Skip to content

आपल्याला काही माणसं आठवली की अजूनही त्रास का होतो ??

आपल्याला काही माणसं आठवली की अजूनही त्रास का होतो ??


मयुरी महेंद्र महाजन


जीवनाच्या वाटेवर कितीतरी माणसं भेटतात, काही लक्षात राहतात, काहींना आपण लक्षात राहतो, काहींना कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही ,काही मात्र कायम आठवणीत जोपासावीशी वाटतात, या सर्वात जेव्हा जेव्हा एखादी घटना एखादा प्रसंग आणि त्याच्याशी जोडलेली काही माणसं ज्यामुळे मनाच्या इवल्याशा या भागावरती ज्या गोष्टींचा खूप त्रास होतो, ज्यामुळे आपल्याला काही माणसं आठवली की त्याचा त्रास होतो,

माणूस चुकीचा नसून माणसाची मानसिकता माणसाला चुकीचं वागायला भाग पाडते, आणि अशी माणसं अशी मानसिकता कोणत्याही माणसाला इजा पोहोचवणे, मारहाण करणे या स्तरापर्यंतचं, त्याची मर्यादा नसून त्याहीपुढे भयानक असण्याची शक्यता असू शकते,

आपण साधसं उदाहरण बघू, की चार चौघात आपल्याकडून झालेल्या एखाद्या चुकीबद्दल समोरची व्यक्ती आपल्याशी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याशी वागलेली असते, आपल्याला अपमानित करून स्वतःचे मोठेपण सिद्ध करत असते, आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला खूप कमीपणा वाटून शब्दांचे ते आघात मनावर उमटलेले असतात , डोळ्यातून एकांतात पडलेले अश्रू आपल्या मनातील दुःख हलकं करत असते, माणूस आपला झालेला अपमान कधीही विसरू शकत नाही,

काही माणसं त्रास द्यायलाचं जन्माला आलेली असतात, म्हणून आपण त्यांचा प्रतीरोल करायचा नाही, जर आपल्याला काही माणसं आठवली की अजूनही त्रास का होतो??? याचे उत्तर शोधायचे असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण माणूस आहोत, कारण निर्जीव वस्तूला कुठलाही त्रास झालाय का? नाही, त्यासाठी आपण स्वतः आधी माणूस म्हणून स्वीकारायला हवे ,झालेल्या घडून गेलेल्या गोष्टी आठवल्या की त्यांचा आणि त्यांच्याशी संबंध असणाऱ्या माणसांचा त्रास होतो,

कारण आपण स्वतःला एक माणूस म्हणून स्वीकारल्यानंतर माणूस हा भाव- भावनांचा एक पुतळा आहे ,हेसुद्धा तितकंच खरं आहे, त्यामुळे काही जिवलग माणसे ज्यांच्याशी आपला खूप जवळचा संबंध असतो, अशी माणसे सोडून गेल्यावर आपल्याला त्रास होतो ,

आपण प्रत्येक जण आपल्या भावना ,इच्छा कुठेतरी व्यक्त करतोचं, आपण त्या जेव्हा जेव्हा व्यक्त केलेल्या असतात, त्या त्या वेळेस आपल्या भावना आपल्याशी जोडल्या गेलेल्या असतात, आणि मग जेव्हा आपण कोणाशी तरी कनेक्ट होतो, त्यावेळेस ती व्यक्ती त्यामध्ये इनक्लूड होत जाते, आणि मग आपली त्या व्यक्तीशी घटनेशी एक नाळ जुळत जाते,

काहींना आठवून जर आपल्याला त्रास होत असेलं, तर आपण काय करायला हवं, सर्वात अगोदर आपण जितका प्रयत्न विसरण्याचा करणारं ती गोष्ट किंवा ती व्यक्ती तितकिचं आठवत जाते ,त्यासाठी स्वतःला स्वतंत्र करा, मोकळं सोडा, कुठेही अडकू नका, गरज भासल्यास ध्यान करा जेणेकरून आपल्याला एक प्रकारची मदत होईलं,

बऱ्याच केसेस मध्ये काही जण अशी असतात, की ती काही गोष्टी विसरण्यासाठी तयारच नसतात आणि स्वतःच स्वतःला त्रास करून घेतात, आणि त्याच त्रासासोबत जगणं पसंत करतात ,आणि तशीच जगतात,

बऱ्याच वेळेला काही माणसांनी इतका त्रास दिलेला असतो अशी माणसं आठवली तरी तो त्रास होतो, असा भास होवूनही त्याचाही त्रास व्हायला लागतो, त्यासाठी आपण लक्षात घ्यायला हवं की जे घडून गेलेलं आहे ,ते आपण नाही बदलू शकतं, जो त्रास आपल्याला झाला त्यासाठी आपल्याला भूतकाळात जाऊन ते बदलण्याची परवानगी नाही,

हा परंतु येणारा भविष्य आपण आपल्या वर्तनातून आनंद घेऊन जसं हवं तसं घडवण्याची क्षमता ठेवतो, होणारा त्रास म्हणजे आपण जे काही आठवतो ते कशासाठी आणि कुठल्या मुद्द्यांच्या आधारे आठवतो ,हे पडताळून पाहणे गरजेचे आहे, भूतकाळजमा झालेल्या गोष्टी कोणत्या भावनांच्या आधारे आपल्याला आठवत आहेत, त्यानुसार आपली त्रासाची पातळी ठेरली जाते, त्यामुळे आपण आपल्या त्रासाची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आपल्याला काही माणसं आठवली की अजूनही त्रास का होतो ??”

  1. खूप छान मार्गदर्शक असा लेख आहे. अशा माणसांना विसरणं कोणकोणत्या प्रकारे शक्य आहे… त्यामध्ये आपल्या मानसिक स्वास्थ्याचा कशाप्रकारे फज्जा उडतो… कशा प्रकारे छान रहावे याचे मार्गदर्शन केले धन्यवाद.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!