आपल्याबद्दल पाठीमागे वाईट बोलणार्या लोकांकडे लक्ष द्यायला हवं का…?
सौ.मयुरी महेंद्र महाजन
पुणे(चिंतामणी चौक)
ही खूप मोठी गंमत आहे, म्हणजे सगळ्यांनाचं सगळे लोक चांगलं म्हणतील असं होतच नाही, काही चांगलं काम करणाऱ्या लोकांना सुद्धा पाठीमागे वाईट बोलणारी माणसे सुद्धा असतात…. पण आपण त्याकडे लक्ष देऊन आपले कार्य थांबवायचे का…..?
मुळात आधी आपण विचारधारा समजून घेऊ या जगात सगळेचं लोक आपल्याला चांगलं म्हणतील हे विचार आधी काढून टाका ,
सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं, असं सर्वांना वाटते पण प्रत्यक्षात तसे नसतेचं…….
चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात ,आणि असलेचं पाहिजे… त्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही,
जर आपल्या माघारी कोणी आपली उणी-दुणी काढत असेल, वाईट अपशब्द वापरत असेल, आपण कसे वाईट आहोत हे जगाला पटवून सांगत असेल, तर तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊन आपली स्वतःची ऊर्जा नका घालून …..
तो मला वाईटचं कसा बोलला, माझ्यामागे माझ्याविषयी लोकांना वाईट सांगून तो स्वार्थाची पोळी भाजून घेतो …. यामुळे होतं काय आपली मनस्थिती विचलित होते…. आणि तो मला असं बोलला, ती मला अशी म्हणते, ती सगळीच मला येता जाता बोलत असतात,
खरं म्हणजे मला तर असं मनापासून वाटतं , लाईफ आपली आहे ना….! ते आपल्या नुसार जगायची, तो असं म्हणतो ,ती तसं म्हणते, अरे म्हणून देत, ज्याला जे म्हणायचे ते….आपण त्या गोष्टीची काळजी करायची नाही….फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आपली लाईफ जगात रायची बिनधास्त……
आणि हो आपल्या विषयी वाईट बोलणारे कितीही वाईट बोलू देत त्याने काय फरक पडणार आहे….? आपण त्याकडे लक्ष देऊन स्वतःच्या डोक्यात फरक करून घ्यायचा नाही, आणि हो तुम्ही कसे आहात हे तुम्हाला माहितीय आणि त्या परमपिता परमेश्वराला माहितीय बस्स…!
आणि मला तरी असं वाटतं कुणी आपल्याविषयी किती वाईट बोलले तरी जी लोक आपल्याला ओळखतात, ज्यांनी आपल्याला जवळून ओळखलेलं आहे, अशी लोक कधीच त्यावर विश्वास ठेवत नाही , तुमचे कुणाशी काही देणे घेणे नसो , तरी तुम्ही कसे तुमच्या मर्जीने मस्त जगता आनंदाने प्रत्येक गोष्टीत सहभागी असतात,
तुम्ही तुमच्या पद्धतीने जगता ही गोष्ट सुद्धा बऱ्याच लोकांना खटकते, त्यामुळे ते तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात, हिंदी मध्ये खूप छान शायरी आहे…
” बुराई वहीं लोक करते है ,
जो बराबरी नही कर सकते””
त्यामुळे आपण या गोष्टींचा लोड घ्यायचाचं नाही , पाठीमागे वाईट बोलणारर्या लोकांकडे लक्ष द्यायला हवं का..? या विषयासाठी फक्त एकच म्हण लक्षात ठेवायची …
“हत्ती चले बाजार तो कुत्ते भोकते हजार “”
जेव्हा काही जणांना आपली प्रगती सहन होत नाही, त्या वेळी ती आपल्या बद्दल लोकांना चुकीचं सांगत सुटतात, त्याचा आपल्याला राग येतो,
अरे आपण कोणाचे वाईट केले नाही , कुणाला अडवले नाही, आपण कोणाविषयी कधी काही मनात ठेवत नाही, तरीपण आपल्याविषयी असे का..? असा प्रश्न निर्माण होतो…
मला सांगा जी व्यक्ती आपल्या बद्दल वाईट सांगत आहे आपण तसे आहोत का ….?नाही ना … मग त्या सांगणारा व्यक्तीशी किंवा त्याने काय सांगितले त्या गोष्टीविषयी आपण त्यांच्याशी भांडलो तर काय होणार…?
वाचतांना थोडं अवघड वाटेल पण निवांतपणे खरंच विचार करा त्यातून काय निष्पन्न होणार आहे, आपल्या आत मध्ये असणारा इगो दुखावला जातो, त्याच्या समाधानासाठी आणि पुन्हा कोणी अशी चूक करू नये यासाठी हा झगडा चाललेला असतो….. पण विषय इथेच थांबत नाही त्यातून काही गोष्टी अजून वाढीस लागतात ….
ते असं म्हणतात
“”अगर आप सही हो तो कुछ साबित करने की जरूरत नही, वक्त सबकुछ साबित कर देता हैं…!””
त्यामुळे वाईट बोलणारर्यांना वाईट बोलू द्यायचे, तो त्यांचा स्वभाव असतो ते त्यांचा स्वभाव सोडत नाही, त्यामुळे आपण आपला चांगला स्वभाव का म्हणून सोडावा….
तुम्हाला सांगते काही जण मुद्दामून आपल्या पाठीमागे आपल्याविषयी बोलतात ज्यामुळे आपल्याला दुःख होईल ,राग येईल, पण नेहमी उलट करायचे ओम दुर्लक्षाय नमः …… असे केल्याने त्याला प्रश्न पडतील अरे यार मी ईतके काही बोलून गेलो , तरी पण काहीच फरक नाही तो त्यासाठी चिंतेत राहील ,
त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे जे काही इंटेन्शन असते ते कधीच पूर्ण होऊ द्यायचे नाही , यामुळे समजावे वाईट बोलणार्यांपेक्षा आपण नक्कीच त्यांच्यापुढे आहोत, पाठीमागे तर कोणीही बोलत हो, समोर येण्याची कुणाची हिंमत होत नाही, इथेच आपला विजय असतो ….
बघा सुंदर आहे आयुष्य हे सुंदर पणे जगण्यासाठी आपण या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे आपण काही आपल्याविषयी कोण काय फीडबॅक देतोय यासाठी जगत नाही ना…..!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


