आपण दुःखी आहोत यापेक्षा कोणीतरी सुखी आहे, याचंच दुःख जास्त!
सौ.मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
“”हर किसी कि अगर कोई पहचान ना होती ,
दुख से कभी किसी को कोई शिकायात ना होती,
अगर किसी के सुख की डाली हमने दिखी ना होती….!!!””
मनुष्य सतत कुणाचा ना कुणाचा विचार करतचं असतो, त्यातच नेहमी समोरच्या व्यक्तीचे किती सुखाचे दिवस आहेत असे आपल्या आयुष्यात कधी असणारं…….. आपल्या नशिबी नेहमीच दुःखाचे फासे ओढलेले आहेत, एक गेलं तर दुसरे तयारच असते, याचं कसं मस्त छान चाललंय, त्याचं पण किती भारी आहे मस्त, आणि एक आपलं करायला जा काही आणि होतं काही कधी संपणार ही दुःखाची कसोटी कुणास ठाऊक एका दुःखातून निघायचा प्रयत्न करायचा तर दुसरे दुःख समोर आ वासून उभे ठाकलेले असते…..
मित्रहो आपल्यापैकीच काहीजण हा संवाद स्वतःचं स्वतःशी करत असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे दुसरे कोणीतरी सुखी आहे आनंदी आहे याचं दुःख मात्र व्यक्तीला कायम असतं खरं तर सजीवांमध्ये फक्त मनुष्य प्राण्यांमध्ये जास्त बघायला मिळते अन्य प्राणी दुःखात असणाऱ्याला मदतीचा हात देतात सांत्वन करतात मानवप्राणी सहानुभूती करण्यापेक्षा सहानुभूती दाखवण्यामध्येचं जास्त वेळ घालवतो,
वास्तविक हे जीवन चक्र आहे आपण केलेल्या कर्माची फळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असतात आणि हो आपण काही सुखी दिसणाऱ्या माणसाला बघून हे नाही सांगू शकत की त्याने सर्व सुख प्राप्त करुन घेतलेय, असे होतच नाही सुख दुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात असतात………
फरक फक्त इतकाच असतो की कोणी त्याला हसून पार करतात, कोणी त्याच्याशी लढून ,तर कोणी निराशेच्या गर्तेत अडकून पण हे सुद्धा तितकेच खरे आहे प्रत्येक वेळी निघून जाण्यासाठी झालेली असते आपण आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी लोक बघतो जी कायम ईतरांच्या सुखाचा कौतुक सोहळा साजरा करतात परंतु नकारात्मक अर्थाने त्यामुळे अशी माणसे स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखा मुळे जास्त दुःखी असतात कायम दुसऱ्याशी तुलना करतात खरंतर इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे आपण आपल्या सुखदुःखाची तुलना कधीच कोणासोबत करू नये कारण प्रत्येक जण आपापल्या परीने सुखाची व्याख्या करतो परंतु दुःखाची व्याख्या मात्र इतरांच्या सुखांशी तुलना करूनच ठरवली जाते ,….
मित्रहो, मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे दुसऱ्याच्या सुखाने जर आपल्याला दुःख होत असेल तर एक लक्षात ठेवा सुखी आहोत असे दाखवणारी सर्वच माणसे सुखी नसतात ते सुद्धा कुठे ना कुठे मनात दुःखाचं गाठोडं घेऊन जगत असतात पैसा प्रॉपर्टी बघून कोणी सुखी आहे याचा अंदाज लावून तुम्ही दुःखी होऊ नका कारण सर्वच सुख पैशांमध्ये असते तर पैसे असणारा माणूस जगात सर्वात सुखी असला असता.
परंतु वास्तव तसे नाही येथे प्रत्येकासाठी सुखाच्या अनेक व्याख्या झालेल्या आहेत आणि दुःखाच्या सुद्धा आपण ज्या व्यक्तीला सुखी म्हणतोय त्या व्यक्तीने सुद्धा हे सुख मिळवण्यासाठी आधी कितीतरी दुःखाच्या वाटा पायदळी तुडवलेल्या असतील परंतु आपण फक्त आजच्या आणि सुखाच्या बाजूने त्याकडे बघतो आणि स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखामध्ये जास्त दुःखी होतो इतरांना दुखात पाहिल्यावर जर आपल्याला दुःख होत असेल तर निसर्गाने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातले याचे समाधान असते.
तसेच जर आपण कोणाच्या सुखात सुख मानले आनंदात आनंदीत झालो तर मला वाटतं की निसर्गाला आनंद होत असेल की मी याला माणूस म्हणून जन्म देण्याची ही परत परतफेड असेल आणि निदान कोणाच्या सुखात सुख नाही मानले तरी त्यात दुःख तरी मानू नये प्रत्येक वेळ जाण्यासाठीचं आलेली असते त्यामुळे आपली ही वेळ दुःखाची असू शकते आपले आयुष्य नाही…….. तो तर ऊन सावलीचा खेळ आहे सुख दुःख दुःख मागून सुख हे तर सुरूच राहणार आहे…….
इतरांचा विचार करून स्वतः दुखी व्हायचे नाही कारण आपल्याला त्यांच्या आयुष्याची फक्त एकच बाजू माहिती असते दुसरी बाजू बघण्याचा आपण कधी विचारच करत नाही किंबहुना दिसत असूनही त्याकडे मात्र आपले नेहमी दुर्लक्ष होते त्यामुळे आपल्या सुख दुःखाच्या वाटा आपण ठरवलेल्या असतात दुःख नको असले तरी त्याला भोगल्या खेरीज सुखाची चव चाखता येत नाही त्यामुळे आपल्या सुखाचा काळ मोजायला शिका दुःखा विषयीच्या तक्रारी आपोआपच कमी होऊ लागतील. ….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


