Skip to content

आपल्याला फारसं कळतही नसतं,तरी देखील तो भावनिक क्षण कसा हँडल करावा.

आपल्याला फारसं कळतही नसतं,तरी देखील तो भावनिक क्षण कसा हँडल करावा.


हर्षदा नं.पिंपळे


आयुष्याची रचनाच अगदी निराळी आहे.कधी कधी वाटतं तर आयुष्य म्हणजे क्षणाक्षणांची क्षणाक्षणाला वेचलेल्या शिंपल्यांची एक अद्भूत अशी रांगोळीच आहे. कितीक रंग भरावे नी कितीक नाही अशीच अवस्था जणू प्रत्येकाची होत असावी.पण हे खरय की आयुष्य हे क्षणाक्षणांनीच बनलेलं आहे.चांगल्या-वाईट क्षणांनी आयुष्य पूर्णपणे भरलेल आहे.आणि हे क्षण सुद्धा वैविध्यपूर्ण आहेत.

काही क्षण हळवे-भावनिक असतात तर काही क्षण मनाला सुन्न करणारे असतात तर काही क्षण मनाचा आनंद द्विगुणित करणारे असतात. पण अनेकदा काही भावनिक क्षण असे असतात की जे आपल्याला हाताळणं जमतच नाही. मुळातच अशी वेळ असते की तेव्हा आपल्याला फारसं कळत नसतं.किंवा आपण अजाणते असतो.

आणि याच अजाणतेपणामुळे काही भावनिक क्षण आपल्याला हँडल करता येत नाही. किंवा आपण तो क्षण हँडल करू शकतो असा विश्वासही वाटत नाही.आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग एकदा तरी येतोच.प्रत्येकजण त्याला आपापल्या परीने हँडल करण्याचा प्रयत्न करतो.कुणाचा प्रयत्न यशस्वी होतो तर कुणाला ते सहजासहजी जमत नाही.

भावभावनांचा वावर असलेल्या या आयुष्यात भावनिक क्षण येणं अगदी स्वाभाविक आहे. कधी कोणत्या वेळेला हे क्षण समोर उभे राहतील हे सांगणं जरा अवघड आहे. आणि इतकच नाही तर भावनेच्या भरात किंवा भावनांच्या आहारी जाऊन अनेकदा आपण अशा काही कृती करतो की त्याने शारीरिक आणि मानसिक दोन्हीही संतुलन बिघडत जाते.त्याचा परिणाम इतरत्रही दिसून येतो.

आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स चालू असतात. कुणाचातरी मृत्यू होतो, कुणाची अचानक नोकरी जाते, आर्थिक गोष्टींमुळे सगळ्या गोष्टींचा ताण येतो, प्रेमात-मैत्रीत किंवा इतर नात्यांमध्ये टोकाची कटूता येते वगैरे वगैरे सगळं चालूच असतं.

इतकच नाही तर इतरांच्या कहाण्या ऐकता ऐकता ही आपल्या डोळ्यात टचकन पाणी येतं.आपणही त्या क्षणी भावनिक होऊन जातो.

अशावेळी कधी कधी आपण काळ-वेळ परिस्थिती काहीही बघत नाही. अगदी चारचौघातही रडायला लागतो.मनात साचलेल अगदी ओसंडून वाहू देतो.पटकन कुणाच्या तरी कुशीचा आधार घेतो. तर कधी कधी आपण स्वतःलाच विविध पद्धतीने खूप त्रास करून घेतो. पण ते क्षण हँडल करायचे कसे हे मात्र समजत नाही.

तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण असे भावनिक क्षण हँडल करू शकतो. खरतर असे प्रसंग सांगून येत नाही हे जरी खरं असलं तरीही जसजसं आपल्यामध्ये थोडी समज निर्माण होत जाते तेव्हापासूनच आपण भावनांवर नियंत्रण कसं ठेवायच याविषयीची माहिती जाणून घेतली पाहिजे. म्हणजे पुढे मागे असे भावनिक क्षण हाताळताना अवघड जाणार नाही.

भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे फायदे आणि भावनांना आवर न घालण्याचे तोटे समजून घेतले पाहिजेत.थोडक्यात काय तर भावभावनांच समायोजन हे आवश्यक आहे. भावनांच समायोजन जर सुरळीत असेल तर भावनिक क्षण हँडल करताना अडचणी निर्माण होणार नाहीत. आणि सर्वात महत्वाच असा कोणताही प्रसंग आला तर सर्वात प्रथम दीर्घ श्वास घ्यायला विसरू नका. दीर्घ श्वास घ्या आणि शांत व्हा. याने भावनिक क्षण हँडल करायला मोठ्या प्रमाणात मदत होते. आपल्याला काय करायच आहे आणि काय करायच नाही हे समजायला थोडा वेळ आपल्याला निश्चितच मिळतो.

आणि आपल्याला फारसं समजत नसेल तरीही परिस्थिती समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न जरूर करावा.परिस्थिती सुरळीत होईपर्यंत शांत राहणेही गरजेचे असते.कारण , अनेकदा शांत राहिल्याने विचार करायला वेळ मिळतो , भावनांवर नियंत्रण कसं ठेवायच याचा अंदाज घेता होतो.गडबड गोंधळात हायपर होऊन प्रश्न सहजासहजी सुटत नाहीत. उलट भावनांचा गुंता अधिकाधिक वाढतच जातो. किंवा इतरांच्या बाबतीतला भावनिक क्षणही आपल्यावर हँडल करण्याची वेळ येतेच अशावेळेस सुद्धा त्या व्यक्तीला आधी शांत रहाण्याचा सल्ला द्यावा.नंतर त्याच्याशी समंजसपणे संवाद साधून तो भावनिक क्षण हँडल करावा.

कारण आपण अनेकदा एखादी व्यक्ती रडताना पाहतो आणि सहज बोलून जातो की- ” प्लीझ प्लीझ तु रडू नकोस .. मला नाही थांबवता येत असं रडणाऱ्या व्यक्तीला…. प्लीझ….”…पण मग असे प्रसंग आपल्यालाहीहाताळता आले पाहिजेत.त्यासाठी आपणही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. भावनांच व्यवस्थापन , समायोजन सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. वेळप्रसंगी भावनांवर ,स्वतःवर ताबा ठेवायला शिकलं पाहिजे. Mind management समजून उमजून घेतलं पाहिजे. बाकी आयुष्य सुंदर आहे फक्त एखाद्या गोष्टीच management व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!