Skip to content

आपली समजून घेण्याची मानसिकता आपली परिस्थिती बदलते.

आपली समजून घेण्याची मानसिकता आपली परिस्थिती बदलते.


सोनाली जे


भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडेसे समजून घेतले तर काय वाईट ?? समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्या साठी अनुभवाचा कस लागतो , तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

एका परदेशातल्या शाळेतील एका वर्गात सगळी मुलं खूप गोरी गोरी पान होती. त्याच वर्गात एकच निग्रो विद्यार्थी होता. त्याचा काळा वर्ण बघून मुले त्याला कशात ही घेत नसत, चिडवत असत, त्याला कधीच मदत करत नसत. डबा ही तो एकटा बसून खात असे. निग्रो मुलाला या गोऱ्या मुलांच्या अशा वर्तवणुकीचा त्रास होत असे.

एकदा वर्गातल्या वर्ग शिक्षिका येत असतात आणि ही गोरी मुले त्या निग्रो मुलाला चिडवत असतात, वर्गशिक्षिका असतात त्यांच्या हे लक्षात येते, त्या निग्रो मुला बरोबर बोलतात , कारण विचारतात , त्या निग्रो मुलाचे प्रॉब्लेम्स समजून घेतात. पण त्याक्षणी गोऱ्या मुलांना काही ही समजावून सांगत नाहीत किंवा त्यांच्यावर रागावत , ओरडत नाहीत.

पावसाळा संपतो , हिवाळा संपतो आणि कडक उन्हाळा सुरू होतो .आणि एक दिवस वर्गात येवून वर्गशिक्षिका वर्गातल्या सर्व मुलांना सांगतात की आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. उद्यापासून आपल्याला आपल्या शाळेची जी बाग आहे तिथे रोज जावून बागकाम करायचे आहे. आणि आपली बाग छान छान झाडे लावून, फुलांची आकर्षक झाडे लावून आपली बाग फुलवायची आहे.

असे सांगून दुसऱ्या दिवशी पासून रोज सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत पुढचे आठ दिवस मुलांना कडक उन्हात बागेत काम करावयास लावतात. तेव्हा जी गोरी मुले असतात ती कडक उन्हामध्ये काम करत असल्याने त्यांचा गोरा वर्ण लालबुंद होवू लागतो. त्यांना ते ऊन सहन होत नाही. त्रास होवू लागतो उन्हाचा , त्यांचा उत्साह कमी होवू लागतो, ती मुले चिडचिड करू लागतात. काम टाळू लागतात,

या उलट तो निग्रो मुलगा असतो त्याला त्या उन्हात काम करताना त्याच्या काळया वर्णा मध्ये काहीच फरक पडत नाही. तो उन्हात ही उत्साहाने काम करत असतो. त्याची चिडचिड होत नाही. स्किन ला प्रोब्लेम होत नाही.

आठ दिवसांनंतर जसे रोजचा वर्ग सुरू होतो तेव्हा वर्गशिक्षिका मुलांना त्यांचे काम करतानाचे अनुभव विचारतात निग्रो सोडून सर्व मुले उन्हाचा झालेला त्रास आणि बाकीच्या तक्रारी च सांगतात. तर निग्रो मुलगा म्हणतो मला खूप मजा आली काम करताना.

तेव्हा वर्ग शिक्षिका मुलांना म्हणतात की समजून घ्या मुलांनो की तुमची चिडचिड का झाली ? तुम्हाला का त्रास झाला आणि त्या एकट्या निग्रो मुलाला का त्रास झाला नाही , त्याची चिडचिड का झाली नाही. तर तो निग्रो म्हणजे त्याचा जन्म जिथे झाला , तो ज्या ठिकाणी वाढला तो भाग आफ्रिका सारख्या कडक उन्हाचा असल्यामुळे तिथले हवामान , प्रादेशिक रचना या तून या मुलाचा वर्ण काळा झाला. आणि त्याला त्या हवेची सवय असल्यामुळे त्रास झाला नाही.

याउलट तुम्हाला तशी सवय नसल्यामुळे तुम्हाला उन्हाचा त्रास झाला. तुम्ही आठ दिवस उन्हात काम केले तर तुम्हाला हा फरक जाणवला.
तेव्हा सर्व समजून जातात की या निग्रो मुलाची काहीच चूक नाही , आणि एव्हढे दिवस त्याच्या काळया रंगावरून आपण त्याला खूप त्रास देत होतो. आणि त्यामुळे ती मुले पुढे जावून त्या निग्रो मुलाला समजून घेतात आणि त्याच्याबरोबर मैत्री करतात.

यात काय झाले की वर्गशिक्षिका या दोन्ही मुलांच्या बाजू समजून घेतात ,त्यांची समजून घेण्याची मानसिकता मुलांवर कोणतीही चिडचिड न करता , आपला मानसिक कंट्रोल न ढळू देता , कोणालाही न दुखवता , नाराज न करता विचारांमध्ये फरक असलेली परिस्थिती सहज आणि गोडी मध्ये बदलतात.

आपल्या आयुष्यात बरेचदा असे घडते आपल्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा , किंवा आपण एक गृहीत धरून जात असतो. त्यांना त्यांच्या मतानुसार ते वागले , आपल्याला ते पटले नाही तर आपण रागावतो, चिडतो , कधी अबोला धरतो तर कधी भांडतो . आपल्याला जे वाटते ते ही बरोबर असेल पण समोरच्या चे ही त्याच्या दृष्टीने बरोबर असेल तर आपण समजून घेतले पाहिजे ना!! तरच एकमेकांना समजून घेण्याची सकारात्मक मानसिकता राहील. सगळेच आनंदी , सुखी आणि शांततामय जीवन जगतील.

समजून नाही घेतले तर उगीचच एकमेकांविषयी मनात अढी राहील ,द्वेष , मत्सर कधी कधी बदला घेण्याची वृत्ती वाढेल, कधी अबोला धरला जाईल , गैरसमजातून दुरावा ही येईल. आणि आपल्या लोकांच्या सोबत आनंदी , उत्साही , secure फील करत असतो ते एकाकी जीवन वाटेल.

म्हणूनच एकमेकांना आपली समजून घेण्याची मानसिकता आपली परिस्थिती बदलते. जीवनात चैतन्य निर्माण करते. बरणी मध्ये चांगले भरलेले टोमॅटो थोडे दिवसाने एखाद दुसरा खराब व्हायला लागतो , वेळीच त्यातले खराब टोमॅटो बाहेर काढून टाका आणि चांगले ठेवा आणि त्यात चांगल्या टोमॅटोची भर करा..

तसेच वेळ जाण्यापूर्वी एकमेकांस समजून घ्या , वेळ गेली तर बरणीतले एक – दोन खराब झालेले टोमॅटो हे सगळे टोमॅटो खराब करतील. तसे मनात एकमेकांविषयी एखादा अविचार आला, राग , द्वेष , गैरसमज झाला तर तो वेळीच काढून टाका आणि त्या मनातल्या बरणी मध्ये ही चांगल्या विचारांची , सकारात्मक गोष्टींची , भावनांची , निरोगी मनाची भर घाला. एकमेकांस समजून घेण्याची मानसिकता ठेवली तरच दुराव्या ऐवजी जवळीक निर्माण होईल.

थोडे मनावर पण sanitizer शिंपडत चला . आपण इतरांची मानसिकता बिघडविणे आणि इतरांच्या मुळे आपली मानसिकता बिघडवून घेणे हा फार मोठा संक्रमित आजार आहेत.

आयुष्य सुंदर आहे आणि ते एकदाच मिळते. वेळ , व्यक्ती , आनंद , वय, संधी निघून गेली तर परत मिळत नाही म्हणून एकमेकांना , आपल्या लोकांना समजून घेण्यात आपल्या मनाचा मोठेपणा , निरोगीपणा , आणि संतुलन दाखवा. आपल्या मनाचा मोठेपणा दाखवा. पृथ्वी जशी ऊन , वारा, पावूस , वादळ , भूकंप यासारख्या आणि आता मानव निर्मित हवेचे प्रदूषण , गाड्यांचे प्रदूषण ,मोठ्या आवाजच प्रदूषण , दूषित वायू , दूषित पाणी नदीत सोडले जाते ते सगळे आपल्यात सामावून घेते तसे आपण इतरांच्या भावना , त्यांचे त्रास , दुःख , शारीरिक बदल , मनामध्ले विचार , शंका याचा विचार करून आपली समजून घेण्याची मानसिकता वाढविली आपली तर त्यांच्या मुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही , आपल्या भावना , विचार भरकटणार नाहीत. शांतता राहील आणि परिस्थिती आटोक्यात राहते म्हणजेच परिस्थिती बदलते.

बघा आयुष्य सुंदर आहे. तुमचा दृष्टिकोन बदला. समजविण्यात दुसऱ्या ला हट्टी आणि आडमुठेपणा आणि इतरांना त्यांची गरज आहे हा attitude , ego वाढविण्यापेक्षा समजून घ्या आणि शांत रहा , बघा परिस्थिती बदलेल. वेळ आली की समोरचा ही शांत होईल .

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!