आपल्याला त्रास दिलेल्या व्यक्तीचा बदला घेणं गरजेचं आहे का?
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
आपल्याला त्रास दिलेल्या व्यक्तीचा बदला घेणं गरजेचं आहे का?……..काय वाटतं तुम्हाला….??
खरचं असा बदला घेण गरजेचं आहे का….??
“जशास तसे” या उक्तीप्रमाणे आपण हाच विचार करतो त्याने मला अस केल आता मीही त्याला तसच करणार….. “बदला” म्हणजेच “सूड” ही एक विध्वंसक भावना आहे.एखाद्या व्यक्तीने आपल्याला खूप त्रास दिला तर आपल्याला ते सहन होत नाही.आपल्याला राग येतो.आपला संताप होतो.चिडचिड होऊन गोष्टी कुठे जाऊन पोहोचतात आपल्यालाही कळत नाही. त्रास देणारी व्यक्ती आपल्याला नकोनकोशी वाटते.त्या व्यक्तीच तोंडही बघायचीही आपली इच्छा नसते.
माझ्यासोबत असं करायची काही गरज होती का…??मी इतकं काय केलं होत की त्यांनी मला इतका त्रास द्यावा…?आपण इतकं विचीत्र वागायला लागतो की काही विचारायलाच नको..आणि मग मनात हळुहळू वेगवेगळे विचार घोळु लागतात. आपल्याला त्रास दिलाय…मी असं सहजासहजी गप्प नाही बसणार.. मीही त्याचा बदला घेणारच……..!
अशा प्रकारे रागातून ती सूडभावना बाहेर येऊ लागते.आणि आपण संधीच शोधत असतो बदला घेण्यासाठी. जेव्हा केव्हा ,जिथे कुठे मला संधी मिळेल तेव्हा मी बदला घेणारच.ही भावना सतत मनात घिरट्या घालत असते. माणूस हा असा प्राणी आहे की तो लवकर कधी समाधानी होतच नाही. अगदी तसच या सूडभावनेच आहे.
तो माझ्याशी असं वागला आता त्यालाही त्रास व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. मी ते करणारच…मी बदला घेणार म्हणजे घेणारच…!! कधीकधी नको तिथे जिद्दी बनायची माणसाला खरच खूप हाउस असते.जिथे दाखवायचा तिथे हा जिद्दीपणा माणूस दाखवणार नाही. पण एखाद्या गोष्टीचा बदला घ्यायचा झाला तर जिद्दीने मात्र तो पेटून उठतो.असे अनुभव तर तुम्ही घेतले असतीलच…..
आपल्या घरातले ,आयुष्यातील एखादी व्यक्ती किंवा आपले जवळचेच मित्र कधी कधी आपल्याला इतका त्रास देतात की कधीकधी अगदीच असह्य होऊन जातं. मग अशावेळी आपल्याच मनात क्रोध निर्माण होतो.आपल्याला आपलाही राग येतो.काही करण्याच्या मनःस्थितीत आपण नसतो.पण नंतर मात्र आपण झालेल्या गोष्टी आठवत बसतो.खूप विचार करतो.मला एवढा त्रास दिला आणि मी अजूनही शांतच…??मला त्याला अद्दल घडवलीच पाहिजे.मी त्याचा काहीही करून बदला घेणार…..मनात अशा गोष्टींना आपण कधी थारा देऊन बसतो समजतही नाही.
सतत ती “सूड भावना” मनात धरून आपण जगत असतो.अशा जगण्याला जगणं म्हणायच का हो….??मनात सतत सूडभावना असलेला चेहरा कसा दिसत असेल…?? आणि अशी सूडभावना घेऊन आयुष्य कोणी जगूच तरी कसं शकत..??आणि मुळातच असा बदला घेणं किती योग्य आहे किंवा किती गरजेचं आहे हे आपण कधी तपासून पाहिलय का…??आपण आपला कितीतरी अमूल्य वेळ फक्त त्या बदला घेण्याच्या विचारात खर्च करतो. केव्हा केव्हा निर्माण होते अशी बदल्याची विध्वंसक भावना—-
तर अशा अनेक घटना आपल्या आयुष्यात घडतात की ज्या आपल्याला ज्वालामुखी व्हायला भाग पाडतात. अपमान, प्रेमभंग, वाईट वागणूक ,बिझनेस आणि पार्टनरशीप मधील झालेले वाद…यांसारख्या अनेक गोष्टींतून सुडाची भावना उदयास येते. कुणी आपला अपमान केला तर ते आपल्याला सहन होत नाही.माझा अपमान करतो काय..??आता मीही सोडत नाही त्याला…त्याचा असा अपमान करेन की आयुष्यभर लक्षात ठेवेन…, प्रेमभंगातूनही इतकं काही घडतं की आता मी तिला/त्याला सोडणार नाही.मी एकट्याने का हे सहन करायच….???
मनात फक्त एवढच चालू असतं.आपण बदला कसा घ्यायचा याचा विचार करतो.वेगवेगळे कट कारस्थान रचायला सुरुवात करतो.कशातून त्या व्यक्तीचा बदला घेता येईल,जास्तीत जास्त त्याला त्रास कसा होईल याचाच आपण क्षणाक्षणाला विचार करतो.म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही सूडभावना किती भयंकर असु शकते.
पण या सगळ्यात आपण एक गोष्ट लक्षात घेतो का…???या बदला घेण्याच्या नादात आपण आपलं जगणं सोडून देतो.मनात फक्त आणि फक्त “सूड” ही एकच गोष्ट फिरत असते.आणि सूड ही विध्वंसक भावना उराशी घेऊन आपण आनंदी असतो का..??आपली मानसिकता काय असते?कोणत्या टोकाला आपण पोहोचलो असतो याची काही कल्पना असते का…आपल्याला…??
अरे पटतय…एखादी व्यक्ती त्रास देते..आपल्याला ईजा पोहोचवते आणि त्यातून आपला संताप होतो.आणि आपल्याला बदला घ्यावासा वाटतो.किंवा त्याने त्रास दिला मग त्यालाही त्रास द्यायला हवा. एखाद्याला किती त्रास होतो हे त्रास देणाऱ्या व्यक्तीलाही समजायला हवं.त्यालाही त्याची जाणीव व्हायला हवी असं आपल्याला वाटतं. आणि ते वाटणं अगदी नैसर्गिक आहे.
पण मग एखाद्याला समज द्यायचीच असेल तर दुसरेही मार्ग आहेत. त्यासाठी “सूड घेणे” हा एकमेव मार्ग असूच शकत नाही. आणि तो योग्यही नाही. कारण,आपल अनुकरण करणारे अनेकजण असतात. आपण कुणाचातरी बदला घेतोय हे ते पाहतात.आणि त्यांच्या बाबतीत असं झालं तर तेही “बदला” हाच मार्ग स्वीकारतात.
दुसरे मार्ग आहेत हे ते जाणूनही घेत नाहीत. आणि कदाचित यातूनच सूड भावना वाढत जाते.ही वृत्ती संपुष्टात येतच नाही. त्रास आणि बदला या दोन गोष्टींना आपण वेटोळा घालून बसलेलो असतो.बाकी आयुष्य काय हेच आपण विसरतो.काही व्यक्ती याला अपवाद आहेतही. काही जण बदला घेण्याऐवजी सरळ सरळ दुर्लक्ष करतात.पण समज द्यायची मात्र विसरून जातात.
प्रत्येक वेळी अस दुर्लक्ष करण चुकीच आहे कारण समोरच्याला त्यांच्या चुकीची जाणीव होणं गरजेचं आहे. पण मग समज द्यायची असेल तर सूडभावनेने द्यायची खर तर काहीच गरज नाही.सूडभावना ही खूप चुकीची आहे. त्यातून वाईट कृत्य घडण्याचीच शक्यता जास्त असते.ही सूडभावना अत्यंत हानिकारक असते.ती स्वतःला आणि दुसऱ्यांनाही इजा पोहोचवु शकते.स्वच्छ मनात कायमस्वरूपी सूडाची -बदल्याची भावना घेऊन जगणं किती भयानक असु शकतं याची कदाचित काहीजणांना कल्पनाही नसेल.
पण हो असा बदला घेणं गरजेचं नाही… पण एका योग्य प्रकारे समज देण मात्र गरजेचं आहे.क्षणभंगुर आयुष्य आहे आणि तेही असं सूडभावनेला मनात ठेवून जगायचं…. मुळीच नाही यार…बदला न घेता व्यवस्थित समज द्यायचा प्रयत्न करा आणि आहे ते आयुष्य सरळमार्गी जगण्याचा प्रयत्न करा….आयुष्य एकदाच मिळतं असं विध्वंसक गोष्टींमध्ये ते वाया घालवू नका….!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



ह्या लेखात सुड या मानसिक अवस्थेविषयी चर्चा केली आहे. तुमचे मत समजले. कदाचित असंख्य जणांचे मत तुमच्या मताप्रमाणेच असू शकते व असेलही. सुडाची भावना आपल्या मानवासारखीच प्राणिमात्रांत देखील असते हे नक्की. ती प्राणिमात्रात किती नैसर्गिक असते व प्रसंगी प्राणाचे मोल देऊन देखील ती जपली जाते याचे समयोचित विवेचन स्वा. सावरकरांनी आपल्या संन्यस्त खड्ग या नाटकातील एका संवादाव्दारे केले आहे. मानवात ती तितकीच प्रबळ असते व ती व्यक्त करण्याची अथवा तिची अंमलबजावणी करण्याचे धाडस व संयुक्तित परिस्थिती नसल्यास ती मरेपर्यंत दाबून ठेवली जाते. अर्थात एखाद्या गोष्टीचे वाईट परीणाम समर्थिले जाणे प्रशस्त नाहीच. परंतु पराकोटीच्या अन्यायाचे परिमार्जन सुड अथवा बदला या मार्गाने कोणतीही किंमत देऊन करता येत असेल तर ते अयोग्य का म्हणावे.
Samaj kashi dyawi pan sir te pan sanga
Pratek parithitivr avlubun ahe.. v tya pramane vagve….
Bolalyane sarv marg sutat… karn gyrsamj ha mansacha shtru ahe… to ka hotoy yacha ulgda zhalatr… kontech prashn udbhu shkt nahit…
Chan ahe lekh….👌
खूप शांत पणे खूप क्रूर बदला घेतला गेलाच पाहिजे, हे नैसर्गिक आहे.
माणसाने डोके शांत ठेवून, मनावर थोडासा ताबा ठेवून, या गोष्टीचा विचार केला पाहिजे
बदला घेतलाच पाहिजे. कारण आपण जोपर्यंत बदला घेत नाही तोपर्यंत समोरचा आपल्याला कमजोर समजतो. किंवा याला आपण चांगलीच अद्दल घडवली असे समजून तो आपली समाजात खिल्ली उडवतो. त्यामुळे बदला घेतलाच पाहिजे. मग परिणाम कितीही वाईट होऊ देत.
मी आपलं माणस शास्त्र या पेज नियमित वाचक। आहे आजचा खूपछान लेख होता
Mala tar darroj traas hoto kamacha nahi tya vyakticha kaam karnyachi umedch harvtey