Skip to content

आपल्यासाठी unconscious mind महत्वाचा आहे की conscious mind?

आपल्यासाठी unconscious mind महत्वाचा आहे की conscious mind?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


हल्ली सर्रास मन हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. एखाद्याच्या मनात काय चालू आहे इथपासून माझ्या मनात काय काय येत आहे का खोलवर विचार आता केला जात आहे. परंतु एक काळ असा होता की जेव्हा मन नावाची काही गोष्ट आहे जी शारीरिक गोष्टींपासून वेगळी आहे हे कुणाला माहीत नव्हतं. जरी आपल्या संस्कृतीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात उल्लेख असला तरी यावर विचार असा केला गेला नव्हता, त्याचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास केला गेला नव्हता. जरी मन हे शरीरातच असलं तरी ते अनेक वर्ष आपल्या हृदयात कुठेतरी आहे असंच मानलं जायचं. या मनात येणारे भावना विचार या सर्व गोष्टी हृदयात येतात असं मानलं जायचं.

इतकच नव्हे पूर्वी माणसाला कोणताही आजार झाला तरी त्याची कारणं शारीरिक असू शकतील असे देखील मानल जायच. त्यानुसारच त्यावर उपाय शोधण्यावर, करण्यावर भर होता. परंतु मन नावाची वेगळी गोष्ट आहे ती नेमकी कुठे आहे, त्याबद्दल जाणून घेणे, त्याचा आढावा घेणे हे तेव्हा माहीत नव्हते.

परंतु नंतर या गोष्टीचा अनेक लोकांनी अभ्यास केला त्यात खोल संशोधन केलं आणि मानसशास्त्र ही शाखा उदयास आणली. या संशोधनातून हे ही लक्षात आलं की मन हे हृदयात नसून मेंदूमध्ये असतं आणि आपण कसं वागतो, बोलतो, जाणीव करून घेतो हे सर्व यात येत.

आपल्या अनेक आजारांचे मुळ या मनामध्ये असतात. जेव्हा आपण मानसशास्त्र असं म्हणतो त्यावेळी सर्वात पहिलं नाव तोंडात येत असेल ते म्हणजे सिग्मंड फ्रॉइड. फ्राईड हा मॉडर्न सायकॉलॉजी चा जनक मानला जातो. फ्रॉईड हा खर तर एक न्यूरोलॉजिस्ट होता. परंतु त्याच्याकडे येणारे जे पेशंट होते बरेचदा त्यांच्या आजाराची कारणं ही शारीरिक नसायची. त्यातून त्याला समजलं की आजाराचे मूळ हे फक्त शारीरिक नसून अजून काहीतरी आहे जे यावर परिणाम करत आहे.

त्यावेळी त्यांनी संशोधन केलं अभ्यास केला व त्याची थेरपी निर्माण केली ज्याला psychoanalytic theory असं म्हटलं जातं. म्हणजेच मनोविश्लेषणात्मक सिद्धांत. या त्याने मनाचा खोलवर अभ्यास केला यामध्ये त्यांनी मनाच्या तीन पातळ्या, अवस्था समजावल्या आहेत. त्या कोणत्या तर बोधावस्था, अर्धबोधवस्था व अबोधावस्था. Consious , preconsious and unconscious mind. ह्या अवस्थांना फ्रॉईडने बर्फाचा मोठा तुकडा असं म्हटलं आहे.

पहिली अवस्था आहे ती म्हणजे बोधावस्था. आपल्या रोजच्या जीवनात आपण वागतो, बोलतो, विचार करतो, आजूबाजूच्या गोष्टींची आपल्याला होणारी जाणीव, त्याबद्दल आपण जागरूक असणं हे सर्व बोधवस्थेमध्ये येत.

दुसरी आहे ती म्हणजे अर्धबोधवस्था. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आता आपल्या लक्षात नसतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव, आपली एखादी आधीची आठवण. पण जर आपण थोडासा जोर देऊन आठवलं तर आपल्याला लगेच त्या गोष्टी आठवतात. या सर्व गोष्टी अर्थबोधावस्थेमध्ये असतात.

तिसरी अवस्था म्हणजे अबोधावस्था. आपले नको असलेले विचार, अतृप्त विचार, दडपलेल्या भावना, नको असलेल्या आठवणी या सर्व अबोधावस्थेमध्ये असतात. ज्याची आपल्याला जाणीव देखील नसते. अबोधावस्थेमधे ज्या काही गोष्टी असतात, जो काही त्रास असतो नको असलेल्या इच्छा या सर्वांबद्दल माणूस अनभिज्ञ असतो.

आता इथे असा प्रश्न पडतो या अवस्थांमधील या तीन भागांमधील कोणता भाग महत्त्वाचा आहे?

तर त्यासाठी फ्रॉइडने या तीनही अवस्थांना बर्फाचा तुकडा म्हणून जे म्हटले आहे ते लक्षात घ्यावे लागेल. फ्रॉइडने असे म्हटले आहे की, बर्फाचा जो तुकडा असतो त्याचा वरचा भाग फक्त आपल्या नजरेला दिसत असतो तो केवळ दहा टक्के असतो. उरलेला 90 टक्के भाग असतो तो पाण्याखाली असतो जो आपल्याला दिसत नाही आणि ज्याची आपल्याला जाणीव देखील होत नाही.

बर्फाच्या वरच्या भागाला 10% भागाला तिने कॉन्शियस माइंड म्हटले आहे. त्याच्या बरोबर खाली जो थोड्या प्रमाणात दिसत आहे तो आहे सबकॉन्शस माइंड आणि जो भाग अजिबातच दिसत नाहीय तो आहे पण अनकॉन्शियस माइंड.

म्हणजेच आपण जे काही वागतो, बोलतो, वावरतो आपल्यात असणारी जाणीव ही फक्त दहा टक्के आहे. पण आपल्या मनाचा जवळजवळ अर्ध्यातून अधिक भाग हा अबोधवस्थेमध्ये येतो. ज्याची आपल्याला जाणीव नसते. पण जर याची आपल्याला जाणीव नसली तरी आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, विचार करण्यावर म्हणजेच आपल्या कॉन्शियस माइंड वर हा मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत असतो.

म्हणून याला इतका महत्व दिल गेला आहे. बरेचदा पण अचानक अशी काही गोष्ट बोलून जातो, करून जातो त्याच्या आपल्याला स्वतःला माहिती नसते. कारण ते अनकॉन्शियस मधून आलेलं असत. मोठमोठे आजार वेगवेगळ्या, गुन्हेगारांची मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांच्या unconscious mind चा आढावा घेतला जातो.

कारण याचा खूप मोठा प्रभाव आपल्या जागृत मनावर होत असतो. अनेक वेळा आपल्याला आपण असे का वागतो, का करतो हे लक्षात येत नाही. असा त्रास होत असतो जो शरीरात दिसत नाही पण जाणवत मात्र असतो. ते सर्व unconscious मधून येत असत. जे काही नको असलेलल, दाबून टाकलेल आहे ते वेगळ्या स्वरूपात बाहेर पडलेले असत आणि म्हणून आत्ताच्या वागण्या,बोलण्याची कारणे ही unconscious मध्ये शोधली जातात.

जरी Freudian therapy आता काही प्रमाणात कालबाह्य ठरली असली तरी मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये याचे खूप मोठे योगदान आहे. अजूनही काही ठिकाणी जसे की गुन्हेगारांची मानसिकता, काही personality disorder समजून घेण्यासाठी याचा वापर केला जातो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “आपल्यासाठी unconscious mind महत्वाचा आहे की conscious mind?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!