Skip to content

आपल्या अंतर्मनातली खळबळ आपल्याला सामान्यपणे जगू देत नाहीये..

अंतर्मनातील खळबळ


गीत किरण वाळवेकर

(मानसशास्त्र विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका)


जयेश वर्गात नेहमी पहिला नंबर काढत असे. आईवडील खूप कौतुक नि प्रेम करतात. पण आता जयेश परीक्षेच्या वेळी आजारी पडला. पुढच्या वेळीही असेच झाले. सर्व शारीरिक तपासण्या झाल्या. आईवडील खूप अस्वस्थ झाले. काय होत या मागचं कारण?

आईवडीलांच प्रेम हे आपल्या परीक्षेतील गुणांमुळेच आहे, हा एक ठसा जयेशच्या अंतर्मनात उमटला होता पण आता आपला नंबर टिकणार नाहीं असे त्याला वाटू लागले होते. प्रतिष्ठेचा धोका.. प्रेम गमावू ही भीती मग ऐनवेळी त्याच्या अंतर्मनानी ऐन परीक्षेच्या वेळी आजार आणून हा संघर्ष सोडवला. आजारी पडले की आईवडील खूप लक्ष देतात, काळजी घेतात मग प्रेम व प्रतिष्ठा दोन्ही ही टिकतात. आता इथे आजारपणाचा तोडगा त्याने मुद्दाम विचारपूर्वक शोधला होता असे मात्र नाही .त्याच्या अंतर्मनाची ही कामगिरी होती.

चोवीस वर्षाची रेवती खाजगी नोकरी करत होती. तिच सतत डोके दुखू लागले. खूप डॉक्टर्स सर्व तपासण्या झाल्या, अखेर तिला मानसोपचारतज्ञाकडे नेण्यात आले. त्यांनी तिला त्यांच्या तंत्राने बोलत केले.

ते म्हणाले की तुमची डोकेदुखी ढोंग आहे असे नाही पण त्याचा उगम तुमच्या अंतर्मनात आहे. ती बोलू लागली…गेली काही वर्ष माझ एका तरुणावर प्रेम आहे. पण अचानक त्याने माझ्याशी संबंध तोडले. उपचारकर्त्यांनी विचारल.

तुम्हाला काय वाटल? ती म्हणाली .. मला काहीच नाही वाटलं. मी ताठकण्यानी उभी आहे. डॉक्टर म्हणाले.. अस काही नाही. तुम्हाला राग, चीड, दुःख सार काही वाटतयं. आणि ती म्हणाली, अगदी खरं. माझ्यामध्ये काय दोष आहे की त्याने मला नाकाराव ? समोर राहणारा तो येता जाता दिसला की माझं डोकच उठत..ठणकू लागतं.

तिच्या मनातल्या नकारात्मक भावना बाहेर आल्या होत्या, तिच्याशी आणखी थोडी सल्लामसलत झाली. तिची डोकेदुखी थांबली. बोलण्यातील,लिहण्यातील चुका, काही गोष्टींच विस्मरण यातूनही व्यक्ती आपल्या अंतर्मनातील इच्छाच पूर्ण करत असते .

भयगंड (फोबिया) म्हणजे एखाद्या गोष्टींचे आत्यंतिक भय मनात दडलेले असते अशा तसेच हिस्टेरियासारख्या मानसिक व्याधीतही व्यक्तीच्या पूर्व आयुष्यात दडलेल्या धक्कादायक घटनाच काही वेळा कारणीभूत असतात असे आढळले आहे. मनात दडलेल्या नकारात्मक भावना व्यक्त होण्यासाठी कधी घागर फुंकणे,अंगात येणे असे ही प्रकार होताना दिसतात.

मनात उसळलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी संवाद हवा, रागीट नवऱ्याला त्रासलेली विवाहिता आईकडे गेल्यावर आई तिला जवळ घेते, मुलगी व्यक्त होते, अश्रू ढाळते. नोकरीत होणारा त्रास महेश मित्राजवळ बोलतो,त्याला हलक वाटत. काही अंशी हाही एक उपचारच. पण आवश्यकता पाहून समुपदेशकाची, मानसतज्ञांची मदत घेणे उपयुक्त.

समुपदेशक रुग्णाच्या भावनांना मोकळी वाट करूण देऊन त्यांच्या अंतरमनाचा शोध घेतो व त्याच्या समस्या सोडवण्याचे मर्म त्याला प्राप्त करून दिले जाते.

सर्वप्रथम सिग्मंड फ्राईड या मानस शास्त्रज्ञाने अबोध मन या संकल्पनेवर भर दिला. मनाच्या ज्या भागाची जाणीव असते ते बोधात्मक मन. पण त्यापेक्षा अनेक पटीने मोठा असणारा मनाचा भाग हा अज्ञात असतो ते अबोध मन. आयुष्यातले कटू प्रसंग, अतृप्त इच्छा, लैंगिक वासना या अबोधमनात दडपल्या जातात.

या अबोध मनाची व्यक्तीला स्वतःलाही स्पष्ट जाणीव नसते. अबोध मनातील इच्छा, वासना सतत उफाळुन वर येण्याचा प्रयत्न करतात. यावेळी बोधात्मक मन त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते, पण हे होताना मानसिक संघर्ष निर्माण होतात व यातूनच मानसिक विकृती निर्माण होतात. याचे निदान करण्यासाठी फ्राईड यांनी मनोविश्लेषण पध्दती वापरली. मनोविश्लेषण पध्दतीला काही मर्यादा आहेत पण तरीही अंतरमनाचा शोध घेण्यासाठी त्यांनी उभे केलेले तंत्र आजही सर्वमान्य आहे.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

7 thoughts on “आपल्या अंतर्मनातली खळबळ आपल्याला सामान्यपणे जगू देत नाहीये..”

  1. Geet Kiran Valvekar

    Shamrao Thank u Sir शारीरिक तपासणीत तर काही नाही कारण मनात आहे हे लक्षात येत तेव्हा समुपदेशनाचा उपयोग होतो अर्थात विश्वास असण न असण हा ज्याचा त्याचा प्रश्न —

  2. प्रिय मंडळी,
    खूप चांगले व्यक्त केले आहे, परंतु काही लोक कौन्सिलिंगबद्दल विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांच्या मतानुसार वैद्यकीय उपचार न घेता आपण कसे वागले पाहिजे हे कसे करावे याचा सल्ला दिला आहे. तथापि मानसशास्त्राच्या औषधावर त्यांचा विश्वास आहे

  3. Geet Kiran Valvekar

    सारिका ताई,तुम्हाला होणारा त्रास तुमच्या विश्वासार्ह व्यक्ती जवळ मोकळे पणाने बोला ,तस कोणी नसेल तर कागदावर लिहा.सतत चुका काढणारी ती व्यक्ती म्हणजे प्राँब्लेम तिचाच आहे, तुमचा नाही म्हणून पूर्ण दुर्लक्ष करून पुढे चालत रहा

  4. Vitthal Barkule

    खरच खूपच छान विश्लेषण केले

  5. माझ्या ऑफीसमध्ये एक रस्त्री आहे जिच्या शी मला बोलयचं नाहिये. कारण ती सतत इतरांच्या चुका सांगत बसते आणि त्याने कुठे तरी मला चिडचिड होते, या वर काय उपाय

  6. Balasaheb Shankar Sutar

    बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते. हे बाकी खरं आहे. फारच सुंदर विश्लेषण केले आहे. धन्यवाद मँडम.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!