आपल्याजवळ आपली स्वप्ने सत्यात उतरवण्याची क्षमता असतेच.
सोनाली जे
आपली स्वप्ने म्हणजे काय ? तर इच्छा , आपली ध्येय, आपल्याला काही तरी करायचे आहे हा ध्यास. आता यात कोणाला इंजिनिअर , डॉक्टर , वैमानिक , शास्त्रज्ञ व्हावे असे विविध उच्च पातळीपासून अगदी व्यावसायिक व्हावे , एखादे दुकान काढावे असे कोणतीही स्वप्ने कोणीही बघू शकते.
प्रत्येकाजवळ आपली स्वप्ने सत्यात उतरवण्याची क्षमता असते च.पण त्याकरिता योग्य मार्गाने गेलात तर स्वप्नपूर्ती लवकर होईल ना!!! त्यासाठी काही टिप्स सांगते..किंवा तुम्ही त्याला प्लॅनिंग ही म्हणू शकता. जसे एखादे फंक्शन ..कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन चोख पार पाडतो..तसेच काहीसे.
१. अशीच स्वप्ने बघा जी तुमच्या कूवती मध्ये असतील ..जसे तुमची बौध्दिक क्षमता ..सायंटिस्ट व्हायचे आहे पण maths, science मध्ये कच्चे आहात तर तुमची जी क्षमता आहे त्यानुसार अभ्यासक्रम निवडा किंवा मग ती वाढविण्याकरिता प्रचंड मेहनत घ्या.
२. ध्येय निश्चित करा..मला काय करायचे आहे नक्की ठरवा . एकावेळी अनेक ऑप्शन्स उपलब्ध असतात त्या मधून योग्य ऑप्शन ची निवड करा.ज्याची खात्री असेल की मी हे करूच शकेन.हे मला करावयाचे च आहे. त्याकरिता मिळणाऱ्या opportunities आणि करावे लागणारे प्लॅन्स आखा.
३. ध्येय निश्चित झाले की येणारी संकटे आपल्याला अनुभव देतात हे लक्षात घेवून पुढे जात रहा..माघार घेवू नका.उदा. engineering करताना एखादा पेपर अवघड गेला तर हताश , निराश होवून जावू नका, सगळेच संपले ही भावना मनात आणू देवू नका. आत्महत्या , डिप्रेशन किंवा frustration मध्ये जावू नका..
लागले तर विसावा घ्या..आपण काही रेस मधले घोडे नाही की एकदा रेस सुरू झाली की शेवट करायलाच पाहिजे..थोडा विसावा घ्या..अभ्यासाला अजून जास्त वेळ मिळाला असेच समजा..एखादे वर्ष मागे राहिल्याने काही फरक पडत नाही हेच लक्षात घ्या..आपल्यात परत प्रेरणा निर्माण होण्याकरिता motivational videos बघा..योगा, meditation यातून मनाची एकाग्रता वाढवा..शरीर fit राहण्याकरिता रोज व्यायाम करा, जॉगिंग , running, जिम, करा म्हणजे शरीर ही फ्रेश राहील आणि मन ही उत्साही राहील..कारण शरीर आणि मन या दोहीचा ही निकटचा संबंध आहे.ध्येय पूर्ती करिता या गोष्टी मदतच करतील.
४. शिक्षण तर जरुरीचे पण स्किल वाढवा. नुसते शिक्षण उपयोगी नसते तर त्याबरोबर तुमचे स्किल develop करणे गरजेचे असते. जसे सिव्हिल इंजिनियर झाले आणि actual काम करताना विटांची रचना कशी करायची हेच माहिती नाही, पाया किती खोल पाहिजे आणि त्याकरिता तो base पक्का होण्याकरिता काय केले पाहिजे हेच माहिती नसेल तर ती इमारत कशी उभी राहणार..किंवा चुकीचे असेल तर जास्त काळ इमारत कशी टिकेल..याकरिता तुमचे अनुभव आणि स्किल develop करावे लागते.
५. Time management..वेळेचे नियोजन करा : –
आपल लक्ष आपल्या ध्येयपूर्तीसाठी वापरा. वेळ वाया घालवू नका..प्रत्येक गोष्टीचे एक टाईम टेबल तयार करा..त्या त्या वेळेत त्या त्या गोष्टी पूर्ण करा.कमी वेळात जास्त गोष्टी कशा करता येतील हे बघा.त्याकरिता नवीन technique आत्मसात करा.. पाट्या टाकण्यापेक्षा ब्रेन work करण्या वर भर द्या.
६. Target ठेवा ..
एखादी गोष्ट करणार आहोत हे ठरले की टार्गेट ठरवा आणि त्या वेळेतच ते पूर्ण करायचे आहे असा निश्चय करा. त्याकरिता स्वतः ला reward आणि punishment technique ही वापरू शकता..
आपल्या प्रत्येकाकडे क्षमता या असतात च. त्याचा योग्य वापर करा आणि एकदा स्किल develop केले म्हणजे आता मास्टर झालो हा गैरसमज काढून टाका मनातून. कारण technology रोज बदलत असते.रोज नवीन शोध लागत असतात..आपणच आपल्याला update ठेवणे गरजेचे असते.
एक उत्कृष्ट चित्रकार असतो . सुंदर चित्रे काढून तो ती विकून गुजराण करत असतो. त्याचा मुलगा लहान असताना वडिलांना चित्रे काढतांना बघून स्वतः ही चित्र काढू लागतो.
काही वर्षा नंतर वडील वयस्क होतात. आणि त्यांना पूर्वीसारखे चित्र काढणे जमत नाही. मग त्यांचा मुलगा म्हणतो की मी चित्र काढून ती विकून पैसे कमवेन. असे म्हणून पहिले चित्र काढतो..वडिलांना दाखवितो..वडील त्यात थोड्या सुधारणा करण्यासाठी सांगतात..तो मुलगा त्यात सुधारणा करतो आणि विक्री करिता बाजारात घेवून जातो.त्याला त्या painting चे ४०० रुपये येतात तो खूप खुश होतो आणि घरी येतो.आल्यावर बाबांना उत्साहाने ते सांगतो..
दुसऱ्या वेळेस ही तो मुलगा painting करून वडिलांना दाखवीतो. वडील परत थोड्या सुधारणा सांगतात. ते बदल करतो तो आणि बाजारात विक्री करिता घेवून जातो. त्याचे त्याला सहाशे रुपये येतात.खूप खुश होतो आणि घरी येवून वडिलांना आनंदाने सांगतो..वडील पण खुश होतात..
तिसऱ्या वेळेस तो मुलगा painting करतो , बाजारात घेवून जातो विकतो तर त्याला फक्त २०० रुपये च मिळतात..तो नाराज होवून घरी येतो..तेव्हा वडिलांना म्हणतो पहिल्या दोन वेळेस मला खूप चांगले पैसे मिळाले मग अताच असे काय झाले की कमी पैसे मिळाले.
वडील शांतपणे उत्तर देतात की पहिल्या दोन्ही वेळेस तू मला painting दाखविली त्यात मी ज्या सुधारणा सुचविल्या त्या केल्यास पण यावेळेस तू मला दाखविले नाहीस कारण तुला वाटले त्यात काय एव्हढे प्रत्येकवेळी काय दाखवायचे आणि तुला वाटले आता आपल्याला ते स्किल develop करता आले..म्हणून तू painting न दाखविताच , घेवून गेलास..तुला वाटले आता मी सगळे शिकलो आहे आता मला चांगले पैसे ही मिळतात..त्यामुळे नवीन स्किल decelop करण्याची गरज नाही. म्हणून तूच तुझी प्रगती तिथे थांबविली ..
तात्पर्य काय की आयुष्यात प्रत्येक performance हा नवीन , कालच्या तेवढ्याच किंबहुना जरा जास्तच उत्साहाने दिला पाहिजे..त्याकरिता रोज होणारे बदल त्याची माहिती जरुरी तर आहेच पण आपण ते स्वीकारून आपल्यात बदल करणे ही जरुरी..रोजचा performance हा आपला पहिलाच समजून प्रयत्न केले पाहिजेत ..
तरच आपल्याजवळ आपली स्वप्ने सत्यात उतरवण्याची क्षमता असते च तिचा योग्य वापर केला जाईल.आपल्यातल्या क्षमता ओळखा आणि त्या वाढवा तर तुमची स्वप्ने सत्यात उतरवू शकाल. क्षमता प्रत्येकात आहेत फक्त त्याची जाणीव आपल्याला नसते.. ती क्षमता वेळीच ओळखा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने वाटचाल करा..अडथळे , संकटे येणार त्यावर मात करून.
आपली स्वप्न कायम डोळ्यापुढे ठेवा. अर्जुनाने जसे माशाच्या डोळ्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि माशाच्या डोळ्यावर बाणाचा अचूक नेम धरला तसे आपले स्वप्न पूर्ण करताना पूर्ण फोकस त्यावरच ठेवा.तर स्वप्ने सहज पूर्ण होतील.अर्थात त्याकरिता मेहनत , सातत्य आणि चौकस बुध्दी , जिज्ञासा पाहिजे आणि नवीन गोष्टी शिकण्याची आणि करण्याची जिद्द पाहिजे ,धाडस पाहिजे .
आपल्याजवळ आपली स्वप्ने सत्यात उतरवण्याची क्षमता असते च. ती योग्य रीतीने वापरा. आयुष्य खूप सुंदर आहे . एखाद्या घटनेने निराश होवू नका ..तर परत नव्या दमाने ध्येय पूर्ती करिता पुढे वाटचाल करा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


