Skip to content

आपला एक आनंदी मूड वातावरणात असंख्य ‘आनंदी तरंग’ उत्पन्न करत असतो.

आपला एक आनंदी मूड वातावरणात असंख्य ‘आनंदी तरंग’ उत्पन्न करत असतो.


मयुरी महेंद्र महाजन


राग ,भीती, आनंद,प्रेम, द्वेष अशा कितीतरी भावना, माणूस म्हणून या जीवन चक्रामध्ये घडत असतात ,आणि ज्याप्रमाणे आपली भावना असेलं, त्याच प्रमाणे आपला मूड असतो, आणि आपल्या मूडप्रमाणे त्याचे तरंग वातावरणात निर्माण होत असतात, जशी आपली परिस्थिती असते, त्याप्रमाणे आपल्या भावना असतात ,आपण माणूस आहोत ,आपल्यात सर्व प्रकारच्या भावना आहेत, माणसांमध्ये जर भावनाच नसत्या, तर शेतात लटकवलेल्या बुजगावण्यात आणि माणसात फरक नसता,…

जसे प्रेमाने ,आईने जवळ घेतले, तरी त्या बाळाच्या आनंदाला पारावर नसतो ,आईजवळ जाण्याआधी ते कितीतरी जीव ओकून रडत असतो, ही प्रेमाची भावना आहे, काहीही समजत नसण्याच्या ,त्या वयात सुद्धा आपल्याला भावना कळतात, म्हणजे परमेश्वराने जे मॉडेल तयार केलेले आहे, ते किती छान पणे काम करते, नाही का ?

आपण बघू आपण आनंदी कधी असतो, शाळेत एखाद्या स्पर्धेत भाग घेतल्यावरती , मिळालेले एखादे बक्षीस ,आणि ते बक्षीस घेतांनाचा आनंद ,यापेक्षा ते बक्षीस घेऊन, घरी जाऊन, आई-बाबांना कधी दाखवतो, आणि त्यानंतर त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप ,व त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आनंद पाहण्याचा तो दुहेरी आनंदाचा क्षण, आनंद देणारा असतो, कष्ट करत असलेल्या ,मेहनत घेत असलेल्या, तरुणाला / तरुणीला अथक परिश्रमाने ऐखादे यश गवसते, तेव्हा तो आनंद वेगळा असतो,

लग्न झालेल्या जोडप्याला, आई बाप होण्याचा मिळणारा आनंद आभाळाहून मोठा असतो, आपल्या पोराने स्वतःच्या मेहनतीने, कमवून एखादी गोष्ट बापाला दिली ,त्या बापाला त्याचा आनंद स्वर्गाचा वाटतो,

हे सर्व आनंदाचे क्षण झालेतं, पण बऱ्याचश्या गोष्टी आहेत, ज्या खूप छोट्या वाटतात ,पण त्यांचा आनंद मात्र खूप मोठा असतो, कधी तरी निवांत वेळ काढून, आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत गप्पा गोष्टी असतील ,किंवा स्वतः सोबत निसर्गाच्या गार हवे सोबत जगण्यातल्या शोधलेले क्षण असतील, वा लहान बाळा सोबत घालवलेले क्षण असतील, तसं तरं या गोष्टी खूप छोट्या वाटत असतील ,परंतु यामध्ये आपण आपल्या आनंदाच्या भावना अनुभवत असतो ,आणि आपला एक आनंदी मुड, वातावरणात असंख्य आनंदाचे तरंग उत्पन्न करत असतो,

यासाठी उदाहरण पाहूया, जसे शेतकरी पेरणी करत असताना, बीजाचा एक- एक दाणा पेरत जातो ,परंतु त्या एका दाण्याचे आपल्याला असंख्य धान्यांमध्ये निसर्ग आपल्याला देत असतो, म्हणजे यावरून आपल्याला निसर्गाच्या दातृत्वाची ओळख होते ,जसे की आपण रहस्य सिद्धांताशी परिचित असालं, जसे की आपल्या ‘व्हेब्ज ‘असतील त्याप्रमाणे निसर्ग त्याला तथास्तु म्हणून जातो ,म्हणून आपण कशाप्रकारे आपल्या ‘व्हेब्ज’ निसर्गा मध्ये सोडतो, हेसुद्धा महत्त्वाचे आहे ,’रहस्य’ हे रॉन्डा बर्न यांचे पुस्तक आहे, ज्यामध्ये या सिद्धांताला आपण पूर्णतः विस्तृत मध्ये वाचून समजू शकतो.

बघा खूप गमतीशीर स्वभाव असणारी माणसं ,जेथे जाणार तेथे प्रत्येकाशी एकदम खेळीमेळीने आणि आनंदाने राहतात, अशा माणसांसोबत दुःखात असणाऱ्या व्यक्तीलाही आनंद वाटतो ,दुःखाची कधी सुट्टी झाली ,समजत सुद्धा नाही, असं नाही की अशा लोकांना दुःख नसते ,पण त्यांनी त्यांच्या दुःखाशी दोन हात करण्याची तयारी ठेवलेली असते, कारण त्यांना माहिती असते, दुःख दुःख करत बसल्याने दुःख संपणार नसते, त्यांच्या आनंदाचा मूड, त्यांच्या आजूबाजूला आनंदाचे वातावरण तयार करतो ,आणि आपल्यामुळे कुणाच्या आनंदात झालेली वाढ, माणसाच्या जगण्याचे क्षण, अजून सुखाद करते ,

मला असे नेहमी वाटते, की आपण असलेल्या गोष्टीत, नसलेला आनंद शोधायला हवा, कारण असलेल्या गोष्टीत नसलेला आनंद अनुभवता आला, तर जगणं सोपं होऊन जातं, आपण नसलेल्या गोष्टीचे दुःख कुरवाळत बसतो ,पण जवळ असलेल्या गोष्टीतला आनंद घ्यायचा विसरून जातो ,कारण की बऱ्याच दिवसात मी ज्या ज्या व्यक्तींना भेटले, त्यांना बघितल्यावर व त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले, की बरीच माणसे आपल्या कामामुळे चिडचिड करतात, त्यात त्यांना आवड आणि गोडी अनुभवता येत नाही, काही काम नसल्यामुळे ते निराश आहेत, काहींजवळ काम आहे, पैसा आहे ,परंतु कौटुंबिक समस्यांमुळे ते आनंदी नाही ,अशा बऱ्याच गोष्टी आहेत…

पण लक्षात घ्या, आपला आनंद हा सर्वस्वी आपल्या मनाचे समाधान आहे, आनंद हा अनुभव नसून ती अनुभूती आहे, कारण आनंद म्हणजे कुठली व्यक्ती किंवा वस्तू नाही ,जी असेलं तरचं आनंद आहे, ही गोष्ट खरी ,की आपल्या माणसांचा जाणं हे खूप दुखावणारं असते, परंतु या गोष्टी निमित्तमात्र…, जसे की वाढदिवसाची पार्टी करताना होणारा आनंद, हा त्या वस्तूमध्ये नाही,

परंतु आपल्यावरती प्रेम करणारी माणसं, आणि आपल्याप्रति त्यांचा असलेला जिव्हाळा ,हे बघून मनात आपण कुणासाठीतरी महत्त्वाचे आहोत, ही प्रेमाची भावना, जास्त आनंद देऊन जाते, हे गाणं ऐकताना आपण एक आनंद फील करतो, “आज मे उपर, आसमा नीचे, आज मे आगे, जमाना है पिछे” कधीतरी बालिश होवूनं जगावं, आणि जगण्याचा मनमुराद आनंद लुटावा…..!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “आपला एक आनंदी मूड वातावरणात असंख्य ‘आनंदी तरंग’ उत्पन्न करत असतो.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!