आपली जगण्याची इच्छा सतत आपला वाईट विचार करणाऱ्यांपेक्षा अधिक असायला हवी.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपला आयुष्य अनेक सुखदुःख चढ-उतार यांनी भरलेल असत. तसेच आयुष्यामध्ये आपण कधी एकटे नसतो. आपण समाजामध्ये वावरत असतो जिथे सर्व प्रकारची माणसं आपल्याला अनुभवायला मिळत असतात. अगदी लहानपणापासून ते म्हातारा होईपर्यंत. आता माणसं आली म्हणजे त्यांचे स्वभाव आले, वेगवेगळ्या प्रवृत्ती आल्या, त्यांचे वेगवेगळे विचार आले.
अशा माणसांमध्ये वावरत असताना दर वेळी आपल्याला आपला चांगला विचार करणारी माणसं भेटतील असे नाही. आपल्या आजूबाजूला, आपल्या एकंदरीत आयुष्यात आपल्याला अनेक माणसं भेटतात आपल्याबद्दल चांगला विचार करत नाहीत. अशी बरीच लोक असतात ज्यांना दुसऱ्यांचे चांगले झालेले आवडत नसते.
दुसऱ्यांचे यश, उन्नती अशा लोकांना पचवता येत नाही. तसंच दुसऱ्या बद्दल वाईट विचार करतात. आपणही बऱ्याचदा याचा अनुभव घेतला असेल की आपल्या आयुष्यात काही चांगले झाले की आपल्याला अनेक जणांच्या शुभेच्छा मिळतात, आशीर्वाद मिळतात. परंतु अशी काही जण असतात त्यांना आनंद आवडत नाही, त्यांच्या तोंडातून काही ना काही वाईट निघतेच.
अनेक जण अशा गोष्टींमुळे निराश हताश होतात. मी लोकांचा काय इतका वाईट केल आहे म्हणून लोक माझ्या बद्दल वाईट चिंतन करतात, मी सर्वांशी प्रेमाने वागूनदेखील लोक अस वागतात, मी का जगावं असे विचार अनेकांच्या मनात येतात.
परंतु लोकांनी आपल्याबद्दल कितीही वाईट विचार केला तरी आपली जगण्याची इच्छा नेहमी जास्त असायला पाहिजे. कारण आपल्याशी लोकांनी कसं वागावं, कसं राहावं ते आपल्या हातात नाही. परंतु, आपले विचार, आपलं वागणं, आपलं आयुष्य आपल्या हातात आहेत जे आपल्याला परत परत मिळत नाही, जे एकदाच मिळतं. ज्याला फक्त आपण जगणार आहोत, अर्थपूर्ण बनवणार आहोत.
जेव्हा जेव्हा आपली जगण्याची इच्छा आपल्याला कमी होत आहे असे वाटेल तेव्हा स्वतःला आपल्या जगण्याचं कारण सतत विचारत राहायचं.
जर्मन फिलॉसॉफर नित्शे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. “ज्याला का जगायचं याचा उलगडा झाला त्याला कशाही परिस्थितीत जगता येते.”
या ‘का’ च उत्तर मिळणे म्हणजे आपल्या आयुष्याला अर्थ पूर्ण बनवणे आणि हा अर्थ ही मूल्ये आपल आयुष्य जगण्याची इच्छा वाढवतात, ही मूल्ये प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात मिळतात. फक्त ती त्याने शोधली पाहिजेत.
ही वाईट विचार करणारे लोक, हीच फक्त आपल्या आयुष्याचा भाग नाहीत. आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, पॉझिटिव्ह आहेत. तिथे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्यातून आपलं जीवन अजून समृद्ध केलं पाहिजे.
हिटलरच्या नाझी छावणीतून असह्य वेदना सहन करून, त्रास भोगून हे जी लोक जिवंत राहिली त्यातील एक होते Victor frankle, ज्यांच्या जिवंत असण्याचं कारण त्यांना कमी त्रास दिला किंवा त्यांना कोणी सहानभूती दाखवली असं नसून, त्यांची जगण्याची इच्छा प्रबळ होती हे आहे. त्यांना त्यांच्या आयुष्याचा अर्थ मिळाला होता जो जगालाही मिळावा म्हणून त्यांनी logotherapy उदयास आणली. ज्यातून व्यक्तींनी आपल्या आयुष्याचा अर्थ कसा शोधायचा ह्यावर विचार करायला लावलं आहे, जे यातून समजते. आपल्या जगण्याचा अर्थ आपण शोधू लागतो जो आपली जगण्याची इच्छा वाढवतो.
जसं आधी म्हटलं तसं लोकांनी आपल्या बद्दल कितीही वाईट विचार केला तरी त्याचा परिणाम करून घेणं न घेणं हे आपल्या हातात आहे. या निवडीचे स्वातंत्र्य नेहमी आपल्या हातात राहील. त्याबद्दलचे frankle चे विचार लक्षात ठेवण्यासारखे आहेत. ते म्हणतात,
“Everything can be taken from a man but one thing, The last of the human freedoms- choose one’s attitude in any given set of circumstances, to choose one’s own way….”
लोका कितीही वाईट वागले, वाईट विचार केला तरी आपण तेवढ्या जास्त इच्छेने आपल आयुष्य जगणं ही त्यांची हार आणि आपली जीत असणार आहे. कारण सोनं जेवढे जास्त तापवलं जाईल तेवढे अधिक तेजोमय होतं. तसंच आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवा. आपल्या जगण्याची इच्छा वाढवा. त्यासाठी ते अर्थ, ती मूल्य शोधा.
हे इतकं सुंदर आयुष्य फक्त आपल्याला एकदाच मिळतं. ते भरभरून जगा. अनुभव चांगले, वाईट दोन्ही असतात. सर्वांचा स्वीकार करून, त्यातून मार्ग काढून पुढे जा. म्हणून मंगेश पाडगावकर यांनी म्हटलं आहे,
या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे,
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

मस्तच..!