Skip to content

आपण साऱ्यांनी आत्मिक समाधानाचं आयुष्य जगायला हवं… हा लेख वाचूया!

आपण साऱ्यांनी आत्मिक समाधानाचं आयुष्य जगायला हवं… हा लेख वाचूया!


आकांक्षा किरणराव आळणे

लातूर.


अमृता एक lively जगणारी मुलगी निसर्गाच्या सानिध्यात बसलेली होती.वाहणारी नदी,क्षितिजा पलीकडे दिसणारे डोंगर आणि डोंगराला स्वच्छन्दपणे स्पर्श करणारे दाटून आलेले ढग..!!! काय तो नजारा,काय तो नदीचा किनारा,हळूवार स्पर्श करून जाणारी ती हवेची झुळूक,नजरेत साठवून घ्यावं असे ते निसर्गाचे सौंदर्य..!!!

ह्या सर्वाचा आस्वाद घेत अमृता नदी किनारी एका बेंच वर बसलेली एकटीच;एकांताचा आस्वाद घेत..!!! शांतता,निसर्गाची निरागसता,निसर्गाची डोळसपणे बघणं,चमत्कारिक निसर्गाचा आपणही एक भाग आहोत ह्याची जाणीव होणं आणि हा सर्व विचार करत असताना एक स्मित हास्य चेहऱ्यावर येणं किती ते ‘पराकोटीचे सुख’ किती तो आंनद हे सर्व विचार आणि इतका आनन्द ती अनुभवत होती.

असे सर्व ‘निसर्ग-निरीक्षण’ सुरू असताना एकटीच बाकावर बसलेली अमृता अंतर्मुखी झाली आणि हळू-हळू मनात साठलेले विचार जणू निसर्गाच्या साक्षीने लिहू लागली(‘A letter of gratitude to the nature’).आपण खरच किती आनंदी,नशीबवान आहोत आयुष्यात.निसर्गाने सर्व काही तर दिले आहे आपल्याला,हाथ-पाय,2 वेळचे जेवण,उत्तम दर्जाचे शिक्षण,राहणीमान सर्व काही तर आहे आपल्याकडे ह्या ‘आंतरिक जाणीवेत’ ती रमली होती.

निसर्गाच्या कुशीत बसून निसर्गाबद्दल जणू ते एक gratitude च होते.येता-जाता काही लोक मात्र अमृताकडे खूप जिज्ञासू नजरेने बघत होते.कारण ती एकटीच आली होती घाटावर,एकांत,निवांत ह्याची अनुभूती घेता यावी म्हणून.मित्र-परिवार कोणीही सोबत नव्हते.तिला तसे awkward वाटन्यासारखे काहीही नव्हते करण अमृताला सवय होती एकटे फिरण्याची,स्वतः चे कामं स्वतः करण्याची;तिच्यासाठी हे काही नवीन नव्हते.

एक स्त्री म्हणून किती कमजोर समजल्या जातं समाजामध्ये स्त्रियांना.एकटी मुलगी म्हणजे ‘खुली-तिजोरी’.मुलगी म्हणजे सतत सांभाळत राहावे,सतत जपावे जणू मुलगी म्हणजे एक ‘ओझे’.स्त्री-सशक्तीकरन सारख्या मोठं-मोठ्या संकल्पना फक्त metro city मध्येच लागू आहेत का??स्त्री-सबलीकरण हे छोट्या गावातील स्त्रियांसाठी लागू नाही का??

स्त्री असोवा पुरुष हे मूलतः सबळ च असतात.पण समाजाचा एक वैचारीक रित्या मागासलेला वर्ग स्त्रियांना ‘अबला’ हे title देऊन मोकळं होतात.अधिकतम लोकांचे स्त्रियांबद्दल असेच विचार असतात आणि अमृताला जे awkward,emabarass feel करून देणारे लोकं म्हणजे ह्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारेच असतील कदाचित.

पण अमृता मात्र एक दिलखुलासपणे जगणारी मुलगी होती.जगा ची परवा न करणारी.ती लहानपापासूनच शिक्षणासाठी घर सोडून राहिलेली प्रत्येक चांगला-वाईट अनुभवातून ती गेली होती.त्यामुळे जगाकडे बघण्याचा तिचा एक स्वतंत्र दृष्टीकोण निर्माण झाला होता.सैनिकी शाळेत एक कडक शिस्तीत तिचे बालपण गेलेले.स्वावलंबनाचे अनेक धडे लहानपणीच तिने गिरवले होते.

लहानपणाचे स्वावलंबन काय तर स्वतःच स्वतःचा अभ्यास करणं,होस्टेलवर असल्यामुळे स्वतःचे कपडे स्वतः धुणे,shoes,room ह्याची स्वछता करणं इत्यादी लहान-सहान गोष्टी.पण ऐन मानसिक आणि शारीरिक वाढीच्या काळात एवढ्याही गोष्टी आव्हानात्मक वाटतात.शिवाय घरच्यांना सोडून अनोळखी लोकांमध्ये राहताना जी भावनिक घालमेल होते ती वेगळीच…!!

पण ह्यातून च अमृताच भवितव्य घडणार होतं,तिचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू ह्या प्रवासातच फुलणार होते आणि घडले देखील तसेच..!!Boarding School मध्ये शिकलेली अमृता आता छान उच्च पदावर कार्यरत आहे.आता तर ती आर्थिकरित्या देखील स्वतंत्र आहे.तिचे कोनावाचून काहीही अडत नाही.स्वतः च सुख-दुःख ती स्वतःच face करते.त्यामुळे ती खूप निर्भिड आहे.रिस्क घेते तर side effect सोसण्याची ताकद ही तिच्यामध्ये आहे.किती महत्त्वाचा भाग असतो हा प्रत्येकाच्या आयुष्यात…!!

कोनावाचून आपले काहीही अडत नाही ही अवस्था येण्यासाठी कितीतरी संकटांना,गोष्टींना स्वतःच तोंड द्यावं लागतं,सर्व स्वतःच handle केले की आयुष्याची ही महत्त्वाची अवस्था गाठता येते.त्यासाठी स्वतः परिपूर्णतेच्या मार्गाने सतत चालावे लागते…!!!

प्रत्येकाने भावनिकरित्या एवढे strong,एवढे सक्षम बनवावे स्वतःला.निदान प्रामाणिक प्रयत्न तरी करावा स्वतःला सक्षम बनवण्यासाठी.होता होइस्तोवर आपण कोणाला मदत करावी,आधार बनावा हा एक वेळ चांगला हेतू आहे पण भावनिकरित्या,आर्थिकरित्या कोणावर तरी अवलंबून राहणं,एखादाच्या डोक्याला ताप देणं ह्यापेक्षा केविलवाणी गोष्ट दुसरी कोणती नसूच शकते. त्यामुळेच आजपासून स्वतःला बजावून सांगा की-

” खुद को बना मजबूत चट्टानों सा,
किसीं को खोनेका ना दुख हो;
और किसींको पाने की ना चाह हो,
तू अकेला ही काफी है तेरे लिये,
बस मेहनत कर और कामयाब हो…!!”

ज्या दिवशी आयुष्याच्या ह्या पॉईंट ला तुम्ही पोहोचलात तो दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा जसा की अमृता क्षणो-क्षणी करते एकांतात आणिआत्मिक समाधानात….!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपण साऱ्यांनी आत्मिक समाधानाचं आयुष्य जगायला हवं… हा लेख वाचूया!”

  1. Chandrashekhar Barde

    छान, आत्मिक बळ देणारा लेख अगदी कमी शब्दात. प्रश्न केवळ स्त्री जातीचा नसून ( ती एकटी या विषयाला धरून) तो माझ्या जीवनातील अनुभवाने पुरुषांना पण आजकल ग्रासित आहे. समजाची, अवतीभवती मानवी पुतळ्यांची मानसिकतेत संवेदनांचे रक्त कमी, आणि दूषित घाण पाणीच जास्त आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!