Skip to content

आपली ऊर्जा ही केवळ काळजी करण्यातच संपवू नये.

आपली ऊर्जा ही केवळ काळजी करण्यातच संपवू नये.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


मित्रांनो , आयुष्य सहज सोपं आणि सुंदर आहे. पण आपणच त्याला एखाद्या दोऱ्याप्रमाणे गुंतून ठेवतो.आणि मग आपल्याला स्वतःलाच तो गुंता सोडवणं कठीण जातं.आपल्याला स्वतःलाही माहीत नसतं पुढच्या क्षणी काय होणार आहे आणि काय नाही….म्हणजे एखाद्याचं आयुष्य हे काही क्षणांसाठी असु शकतं तर कुणाच दीर्घायुषी असु शकतं.

थोडक्यात काय तर आपलं आयुष्य किती आहे हे आपण खात्रीने मुळीच सांगू शकत नाही. तरीसुद्धा आपण आपलं संपूर्ण आयुष्य काळजी करण्यात घालवतो. आपली ऊर्जा आणि वेळ या दोन्ही गोष्टी आपण केवळ एखाद्या गोष्टीची काळजी करण्यातच घालवतो.काळजी व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी असतात हे आपण का विसरतो….?

सगळं अगदी “बेशक” मान्य की..”काळजी करणे” हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. पण तुम्हाला माहीत आहे का…? तुम्ही काळजी नाही तर अतिकाळजी करत असता.जितका वेळ मिळेल तितका वेळ काळजी करण्यातच घालवायचा म्हणजे साधं काम नाही. शारिरीक आणि मानसिक अशा या ऊर्जा कुठे आणि किती खर्च करायच्या याची जाणीव आपल्याला हवी.

नाहीतर आपलं आपल्यावरच नियंत्रण राहणार नाही. ऊर्जेबरोबर आपण आपला अमूल्य वेळही काळजी करण्यात खर्च करत असतो.मला वाटतं अशावेळी आपण वेळेचं महत्त्व विसरून जातो.आपल्याला समोर दिसत असते ती केवळ काळजीची भिंत…..!

पण मला सांगा …घराला केवळ भिंती असतात का…?दारं खिडक्या ,बालकणीसुद्धा असते नं…? आपण काय घराच्या भिंतीच स्वच्छ करतो का…? नाही नं…खूप “simple” आहे. आयुष्यात केवळ काळजी नसतेच.काळजी सोडून इतर अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात असतात जिथे खरं तर आपण वेळ आणि ऊर्जा खर्च करणं गरजेच असतं.पण आपण मात्र अशा ठिकाणी अजिबात आपली ऊर्जा संपवत नाही.छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करण्यातच आपण आपली कितीतरी ऊर्जा संपवून टाकतो.आणि मग काळजी करून तर थकून जातोच पण जी काही ऊर्जा खर्च झालेली असते तिच्यामुळे तर थकवा हा अधिकच जाणवतो.”काळजी करू नका” असं अजिबात मी सांगणार नाही पण “अतिकाळजी मात्र करू नका” हे नक्की सांगेन.

आपल्याकडे जी काही शारीरिक, मानसिक ऊर्जा आहे ती आयुष्यातील इतर अनेक गोष्टी करण्यासाठी सुद्धा वापरून पहा.आपले वेगवेगळे छंद,आपली आवड ,आपल्या कला जपण्यासाठी त्या ऊर्जेचा वापर करून पहा.तुमची ऊर्जा अधिकाधिक क्षमतेने वाढत जाईन. आवडीच्या गोष्टी केल्या तर मनाला नवी चेतना मिळते असं म्हणतात. पण मग सतत अशी काळजी करून काय मिळतं….? तुम्हाला माहीत आहे का…?

या सतत काळजी करण्याने आपल्याला काळजी करण्याची सवय नाही तर एक प्रकारे व्यसनच लागतं.मित्रांनो , एखाद्याची काळजी करणं चांगलं असतंच पण अतिकाळजी करणं मात्र फार घातक असतं. अतिकाळजी म्हणजे स्वतःच्या नी दुसऱ्याच्या जीवालाही घोर लावणे.काळजीलापण एक लिमीट असावं नं….?

आयुष्यात केवळ “काळजी” महत्वाची नाहीये.आपल्या वेळेला ,ऊर्जेला नी उरल्यासुरल्या आयुष्याला या काळजीभोवती गुंडाळून ठेवू नका.जरा काळजीच्या जगातून बाहेर पडा नी इतरत्र पहा…काळजीपेक्षाही कितीतरी अधिक महत्वाच्या गोष्टी या जगात आहेत.मुळातच या काळजीच्या नादात आपण आपल्यातल्या “स्व” ला देखील विसरून जातो.

काळजी करून करून मनाला थकवा येतो. आणि मन थकलं की शरीर आपोआप थकून जातं.त्या शरिराची ऊर्जा कोणतेही श्रम न करताही संपून जाते.म्हणजे पहा , किती आणि कशाप्रकारे ही काळजी आपल्यावर परिणाम करत असते.

चांगलं वाईट समजण्याइतपत तुम्ही समजदार तर नक्कीच असाल…मग एक विनंती समजून—- आपली ऊर्जा अशी काळजी करण्यात संपवू नका.तीच ऊर्जा स्वतःच्या चार चांगल्या गोष्टींसाठी वापरा. स्वतःच्या आरोग्यासाठी , आनंदासाठी , आयुष्यासाठी तीच ऊर्जा एकदा वापरून तर पहा…..नको ती काळजी आपोआप मिटून जाईल.

जाता जाता एक छोटस उदाहरण सांगते…..
*सूर्य….आता या सूर्याचच पहा नं…तो त्याची ऊर्जा कितीतरी चांगल्या कामांसाठी वापरतोय.तो त्याच्या ऊर्जेने आपल्याला प्रेरित करतोय ,प्रकाशित करतोय.अगदी तसच आपणही आपल्या ऊर्जेचा वापर अशा ठिकाणी करा की ज्यामुळे किंवा त्यामधून इतरांना आणि स्वतःलाही त्यातून नवी प्रेरणा मिळेल.

उगाचच क्षणाक्षणाला काळजी करून मर्यादित असलेली ही ऊर्जा संपवू नका.आणि केवळ काळजीसाठी तर अजिबात ही ऊर्जा संपवू नका.त्यापेक्षा ती वाढवता कशी येईल यासाठी प्रयत्न करा.आयुष्य पहा किती सुंदर होईल……!!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपली ऊर्जा ही केवळ काळजी करण्यातच संपवू नये.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!