Skip to content

आपण ठरवलेली चुकीची धोरणं आपल्याला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीयेत.

आपण ठरवलेली चुकीची धोरणं आपल्याला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीयेत.


सोनाली जे


आपण ही माणसांविषयी , नात्याविषयी , येणाऱ्या अनुभवातून , शिक्षणाविषयी , नोकरी विषयी , कधी चांगल्या आणि वाईट वृत्ती विषयी , एखाद्या विषयी चांगला किंवा दुष्ट , वाईट हा दृष्टिकोन ठेवत असतो.  आणि त्यानुसार आपण कसे वागायचे याची  काही धोरणे ठरवत असतो. बरेचदा हा बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असू शकतो. जसे  एखाद्याच्या दृष्टीने एखादी गोष्ट बरोबर असते पण तीच दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून चुकीची असते.

आणि यातून च बरेचदा व्यक्ती दुसऱ्या विषयी काही चुकीचे विचार आणि त्यातून आपल्या वागण्याची धोरणे ठरवत असतो. अबोला धरत असतो. किंवा अगदी एखाद्या विषयी खुन्नस धरत असतो. यातून समोरच्याची आणि आपली ही शांतता अनेकदा भंग पावते . तर मानसिकता ही त्रासदायक होत जाते.

प्रेमभंग यासारखे दुःख आपण कोणाला सांगत नाही. आणि स्वतः मध्ये ते पचविण्याची ताकद नसते .. त्यामुळे इतर व्यक्तींच्या चुकीच्या वागण्याने आपल्या आयुष्याचे धोरण चुकीचे ठेवतो जसे इतरांच्या पासून अलिप्त होतो , एकांतात जातो. कधी कधी हताश , निराश होतो इतरांच्या करिता आपले जीवन संपवितो. आत्महत्या , आत्मघात करतो.

पण आपल्या हे लक्षात येत नाही हा आयुष्याचा शेवट आहे. पुढे कधीच आयुष्य जगता येणार नाही. मटार शेंगा निवडताना एखादी शेंग खराब लागली , अळी असली तर तेवढीच टाकून देतो आपण सगळ्या च मटारच्या शेंगा तशाच असतील असे समजून सगळ्या टाकत नाही ना??

तसे आयुष्यात  अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो ,  नवीन गोष्टी शिकू शकतो, आनंद दुसऱ्या गोष्टी तून मिळवू शकतो जी गोष्ट मिळाली नाही , मिळणार नाही कधीच तिच्या मागे लागून चुकीची पावले उचलण्यापक्षा जे आपल्याला करता येईल , आनंदी , उत्साही ठेवील त्या गोष्टी करण्यात वेळ घालवा आणि आपल्या आयुष्याचा थांबलेला प्रवाह वेगाने, मुक्तपणे , मोकळेपणाने , स्वच्छंदी   पणाने वाहू द्या.  तरच तो प्रवाह वाहता राहील , नदी , समुद्र यांना मिळेल. एकरूप होईल ..नाही तर तो प्रवाह थांबला तर डबक्यात साठलेल्या पाण्या सारखे होईल. ते कधी ना कधी संपेल. शेवाळ धरेल . खराब होईल त्यात पडलेल्या वस्तू , कचरा याने ते दूषित होईल.

असे दूषित होवून जगू नका. वाहत्या खळाळत्या पाण्याप्रमाणे जगा आणि आपल्या सोबत इतरांनाही उत्साहाने जगू द्या.. प्रियकराच्या चुकीची शिक्षा आपल्या आई वडिलांना का? त्यांना त्यांचे आनंद मिळवून द्या.

जसे की तो  / ती माझ्याशी वाईट वागला ,  माझे ऐकले नाही , माझी गरज , इच्छा , अपेक्षा समजून घेवू शकला नाही. कधी नोकरी मध्ये बॉस कायमच त्याचे खरे करतो आपल्याला आपले मत मांडण्याची ही मुभा नाही आणि आपण काही वेगळे करू , नावीन्य दाखवू तर त्याला त्याच्या पेक्षा वरचढ , वर्चस्व गाजवू हे  खरे तर आपल्या मनाचे खेळ असतात कदाचित आपल्या पेक्षा वरिष्ठ कोणी आहे आणि आपल्याला सतत त्याच्या हाता खाली काम करावे लागते ही मानसिकता , किंवा तुलना त्याला अस्वस्थ करत असते.

आणि मग बॉस सांगेल त्यात ही कामचुकारपणा , वेळेत काम पूर्ण करून न देणे. उगीच च काही तरी चुका करून ठेवायच्या म्हणजे बॉस चे किती लक्ष आहे आणि नसेल तर त्याला त्याच्या वरिष्ठ लोकांकडून बोलणी खावी लागतील , परत जर चुका  त्या बॉस ने नजरेस आणून दिल्या की मग परत त्याच कामात वेळ घालविणे त्यामुळं नवीन कामाकरीता हात घालण्यास वेळच मिळाला नाही हे च  चुकीचं धोरणं.

आपण ठरवलेली चुकीची धोरणं आपल्याला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीयेत. हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आपण काम टाळले तर आज ना उद्या ते काम शिवाय दुसरे ही काम आपल्याला करावेच लागणार आहे. म्हणजे आज  काम न करण्याच्या धोरणामुळे , किंवा बॉस ची अडवणूक करण्याच्या धोरणामुळे आपले नुकसान होत असते.

आजचे आणि उद्याचे डब्बल काम पूर्ण करावेच लग्नात , शिवाय ते वेळेत पूर्ण करण्याची बंधने बॉस ने घातली तर कामाचा स्ट्रेस वाढणार , कामातले concentration ही कमी होणार. आणि अजून जास्त चुका होत जाणार. त्यातून वेळेची मर्यादा ही सतत माने वर सुरी ठेवल्यासारखे .यात काही वेळेस खाणे पिणे ही वेळेत होत नाही त्यामुळे मनाप्रमाणे शरीराचे स्वास्थ्य ही बिघडते.

या आपल्या चुकीच्या धोरणामुळे आपली कोणती प्रगती होते का ?? तर नाही ना ? हे अडवणू कीचे धोरणं आपल्याला आपल्या विचार , नवीन गोष्टी शिकण्याकडे , करण्याकडे आडकाठी आणत असतात. आपल्याला आयुष्यात पुढे जावू देत नसतात. याउलट त्याने जर बॉस चे ऐकले , त्याच्या अनुभवानुसार काम करण्याचे ठरविले , कारण बॉस एखादी गोष्ट  याच पद्धतीने कर , दुसरी पद्धत वापरून करू नको असे जेव्हा सांगतो तेव्हा त्यामागे वेळेची बचत करणे असते, त्याने आधीच सगळा स्टडी केला असतो.

आणि त्याचे research , study , अनुभव त्याला विश्वास देत असतात आणि कोणत्या पद्धतीने काम करावे याचे तो मार्गदर्शन करत असतो पण आपण त्याला चुकीचे ठरवून , चुकीचे धोरण अवलंबून त्याचा आपला आणि ऑफिस चा अमूल्य वेळ घालवत च असतो आणि आपले  नुकसान करून घेत असतो. बॉस मार्गदर्शन करणे सोडतो . काम चोखंदळपणे झाले का बघतो नसेल तर स्वतः ते दुरुस्त करतो किंवा करवून घेतो यात त्याची प्रगती होत असते , अनुभव अजून प्रगल्भ होत असतो आपण मात्र आपली अधोगती करत असतो .

कॉलेज मध्ये  senior students  नवीन प्रवेश घेतलेल्या students करिता आपण सीनिअर आहोत , आपण सांगू ते या नवीन students नी केलेच पाहिजे , अशा केवळ senior असण्याच्या प्रौढी मिळविण्याकरिता , केवळ हवेच्या फुग्यने फुगलेल्या अशा चुकीच्या समजुती यातून ragging केले जाते. एखादा / एखादी स्वभावाने हळवी , गरीब असेल तर तिचा  मुद्दामच जास्त छळ करायचा असे धोरण अशी policy म्हणजेच या तरुण मुलांच्या भाषेत फंडा  हे सीनिअर वापरत असतात. पण त्यांच्या लक्षात येत नाही हे. चुकीचे फंडे, धोरणे ते वापरत आहेत. अनेक मुले यातून आत्महत्या करण्यापर्यंत पोहचली आहेत.

आपले हे चुकीचे धोरण आपल्याला ही आयुष्यभरासाठी दुःखात टाकत असते. शिक्षेस पात्र ठरवीत असते. आयुष्यातून उठू जर कॉलेज मधून काढून टाकले. शिक्षण च संपेल. मग आपली , घरच्यांची  आयुष्याची सुंदर स्वप्ने राखरांगोळी होतील.
म्हणून कायम सकारात्मक धोरण ठेवा जी आयुष्यात पुढे जाण्या करिता कायम प्रोत्साहित करतील.

एका छोट्याशा गावात दहा बारा घर होती. सर्वजण एकमेकांना ओळखत होते. दर रविवारी ते सर्वजण गावातील मंदिरात एकमेकांना भेटत. नाही भेटल तर त्यांना चैन पडत नसे. त्यात लहान मोठी सगळी बाया बापडे, मूले मूली, तर काही एकटी माणसे असे सर्वजण आनंदाने येत होती.

एक मध्यमवयीन एकटा  रहाणारा माणूस या मंदिरात नियमित येत होता. सर्व कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा. त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची.

मात्र मागील दोन रविवार पासून या  नियमितपणे हजर राहणाऱ्या  माणसाने, कोणतीही सूचना न देता, भाग घेणे बंद केले.

त्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर, गावातील वृद्ध सरपंचाने त्यांच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले.

एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले.

त्या माणसाने शेकोटी पेटवली होती. आणी थंडीत उब मिळण्यासाठी तो एकटाच शांतपणे बसला होता.

त्या माणसाने सरपंचाचे  स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही. नुसते अभिवादन फक्त. त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता. दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले होते.

काही मिनिटांनंतर सरपंच उठले, त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी, शेकोटीतून बाजूला काढली. आणी परत जागेवर येऊन बसले.

तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पहात होता. थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली. थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते. तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता.

अजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता. निघण्याची तयारी करण्यापूर्वी, सरपंचानी तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला.

ताबडतोब, तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला, व जळू लागला.

आता सरपंच ऊठले आणि दारात पोहोचले, तेव्हा तो माणूस म्हणाला;. तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी  धन्यवाद. मी लवकरच मंदिरात परत येईन.

तो असे का म्हणाला ??

तो मध्यमवयीन एकटा राहणारा माणूस त्याला जाणविले आपण समुहा पासून , आपल्या लोकांच्या पासून अलिप्त राहण्याचे धोरण आपल्याला त्रासदायक आहे. आपण एकटे राहिलो तर त्या एकट्या लाकडाच्या ओंडक्या सारखे होईल. आपले आयुष्य निर्जीव होईल. त्यापेक्षा समूहात राहिलो तर आपले जीवन चांगले विचार , सोबत आणि उत्साह , आनंद , नावीन्य यांनी तेजोमय होईल. उजळून निघेल.

कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य, बाकीच्या मित्रांकडून उर्जा, तेज घेतो. ग्रुपचे सर्व  सदस्य हे एकत्र ऊर्जेचा, ज्वालेचा,  भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे

हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आणी धीर देणारे आहे कि आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास  जबाबदार आहोत.

कधीकधी आपण काही  मेसेजेस, भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही. एकमेकांशी संपर्क असणे महत्वाचे आहे. आपण  येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणी आपल्यापैकी कोणीच  एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत.

आणि जर तो एकटा माणूस त्याच्या चुकीच्या धोरणावर ठाम राहिला असता तर अशा अनेक चांगल्या गोष्टींना मुकला असता. म्हणून सुरुवातीला जसे म्हणले की आपण कोणाचा सल्ला घेतो , कोणाच्या संगतीत राहतो त्याचा परिणाम आपल्या विचारसरणीवर होत असतो आणि जर चुकीची सल्ला देणारी , संगत चुकीची धोरणं  स्वीकारण्यास प्रोत्साहित करतात आणि आपल्याला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत.

काही वेळेस मात्र आपल्याला गृहीत धरले जाते, वारंवार  ignore केले जाते. , आपल्या अस्तित्वाची दखल ही घेतली जात नाही. काही ना काही कारणे देवून आपल्याला टाळले जाते. खूप बिझी आहोत असे दर्शविले जाते. पण सगळ्यांनाच माहिती असते की बिझी आहोत हे आपल्या करिता सांगणारे त्यांच्या गरजेनुसार , मतानुसार , आवडी , सवडी नुसार तुम्हाला विचारात घेत असतील , भेटत असतील तर मात्र तुम्ही तुमच्या अनुभवानुसार अलिप्त राहण्याचे धोरण पत्करले तरी एक वेळ तेव्हा त्रास होईल पण आयुष्यात इतर अनेक मानसिक त्रासापासून मुक्त व्हाल.

आयुष्य सुंदर आहे. योग्य धोरण अवलंबिले तर आयुष्यात अखंड विजयश्री ची , आनंदाची , आपल्या लोकांची साथ मिळून यशस्वी रित्या पुढे जात राहाल. सारासार विचार आणि कधी कधी कधी दूर दृष्टिकोन ठेवून आपली धोरणे पक्की करा. आणि स्वतः ला flexible ही ठेवा कारण अनेकदा परिस्थिती बदलली की आपल्याला ही तसे मोल्ड करावे लागते. बदलावे लागते.

आयुष्यात  निराशा  येत असते. नकारात्मकता येत असतें तडजोड करावी लागत असते. सकारात्मक रित्या पुढे जाणे गरजेचे असते.

Remember your mind is your greatest asset
, So be careful what you put into it.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!