आपलं कोणावाचूनही केव्हाही न अडणं, म्हणजेच आनंदी जीवन.
सोनाली जे.
मनुष्य प्राणी हा समाजशील आहे. समाजशास्त्रीय दृष्ट्या असेल , मानसशास्त्रीय दृष्ट्या असेल , किंवा अगदी जीवशास्त्रीय दृष्ट्या , शरीर शास्त्रीयदृष्ट्या .जे harmonal changes असतील हार्मोन्स ची गरज , भावनांची गरज , समाजात एकत्रीत रीत्या काही गोष्टी कराव्या लागतात. एकमेकांची गरज पडतेच. आपल्याला आयुष्यात अनेक लोकांची गरज कुठे ना कुठे पडत असते.
आपलं कोणावाचूनही केव्हाही न अडणं, म्हणजेच आनंदी जीवन. असे बरेच लोकांना वाटत असते. पण तसे एका दृष्टीने independent असणे ही जरी चांगली गोष्ट असली. आपली कामे आपण करत असलो आपले
कोणावाचूनही केव्हाही अडत नसले म्हणजेच आनंदी जीवन असणे हे मात्र तितकेसे पटत नाही. कारण खरे तर आपण आपलं कोनवाचून अडत नाही . आपले आपण समर्थ आहोत सगळे करायला असे म्हणत असतो तेव्हा ती जबाबदारी आपल्यावर पडत असते. आपल्याला पर्याय च नसतो , कोणीच आपल्या सोबत नसते. किंवा सोबत असेल तरी प्रत्येकजण त्यांच्या पुरते विचार करणारे असतात म्हणून ही आपल्याला आपली कामे आपण करण्याची सवय लागते.
उदाहरण : जॉइंट family आहे. सासू , सासरे , मोठी सून , मोठा मुलगा , त्यांची मुलगी , धाकटा मुलगा आणि सून. त्यात जबाबदारी पडते म्हणून मोठी सून आणि मुलगा वेगळे झाले. धाकटी सून नोकरी करणारी . तिला स्वैपाक आणि इतर गोष्टींची आवड ही नाही आणि सवड ही नाही. त्यामुळे जबाबदारी सासू वरती पडतेच.
स्वैपाक असेल , घरचे , बाहेरचे , आले गेले , व्यवहार सगळे सासू वर पडतेच . कोणतेच पर्याय नाहीत . त्यामुळे ती या गोष्टींची सवय करून घेते की आपलं कोणावाचूनही केव्हाही न अडू देणे. पण ती जरी आनंदाने करत असली तरी कारण काय असते तर रोज त्याच गोष्टी इतरांकडून अपेक्षा ठेवून चिडचिड करून परत आपणच गोष्टी करायच्या तर त्या चिडचिड करण्याचे दोष ही वातावरणात पसरतात.
तुम्ही जे अन्न शिजविता , अगदी एखाद्याच्या आवडीचा पदार्थ केला मात्र तो चिडचिड करून . मलाच करावे लागते .. मीच का नेहमी करायचे असे विचार असतील तर ते विचार ही तुम्ही आपल्याच आवडत्या व्यक्तीला देत असता. तुमचा त्रासिक चेहरा बघून त्या व्यक्तीला ही मानसिक त्रास होतो.
नक्की सासू ची ही अपेक्षा असणार ना कोणी तरी करावे. आपणहून पुढाकार घ्यावा. आता वय झाले आहे अनेक गोष्टी पटा पटा उरकत नाहीत. पण मदतीचा हात नाहीच त्यामुळे आनंदाने करावे लागतेच.
पण अशावेळी नक्कीच त्यांना अजून आनंद केव्हा होईल तर इतर सूना समजून घेवून जबाबदारी उचलतील . सगळ्याच जबाबदाऱ्या सासूने पार पाडल्याच पाहिजेत यापेक्षा सासूबाईंनी आवडीने एखादी गोष्ट कधी तरी करणे वेगळे. हा फरक जाणून त्यांना आराम दिला तर नक्कीच अजून जास्त आनंदी होतील त्या.
बरेचदा सासू चे स्वैपाक घरातले इतके वर्षाचे स्थान डळमळीत होईल अशी ही भावना असते सासू ची म्हणून ही ते सगळे जबाबदारीने करत असते. अशा वेळी सासू ला ही जर जाणीव करून दिली की तुमचे स्थान कायम आहेच.त्यांना विचारून कसे पदार्थ करायचे याकरिता त्यांना महत्व दिले तर ते त्यांना आवडणारे असतेच. आणि त्यातून दोघींचा ही आनंद वाढणार असतो. सुनेला ही आपण केल्याचा आनंद आणि सासूला ही आपल्याला महत्व दिल्याचा , आपल्याला विचारून केल्याचा आनंद.
तर काही वेळेस काही घरात सासू संपूर्ण जबाबदारी सूनेवर टाकते आणि सुनेला ते करण्याशिवाय पर्याय नसतो. अगदी आजारी असो , किंवा बाहेर जायचे असो .नोकरी असो. तिने सगळे करून मगच बाहेर पडायचे .अशावेळी सुनेला त्रास होत असतोच. पर्याय नसतोच . पण मग ती हेच तत्व स्वीकारते की आपलं कोणावाचूनही केव्हाही अडू द्यायचे नाही . पण ,म्हणजेच आनंदी जीवन का ? तर नाही ना ..
असेही काही आहेत की खरेच आपलं कोणावाचूनही केव्हाही न अडणं, म्हणजेच आनंदी जीवन. असे मानणारे ही खूप जण आहेत.
जे खूप egoistic आहेत .. त्यांचा इगो दिसतो . पण त्यामागे त्यांचे जे वाईट अनुभव असतात ते त्यांना खंबीर होण्यास शिकवत असतात.
उदाहरणार्थ : . मीना लग्न लवकर झाले. सासरी आल्यावर शिक्षण सुरू असताना सासऱ्यानी स्वतचं खर्च स्वतः करायचा सांगितले , नोकरी करायची सांगितले. नवरा त्याचा व्यवसाय नवीन तेवढा जम नाही त्यामुळे त्याची ही कुठे मदत नाही.
घरचे स्वैपाक पाणी सासू ने पूर्ण सोपविली होते तिच्यावर. मीना पहाटे उठून सगळं स्वैपाक , बाकी गोष्टी आवरून कॉलेज करून नंतर नोकरी करून परत घरी आल्यावर सगळे घरचे करून परत रात्री अभ्यास करत होती. यात तिची प्रचंड कसरत होत होती. पण कोणाला काही फरक पडत नव्हता. हे बघून मीना जी सुरुवातीला थोडी फार तक्रार करत असे. आई बाबांना .त्यापेक्षा त्यांनी सांगितले थोडी सहनशक्ती वाढव .
म्हणून मग तिने तिची. सहनशक्ती वाढविली आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागणार च हे मनात पक्के केले आणि त्यात आता कोनवाचुन काही अडत नाही हेच attitude ती ठेवू लागली. पण त्यामुळे ती आनंदी म्हणले तर एका दृष्टीने की तिने तिची सहनशक्ती वाढविली .आणि अपेक्षा सोडून दिल्या. पण करावे लागत होते. कसरत होत होती त्यात कधी कधी त्रास नक्कीच होत होते.
आणि आर्थिकदृष्ट्या कोणीच कधी मदत केली नाही त्यामुळे पुढे ही आयुष्यात ती तोच इगो ठेवून तिने कधी कोणाकडे पैसे मागितले नाहीत. आणि कधी कोणाला दिले ही नाहीत.
जे अनेक वर्ष एकेकटे राहणारे couple आहेत. ज्यांना मुलं बाळ. नाहीत . ज्यांना आहेत पण ती दूर आहेत. काहींना मुलं विचारत नाहीत. अशी लोक खरेच आपलं कोनावाचून काही अडणार नाही याची काळजी घेवून , आपला आनंद वाढवत असतात. आपलेच असणारे कोणी सोबत नाही . मदत करणारे नाही म्हणून आणि दुसऱ्या कोणी काही करावे आपल्यासाठी ही अपेक्षा ठेवत नाहीत. पण आहे त्यात आनंदी राहतात.
आयुष्य सुंदर आहे. आपलं कोणावाचूनही केव्हाही न अडणं, म्हणजेच आनंदी जीवन असेच समजू नका. पर्याय नसणे ही वेगळी गोष्ट. पण इगो बाळगून , कायम attitude ठेवून असे वागू नका.
आज तरुण आहोत उद्या म्हातारपण नक्की येणार आहे . आज ना उद्या अनेक गोष्टीत कदाचित परावलंबी व्हावे लागेल. म्हणूनच आज जे करता येईल ते नक्की करा ..आनंद ही मिळवा. पण आपल्या क्षमते पेक्षा जास्त करू नका. मदत हवी असेल तर तोंड उघडायला शिका. बोलायला शिका ..
आपल्या अडचणी निदान आपल्या लोकांना सांगायला शिका. त्यातून नक्की मार्ग मिळतील आणि सगळ्यांना आनंद. कारण आपल्या जवळच्या लोकांना ही काही तरी केल्याचे समाधान नक्कीच मिळणार आणि आपल्याला आपल्या लोकांनीं आपल्या करिता मार्ग काढले याचा आनंद आणि समाधान नक्कीच मिळणार.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


