी आयुष्यात जे भोगले ते माझ्या मुला-मुलीला भोगावे लागू नये?” काय म्हणावे याला. अरे संसार मुला – मुलीना करायचा आहे की आईला? आईची आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना आयुष्यभर छळत राहते..

मुलीचे , मुलाचे लग्न करून दिले तरी सतत फोनवरून , भेटून चौकशी. काय तर म्हणे काळजी वाटते. मला माझी योग्यता , पात्रता असून असे स्थळ मिळाले आणि आयुष्यभर मला ते म्हणतील तसे वागावे लागले .ही कुरबुर आईची चालू असते. आणि आपल्या मुलाने , मुलीने हे सहन करू. नये. त्यांच्यावर अशी वेळ येवू नये म्हणून बहुदा , नक्की का हेच समजत नाहीये, उठसूट मोबाईल करून ढवळाढवळ करताना आपल्या संसाराच्या वेळी इतके रोजरोज लक्ष आपल्या पालकांनी दिले होते का?

मग तुमचे संसार अयशस्वी झाले का?आणी आताच का या पिढीत वादाचे प्रमाण जास्त आहे हे लक्षात घ्या की, तुमच्याच इतक्या लक्ष घालण्यानेच नक्की. मग थोडे त्यांना समजू द्यात, मिटवू द्यात, लांबून फक्त लक्ष ठेवा की.

प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार, आपल्याला तरी मिळणार का , आणि जरी मिळाली तरी आपण स्वतःच्या मुलांना सरकारी नोकरी लावु शकतो कां? याचा विचार करा.त्यांना त्यांची पात्रता असून ही नोकरी मिळणे अवघड असेल तरी परत परत प्रयत्न करू द्या. जिद्द निर्माण करा. किंवा त्यांच्यात जिद्द निर्माण होण्याकरिता guidance करा.

आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना
आयुष्यभर छळत राहते..नुसती डिग्रीवाली, मोठ्या मोठ्या पॅकेज वाली पण बघायची असतील तर, जरा रात्री बारमधे जाऊन बघा, अनेक उच्च डिग्रीवाले, किंवा मोठ्या पॅकेजवाले पण दिसतील, यातील काही उच्च शिक्षित बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाने की दवासे प्यार करते है !

आता या covid काळात अनेक लोकांचे जॉब गेले. कारण काय तर कंपनी चे नुकसान , किंवा कंपनी ला एव्हढे employee ठेवणे परवडत नव्हते. पण या नोकरी गेलेल्या लोकांनी मिळतील ते जॉब स्वीकारले .

अगदी हे जाणवत असून की , आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ..पण आहे त्याचा स्वीकार केला कारण देशाची , अनेक देशांची आर्थिक परिस्थिती ढासळली .. अनेक कंपन्यांची परिस्थिती ढासळली .. जॉब न मिळण्यापेक्षा, बेकार राहण्यापेक्षा जे मिळत आहे ते स्वीकारण्याची सकारात्मकता यांनी ठेवली.

आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना
आयुष्यभर छळत राहते.. यावर काय करावं?

१. असमाधान , अशांती काढून टाकावे. आणि जे आहे त्याचा स्वीकार करावा.

२. सतत चे मनातले गैरसमज जसे माझी पात्रता खूप हे काढून टाकावे.

३. Comparision बंद करावे. तो माझ्या पेक्षा वयाने , अनुभवाने लहान तरी त्याला प्रमोशन दिले , मी senior तरी मला दिले नाही हे विचार , नकारात्मक गोष्टी काढून टाकाव्यात आणि असे त्याच्यात काय प्लस पॉइंट आहेत आणि माझ्यात नाहीत हे विचार जरूर करा आणि स्वतः ला develope करण्याचे प्रयत्न करा. स्किल प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करा.

४. सकारात्मकता ठेवा. :आज जरी मला माझ्या पात्रते नुसार मिळाले नसेल तरी उद्या नक्की मिळेल हा ठाम सकारात्मक विश्वास ठेवा.

कधी कधी एखाद्याची बोलण्याची पद्धत , शांतपणे , विचारपूर्वक बोलणे , maturity ही जास्त प्रभावी पडते. तर कधी कधी साधे पण टापटीप राहणे कोणाला आवडून जाते .त्यामुळे ही एकच पोस्ट असणारे , समान शिक्षण असणारे. , अनुभव असणारे यात एकाचे प्रमोशन होते पण दुसऱ्याचे नाही असे घडते. त्याला वाटते की माझी पात्रता असून मला प्रमोशन नाही मिळाले. मग काही वेळेस कमिटी मेंबर नी पार्सिलिटी केली असं ही आरोप , विचार केले जातात.
तेव्हाही साहजिक वाटते की , आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.

या ऐवजी शांतपणे हा विचार करा की त्याच्या कडे कोणते additional plus point आहेत. आणि आपल्यात काय कमतरता आहेत याचा शोध घ्या. आणि जिथे गरज असेल तिथे स्वतला सुधारणे गरजेचे.

आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना आयुष्यभर छळत राहते.. यावर काय करावं?

या विचारातून स्वतः ची आणि इतरांची ही सुटका करून घ्यावी. आणि हे लक्षात घ्यावे की आताचे युग , पिढी ही खूप हुशार , आणि आधुनिक आहे , विचार असतील , नवे शोध असतील , नवीन तंत्रज्ञान , याने परिचित असतात. अनुभवी असतात. त्या गोष्टी आपण शिकण्याकडे कल द्या. तुमच्यात ही आणि त्यांच्यात ही समान पात्रता आहे असे समजणे चुकीचे. काही ना काही कुठे तरी कमी जास्त असते. त्याचा विचार करून स्वतः ला develope करा.

“जो जे वांछील तो ते लाहो” या ओळीकडे सहज लक्ष गेलं. या ओळीचा सरधोपट अर्थ असा आहे, की ज्याची जी इच्छा असेल ती‌ पूर्ण होवो. वर वर पाहता हे फारच सोपं आणि सामान्य आहे असं वाटतं, पण खोलवर विचार करायचा प्रयत्न केल्यास हे मागणे किती गहन आणि व्यापक आहे हे लक्ष्यात येतं.

“जो जे वांछील तो ते लाहो” म्हणले तरी प्रत्येकाला त्याला जे पाहिजे ते लाभते का ? नाही ना ? म्हणूनच जे आहे, ज्यास आपण पात्र झालो आहोत त्यात आनंद शोधला पाहिजे. सुख , शांती समाधान शोधले पाहिजे आणि टिकविले पाहिजे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आपल्या पात्रतेनुसार जे हवंय ते मिळत नाहीये.. ही भावना आयुष्यभर छळत राहते.. यावर काय करावं?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!