Skip to content

आपण कित्येकदा जसा विचार करतो तसं काहीच कसं घडत नाही.

आपण कित्येकदा जसा विचार करतो तसं काहीच कसं घडत नाही.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


प्रत्येकाची आयुष्याबद्दलची काही स्वप्न असतात. प्रत्येकाला काही ना काही मिळवायचं असतं. त्याबद्दल काही ना काही विचार हे चालूच असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य त्या पद्धतीने काहीतरी झालं पाहिजे अशी आपली इच्छा असते. त्याच पद्धतीने आपले विचार असतात. जसे की चांगल्या ठिकाणी शिक्षण होण, चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, घर बांधावे असे काही ना काही विचार सर्वांचे चालूच असतात.

पण असं अनेकदा होतं की आपण ठरवतो एक, विचार एका गोष्टीचा करतो आणि होतं काहीतरी वेगळच. म्हणजेच आपण ज्या गोष्टीचा विचार केलेला असतो, इच्छा मनात धरलेल्या असतात त्या पूर्ण होत नाहीत. तसं काही घडत नाही आणि असं सारखं झालं की आपल्याला निराशा येते काम करण्याचा काहीतरी मिळवण्याचा उत्साह निघून जातो.
आता हे असं का होतं? आपण ज्या गोष्टीचा विचार करतो तसे अनेकदा का घडत नाही? तर याची अनेक कारण आहेत. त्यातलं महत्त्वाचं

कारण म्हणजे फक्त विचार करत राहण. फक्त इच्छा मनात ठेवणं. याला promisary note pracrastination अस म्हणतात. म्हणजे स्वतः फक्त वचन देणं की मी असं करीन, तस करीन, या पलीकडे आपण काही करत नाही. या गोष्टी तशा इच्छा बनुनच राहतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे खूप होत.

आपण त्यामुळे अनेक गोष्टी रेसोल्युशन म्हणून ठरवतो पण त्यापुढे त्याच्यावर काही कामच होत नाही आणि अस सतत होत राहिल तर यातून निराशा येण्याची शक्यता असते तसंच ठरवूनही त्या गोष्टी होत नाहीत हे जाणवल्यानंतर डिप्रेशन ही येत.

का निराशा येते? कारण जी मनात ठरवलेली इच्छा असते विचार असतो तो तिथेच राहतो त्यावर ना कोणत्या प्रकारचा प्लॅनिंग असतं ना कोणती ॲक्शन असते, काही नसतं. फक्त इच्छा. म्हणून जर एखाद्या गोष्टीचा विचार करून नाही तसं घडत नाही याचा अर्थ आपण त्यावर अजूनही नीट प्लॅनिंग केलेल नाही. त्यावेळी अपेक्षित कामगिरी केली नाही. कोणतीही गोष्ट जर मिळवायची असेल तर त्याचा फक्त विचार करून चालत नाही तर त्याला कृतीची जोड देखील असावी लागते. तसे कष्ट घ्यावे लागतात.

जर मी एखाद्या गोष्टीबद्दल स्वप्न पाहत आहे असं व्हावं असा माझा विचार आहे तर ते मिळवण्यासाठी मला प्रत्यक्षरीत्या काय केलं पाहिजे? त्यासाठी काय लागणार आहे? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नीट डिटेल प्लॅनिंग करून मग त्यावर कृती करायला लागते. त्यावेळी विचार करतो तसं होण्याची शक्यता वाढेल.

आता ही झाली एक गोष्ट; अनेकदा असं होतं की केलेल्या विचारांवर कृती, प्रयत्नही केले जातात तरीही म्हणावं तसं घडत नाही. सारखं अपयश येत. तर इथे आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत ती पद्धत एकदा तपासून पाहिली पाहिजे. आपण बरेच वेळा एखादी गोष्ट एकाच साचेबंद पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यापलीकडे आपण जात नाही. तसं न करता आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग ठेवायला लागत.

एक strategy जर फेल होत असेल तर तिथेच न थांबता दुसरी strategy वापरता आली पाहिजे. ती तयार करता आली पाहिजे. कारण अनिश्‍चितता या आयुष्याचा भाग आहे. कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे त्यासाठी सर्व बाजूने तयार राहणे गरजेचे आहे. तशी लवचिकता आपल्यात असली पाहिजे. कारण आपल्याला कधीही फक्त एकाच निर्णयावर सर्व मिळत नाही मध्ये अडथळे आले समस्या आल्या तर पद्धत बदलून निर्णय बदलून वेगळ्या पद्धतीने गोष्टीकडे पाहायला लागत.

कारण सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात असू शकत नाही. म्हणून असेही नाही की आपण हातावर हात ठेवून योग्य संधी कधी येईल याची वाट पाहत बसल पाहिजे. संधी आपोआप मिळत नाही तर तर ती तयार करावी लागते. म्हणून आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. पण त्याला आपल्या स्व जाणिवेची, कृतीची, कल्पनाशक्तीची, बुद्धिमत्ता, कौशल्याची जोड असली पाहिजे. नुसतं मी असा विचार करत आहे, तसा विचार करत आहे असं म्हणून गोष्टी मिळत नाहीत. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. Because action speaks louder than words!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!