Skip to content

आपलं जीवन आपण खरंच तणावमुक्त जगू शकतो का??

आपलं जीवन आपण खरंच तणावमुक्त जगू शकतो का??


सोनाली जे


कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद , किंवा प्रतिक्रिया म्हणजे ‘तणाव’ होय.

एखादी गोष्ट आपल्या कंट्रोल मध्ये नसेल तर, किंवा बाह्य परिस्थिती मध्ये होणारा बदल आपण पटकन accept करत नाही त्यामुळे आपल्या मनाची होणारी अवस्था म्हणले तरी चालेल .

साध्या साध्या गोष्टीत आपण ताण घेतो , अभ्यास , नोकरी , घरकाम , व्यवसायात फायदा होईल का नुकसान वेळेत पोहचू का ? ही तणावाची काही कारणे.

आता आपण ठरविले तर आपले जीवन नक्कीच तणावमुक्त जगू शकतो. पण त्याकरिता आपल्याला ही प्रयत्न करावे लागतील , नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील , नवीन टेक्नॉलॉजी समजून त्याचा वापर कुठे आणि कसा करता येईल याचा विचार आणि तशी कृती.

आता ची परिस्थिती लक्षात घेता गेल्या दोन वर्षात covid pandemic परिस्थिती मुळे सगळीच कडे खूप तणावाचे वातावरण झाले आहे. सुरुवातीला सगळेच बंद होते.शाळा , ऑफिस , दुकाने यातून शिक्षण कसे पुढे मिळणार याची चिंता होती , सुरुवातीला मुलांना सुट्टी म्हणून मजा येत होती पण नंतर कंटाळा येवू लागला आणि आपल्या शिक्षणाचे पुढे काय होणार याची काळजी आणि त्यातून मुलांमध्ये भविष्याचे काय होईल या विचाराने तणाव निर्माण होवू लागले.

हे असे किती काळ चालू राहणार , यातून सगळ्या तणावातून बाहेर पडून मुलांना त्यांचे शिक्षण मिळावे त्यांची प्रगती व्हावी म्हणून मग ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाली , ऑफिस मध्ये जाणे शक्य नसल्याने work from home मध्ये ही ऑनलाईन काम सुरू झाले.

त्याचप्रमाणे e commerce web site याचा वापर करून तुम्हाला अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी घरपोच उपलब्ध होवू लागल्या. त्यात Artificial intelligence म्हणजेच सॉफ्टवेअर याचा ही वापर करण्यात येतो , तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल ती तुम्ही search करता त्या related अजून माहिती मग products वेगवेगळ्या कंपनीचे असतील , किंवा माहिती पाहिजे असेल तर एकच विषय पण त्या संदर्भात जे जे reference असतिल ते सॉफ्टवेअर तुम्हाला त्याची नोंद करून तुम्हाला ते pop up मध्ये येते..यातून सहज अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होवून तुम्हाला त्याचा उपयोग सहज करता येतो.

एवढ्या सोप्या गोष्टी आता झाल्या आहेत . नाही तर एक्स्पर्ट किंवा ज्यांना माहिती असेल त्यांच्यावर , पुस्तके कोणती ती शोधून ती मिळाली नाही तर मग त्यातले कोणी मास्टर्स असतील ते शोधून त्यांच्याकडून माहिती मिळविण्यात वेळ खूप जात असे. आणि मिळेल का अचूक माहिती याची काळजी ही राहत असे आणि एक प्रकारचा तणाव ही निर्माण होत असे. पण या advance technology मुळे बरेचसे तणाव कमी झाले आहेत. मुलांचे activity क्लास , अभ्यासाचे class ही ऑनलाईन सुरू झाले. म्हणजे सतत अभ्यासाचा असणारा तणाव यातून मुले रिलॅक्स होतात. एका वेगळ्या आणि आवडत्या विश्वात जगतात.

इंटरनेट ची मदत म्हणजे काय तर advance technology , I.T. आणि digital technology , Artificial Intelligence , विविध सॉफ्टवेअर, याचा उपयोग , कोणत्या प्रकारची गरज आणि कोणत्या गोष्टीचा वापर आहे यानुसार नवीन टूल्स तयार करण्यात आली . यामुळे बऱ्याच गोष्टी ऑनलाईन च सुरू आहेत.

Artificial intelligence याचा वापर घरापर्यंत सुरू झाला आहे त्यातून तुम्ही उपकरणे , स्मार्ट किचन मध्ये cleaning म्हणा किंवा cooking मध्ये ही रोबो हेल्प करतो , शिवाय cleaning machine , vaccume cleaner रोबो च तो त्याला टायमर सेट करून मोबाईल वरून कंट्रोल करू शकता की तो घर स्वच्छ करून ठेवतो , शिवाय वॉशिंग मशीन तुम्ही जरी बाहेर असलात तरी मोबाईल वरून on करू शकता .प्रोग्राम सेट करून , घरी येईपर्यंत मशीन चे काम पूर्ण .आल्या वर फक्त कपडे वाळत टाकले की संपले.

Alexa program सेट करून बरीच कामे सहजासहजी करू शकता त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि कामाचे टेन्शन ही वाचते . तुमच्या मोबाईल वरून स्मार्ट होम वापरू शकता. घरातून बाहेर पडल्यावर घर नीट लॉक केले का ? याचा टेन्शन सीसीटीव्ही तुम्ही तुमच्या मोबाईल वर बघू शकता , पार्किंग systems आल्या आहेत , security systems आल्या आहेत ,त्यामुळे टेन्शन कमी झाले आहे.

हा रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतला तणाव आपण advance technology नी कमी केला आहे. रोज मोबाईल मधला reminder तुम्हाला त्या त्या गोष्टी वेळेत आठवण करून तुमचे विसरण्यातले किंवा त्या गोष्टी कामाच्या बिझी schedule मधून लक्षात ठेवण्याचे टेन्शन दूर करतो.

सायन्स , युद्ध , आर्मी , नेव्ही, वैद्यकीय क्षेत्र या सगळ्यात latest technology , artificial intelligence मोलाचे काम करतो त्यामुळे accuracy आली आहे. मानवी नियंत्रण ठेवणे याला मर्यादा असतात आणि प्रत्येक वेळी १०० टक्के accuracy देणे शक्य होत नाही. पण AI , नवीन technology यातून वेळेची बचत , energy ची बचत आणि सगळ्यात महत्वाचे perfection येवू लागले. त्यातून कळात नकळत असणारी बरेचशी टेन्शन कमी होवू लागली.

या व्यतिरिक्त तणाव कोणत्या गोष्टींचा असतो पूर्वी आपण इच्छित स्थळी वेळेत पोहचू शकू की नाही ?? याचा ही तणाव असे..समजा इंटरव्ह्यू ला जायचे आहे वेळेत पोहचायचे अंतर खूप असेल तर पूर्वी साधने नव्हती . परंतु आता अनेक वाहने मग स्वतची दुचाकी , चारचाकी असेल किंवा बस , कॅब, ट्रेन , विमाने , मेट्रो ही यामुळे कुठे ही सहज पोहचू शकता.. तो जो इच्छित ठिकाणी वेळेत पोहचण्याचा ताण तणाव होता तो ही दूर झाला.

हे काळाबरोबर चे बदल जसे आपण स्वीकारले , आपल्यात बदल घडवून आणले तसे जर आपण दैनंदिन व्यवहारात जरी अमलात आणले जसे की काही गोष्टींनी होणारी चिडचिड , राग , अपमान असेल , भावना दुखावल्या गेल्या असतील , नाती आणि त्यात होणारे बदल , बिघाड असतील यातून निर्माण होणारे नकारात्मक बदल किंवा प्रतिक्रिया म्हणजे तणाव यावर ही आपण नवीन तंत्र वापरून कंट्रोल ठेवू शकतो.

जसे की योगा असेल , breathing techniques असतील , विपश्यना ,मनःशांती करिता काही ऑनलाईन किंवा physically ही workshop असतात. Psychiatrist , psychologist , counsellor यांची ही मदत घेवू शकता. त्यातून ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे याचे तंत्र ही शिकू शकता आणि त्याचा वापर दैनंदिन जीवनात करू शकता.

काही वेळेस आपण उगीचच आपल्या मनावर तणावाचे ओझे बाळगत असतो.. बरेचदा एकमेकांशी मोकळेपणानं संवाद साधला, चर्चा केली , नवीन गोष्टी शिकून घेतल्या तरी मार्ग सापडत असतात.

समोरच्या व्यक्तीने आपल्याच मता प्रमाणे नाही वागले तर आपल्यात आणि त्याच्यात निर्माण होणारे तणावाचे वातावरण , हे तुम्ही तुमच्या अपेक्षा आणि तुमचे विचार यावर नियंत्रण ठेवून तणावमुक्त वातावरण निर्मिती करू शकता.

जी परिस्थिती निर्माण होईल त्यावर चिंता करून मानसिक तणाव निर्माण करण्यापेक्षा जी परिस्थिती असेल त्यामध्ये नवनवीन मार्ग शोधून ते मार्ग अवलंबिले तर त्या चिंता ही दूर होतील आणि आपण सगळेच तणावमुक्त जीवन जगू शकू.

आपलं जीवन आपण खरंच तणावमुक्त जगू शकतो का??तर हो आणि , ते बदल, कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद हा सकारात्मक दिशेने बदलण्याकरिता , सर्वात प्रथम होणारे बदल त्याचा स्वीकार करा आणि त्या गोष्टींचे तणाव दूर करण्याकरिता मार्ग शोधून ते अवलंबिले पाहिजेत.

आयुष्य सुंदर आहे. कोणत्याही गोष्टीच्या तणावाखाली जगण्यापेक्षा छोटे छोटे आनंद मिळवून , छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी आत्मसात करून , किरकोळ गोष्टीत द्वेष , राग , चिडचिड , हेवेदावे किंवा कामाचे ताण घेवून रडत खडत आयुष्य काढण्यापेक्षा आनंदाने आणि तणावमुक्त जगुयात.
आपण आपल्या तणावाचे व्यवस्थापन करण्याकरिता स्वतः च स्वतच्या मनाला सुदृढ करणार आहोत.ते आपल्याच हातात आहे.

या पूर्वीही मी एका लेखात सांगितले आहेच…

माईंडफुलनेस म्हणजे माझ्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातील मानसशास्त्रीय जाणिवामध्ये (emotional feelings), त्यांच्या प्रतिसादांमध्ये (responces), त्यांच्या निर्धारमध्ये (confirmation), त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये (reactions) त्यांच्या अनुभूतीमध्ये (experience) या सर्व घटकांमध्ये जाणीवपूर्वक बदल करून घेणे…

माईंडफुलनेस माईंड (मनोसाक्षीभाव)-

हा आपल्याला मानसिक दृष्ट्या परिपक्व बनविण्याकरिता किंवा आपल्याला अधिक जागृत करण्याकरिता आपले मानसिक संतुलन ठेवण्याकरिता आणि आनंदाच्या परमोच्च बिंदूवर पोहचण्या करिता मदत करतो.जसे की आपण म्हणतो आत्मपरीक्षण च जणू..आपल्या भावना ,( emotions) , thoughts ( विचार), feelings, या अंतर्गत भावना बाह्य जगताशी inter connected आहेत.

आपलं जीवन आपण खरंच लहान मुलासारखे , स्वच्छंदी फुलपाखरा सारखे तणावमुक्त जगू शकतो .याकरिता स्वतः चे मन आणि शरीर यांचीच साथ हवी..नवीन शिकण्याची मनाची तयारी हवी. तर तुम्ही तणावमुक्त जीवन जगण्याकरिता देणार ना ही साथ ? तुमची तुम्हाला आणि इतरांनाही ??


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपलं जीवन आपण खरंच तणावमुक्त जगू शकतो का??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!