Skip to content

आपली वागण्याची पद्धत योग्य की अयोग्य हे कसे ठरवावे??

आपली वागण्याची पद्धत योग्य की अयोग्य हे कसे ठरवावे??


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळ


“Behaviour” अर्थात आपलं वागणं ……आपल्या वागण्याला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे.आपलं वागणं नीटनेटकं असेल तर आपलं आयुष्य व्यवस्थित घडायला मदत होते. अन्यथा आयुष्याची जडणघडण फारशी व्यवस्थित होत नाही. इतकच नाही तर माणसाची किंमत सुद्धा त्याच्या वागण्या – बोलण्यावरून ठरत असते.त्याच वागणं नीटनेटकं , सुसंस्कृत नसेल तर त्या माणसाशी कुणी साधी जवळीकही साधायला तयार होत नाही.

त्यामुळे इथे असलेल्या प्रत्येकाला आपापल्या वागण्याची जाणीव हवी.काय आणि कसं वागायच…? याचं भान प्रत्येकाला हवं.आपल्या वागण्याची पद्धत चुकतेय की बरोबर आहे… हेही माणसाला समजणं “must” आहे.

अनेकदा काय योग्य नी काय अयोग्य हे समजून घेण्यातच फारसा वेळ निघून जातो. इतकच नाही तर आपल्याला अनेकदा आपली वागण्याची पद्धत योग्य आहे की नाही हेही समजत नाही. आपल्याला कधीकधी ते ठरवताच येत नाही. तर पाहूयात आपली वागण्याची पद्धत योग्य की अयोग्य हे कसं ठरवायच……….

*एखाद्याशी विनाकारण मोठ्या आवाजात बोलणे.
*एखाद्याला विनाकारण दुर्लक्ष करणे.
*काहीही ऐकून न घेता असमजुतदारपणा दाखविणे.
*कोणतीही गोष्ट शांतपणे ऐकून न घेणे.
*नेहमी उर्मठपणे बोलणे.
*सतत चिडचिड करून वागणे.
*न ऐकता ,न पाहता एखाद्याला दोष देणे,वाटेल तसं बोलणे.
*मीपणाने वागणे.अर्थात सतत “मी” ,”माझं” वगैरे वगैरे करणे.

अशा प्रकारे जर आपलं वागणं असेल तर ते वागणंअयोग्य आहे. आपली वागण्याची पद्धत चुकतेय याची जाणीव आपल्याला वेळीच व्हायला हवी. अन्यथा आपण जे वागतोय ते आपल्याला नेहमीच योग्य वाटत राहील. आणि आपण असेच अयोग्य पद्धतीने वागत राहू. त्यामुळे काय अयोग्य आहे आणि काय योग्य यामधील फरक जाणून घेणे आवश्यक आहे.

कारण अयोग्य पद्धतीने वागणे म्हणजे आपल्या आयुष्याच एक प्रकारे नुकसान करून घेण्यासारखच आहे. अयोग्य वर्तन कुणाला आवडतं…..? कुणालाही असं असभ्य ,अयोग्य वर्तन आवडत नाही. आणि वर्तन जर अयोग्य असेल तर सहसा आपल्या सहवासातही कुणी वावरत नाही. “तो/ती खूप अयोग्य पद्धतीने वागतात..त्यांच वागणं आम्हाला पटत नाही….” असं म्हणणारे अनेकजण असतात. त्यामुळे आपलं वर्तन हे नेहमीच सभ्य ,योग्य हवं…अयोग्य नाही.

एखादं उदाहरण सांगायच झालं तर….
* आपण प्रत्येकाशी वागताना वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतो.लहानांशी आणि मोठ्यांसोबतच आपलं वागणं हे खूप भिन्न असतं.आणि बऱ्याचदा आपला लहानांशी आणि मोठ्यांशी वागताना तोल हा जातोच.कळत नकळतपणे का होईना आपली वागण्याची पद्धत चुकते. “लहान आहेस ,माझ्यावर आवाज चढवून बोलायच नाही ” असं सांगताना आपण समजून सांगण्याऐवजी एका विशिष्ट तोऱ्यात सांगतो. “मोठ्ठा आहेस म्हणून काय झालं….वगैरे वगैरे हे सगळं एका वेगळ्याच पद्धतीने आपण बोलतो ते अत्यंत चुकीचं आहे.

*रस्त्यात कुणाला धक्का लागला तर “sorry” बोलायच सोडून कित्येकजण तर अगदी अरेरावीपणा करत “दिसत नाही का ऐ आंधळ्या” वगैरे वगैरे भाषेत बोलून हुज्जत घालत बसतात.कुणी एक सहसा माघार घेताना तिथे दिसत नाही.(एखादा अपवाद वगळता)

अशा तऱ्हेने आपण अनेकदा अयोग्य पणे वागत असतो पण ते मान्य करायला मात्र मुळीच तयार नसतो.(हे सुद्धा अयोग्यच आहे.)

आता योग्य पद्धत म्हणाल तर……
*समोरच्याशी समंजसपणे बोलणे.
*कुठल्याही गोष्टीची शहानिशा करून नंतरच त्यावर प्रतिक्रिया देणे.
*प्रत्येकाशी (लहान आणि मोठे) आदराणे वागणे.
*कुठलाही “मी”पणा न बाळगणे.

अशा अनेक पद्धती असतात ज्या की खरोखरच योग्य असतात. आणि असं वागणं असेल तर आयुष्याची घडी बसायला वेळ लागत नाही.

तर…अशा काही गोष्टी असतात ज्यांवरून आपली वागण्याची पद्धत योग्य की अयोग्य हे समजायला सोपं जातं.आणि मुळातच प्रत्येकाला हे ठरवता आलं पाहिजे की काय योग्य नी काय अयोग्य…?इतकच नाही तर आपल्या प्रत्येक वागण्याची आपल्याला जाणीव हवी.

आणि साधं सोप सरळ सांगायच झालं तर इतर लोक जेव्हा योग्य अयोग्य वर्तन करतात , चांगल-वाईट वागतात त्याकडे आपण लक्ष देऊन आपण नक्की कसे वागतोय…? हे तपासून पहा.त्यावरूनही आपल्या वागण्याची पद्धत किती योग्य आणि किती अयोग्य आहे हे समजेल.

बाकी… आपलं वागणं हे नेहमी योग्य असेल यासाठी प्रयत्न करा. कारण योग्य वागणं माणसाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतं……!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!