आपलं अस्तित्व सिद्ध करा, तोपर्यंत कोणीही आपली दखल घेणार नाही.
सौ.मयुरी महेंद्र महाजन
पुणे(चिंतामणी चौक)
जोपर्यंत आपणं आपलं अस्तित्व सिद्ध करत नाही तोपर्यंत या जगात कुणीचं आपल्या अस्तित्वाची दखल घेत नाही. मित्रहो , वर लिहिलेल्या विषयावरती मी खूप ठाम आहे, कारण त्याची प्रचिती जगतांना आपल्या सर्वांनाच एक अस्तित्वाच्या विचारासाठी विचार करायला भाग पाडणारी आहे,….
खरं सांगायचं तर भरलेला किसा आपल्याला जग दावतो, पण रिकामा खिसा मात्र त्याच जगातली माणसे दाखवतो….
“अगर जेब खाली हो तो हमारे अपने भी हमे नही पहचानतें….!
आमच्या शिक्षकांचे एक वाक्य मला नेहमी आठवते , या जगात तुमची ओळख दोनच गोष्टींनी होते , एक म्हणजे तुमच्याजवळ काहीही नसताना असलेला संयम, आणि दोन तुमच्याजवळ सर्वकाही असताना असलेला नम्रपणा……
तुम्ही जर का काही काम करत नसालं, फक्त कुणावर तरी अवलंबून म्हणून जगत असालं तर यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय असू शकते….
आपले आई-वडील आपल्याला वाढवतात मोठं करतात, पण कुठपर्यंत, जोपर्यंत पंखात बळ येत नाही, तोपर्यंतच ना…..! नंतर आपली भरारी आपल्यालाच घ्यावी लागते , खरं आणि वास्तव सांगायचं झालं तर नाती- गोती, मित्रमंडळी, आणि समाज यामध्ये सर्वचं तुमचे हितचिंतक नसतात,
बरेचदा असे होते की समोरचा आपल्याला काय समजतो हे त्याच्या वागण्या बोलण्यावरुन, आणि त्याच्या डोळ्यांचे भाषेवरून आपल्याला कळते, कारण ती ताकद आहे जिथे खरोखरच काही बनावटी नसतेच…..!
येथे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी काहीतरी द्यावेच लागते ,मग त्यात त्याग असेल, प्रयत्नांची पराकाष्टा असेल, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड असेल….. परंतु एक गोष्ट नक्की आहे ,जर का आपली दखल या जगात कोणीच घेतं नसेल, तर तुमच्या सर्व क्षमता कामाला लावा ,
काय जमते आपल्याला, आपण काय सुंदर करू शकतो, आपल्यातल्या “स्व” जागा करा, त्याचा शोध घ्या, आणि हो प्रत्येकातं काहीतरी नावीन्य लपलेलं असतेचं, फक्त जोपर्यंत आपण सिद्ध करत नाही तोपर्यंत ……
आज भलेही आपली ईनकम एक रुपया नसेल ,आपण सुरुवातच केली नसेलं, भेटतीलं अशी माणसे जी तुमच्या आत्मविश्वास खेचतील , तुम्हाला नावे ठेवतील , चिडवतील, तुमच्या कामाला नावे ठेवतील, तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून तुम्हाला हिनवलं जाईल, पण प्रयत्न सोडू नका…..
आपल्या स्वतःशी आणि आपल्या कामाशी प्रामाणिक रहायचं….., भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला हाकलत बसायचं नाही, दुर्लक्ष करायचं आणि पुढे निघायचं……,
परीक्षेत पहिले येण्यासाठी सुद्धा त्या विद्यार्थ्याला अभ्यास करून आपली बुद्धि योग्यता सिद्ध करावी लागते, अगदी तसंच आणि हो आपल्याला काही सगळ्यांना सगळ्या गोष्टी एकदम बेस्ट जमतीलं असं नाही , पण ज्या जमत असतील एकदम बेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा….. शाळा आणि कॉलेज यामध्ये होणारा परिक्षा वेगळ्या आणि तुमच्या खऱ्या आयुष्यात होणाऱ्या परीक्षा वेगळ्या असतात,
आयुष्यात होणार्या या परीक्षांमध्ये आपण जिंकलंचं पाहिजे ,आपल्या अस्तित्वाची एक किनार आपण सिद्ध केलीचं पाहिजे, कधी कधी वाटतं खरंच मोल माणसाचं आहे की त्या पैश्याचं…..
पैशाविना या जगात काहीच होत नाही, पण पैसा सर्व काही नाही परंतु पैशाविना सुद्धा काही नाही, आपण आणि आपले अस्तित्व यांची सांगड जमलीचं पाहिजे…… जर का आपण आपले अस्तित्व सिद्ध नाही केले तर हे जग आपली योग्यता कधीचं ओळखू शकणार नाही…. म्हणून येथे स्वतःला प्रुफ करावं लागतं….
जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपली दखल कोणीच घेत नाही,
” साम्राज्य छोटा का होईना परंतु ते आपलं असावं” या प्रमाणे आपले अस्तित्व लहान का असेना पण काहीतरी नक्कीच असले पाहिजे……
तोपर्यंत गद्यंतर नव्हे… कारण की कर्तृत्वाची खरी ओळख आपल्या अस्तित्वातचं आहे…. ती कायम आपण सर्वांनी जोपासली पाहिजे…. आपल्याला किती लोक ओळखतात हे महत्वाचे नाही, परंतु ती आपल्याला का ओळखतात हे खूप महत्त्वाचे आहे…..
आपली ओळख छोटी असेल असू द्या ना, काय फरक पडतो, पण ती आपल्या स्वबळावर असली पाहिजे , तुम्ही तुमचं अस्तित्व सिद्ध करा, तुम्हाला चार जण स्वतःहून भेटायला येतील, तुम्ही काहीच करू नका, तुमच्या घरची लोकं सुद्धा तुमची दखल घेत नाही.
काय पटतंय का बघा….! विचार करुन ,कारण जगणं ही आपली आपल्याशीचं आपल्या अस्तित्वासाठीची लढाई आहे….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खुपच छान
अत्यंत सुंदर लेख, कमी शब्दात, घागर मे सागर.
Khup chhan lekh. Manala ubhari milali