आनंदी जीवनासाठी तुमची आनंदी जीवन जगण्याची इच्छा दुःखांच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
सोनाली जे.
ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना
ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना
हे गाणे बघितल्यावर काय वेडेपणा वाटेल . पण हे गाणे माहिती असलेले बरेच लोकं आहेत कदाचित कोणाला पूर्ण गाणे माहिती नसेल.
किती समर्पक आहे. हे संपूर्ण गाणे.
आयुष्याचे सार या गाण्यात सामावले आहे. आयुष्याचा आज , आताचा क्षण महत्वाचा तो आनंदाने जगून घ्या. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवा. उद्याची चिंता करून , आयुष्याची भीती , उद्या करिता future करिता पैसे साठवून तुम्ही तुमचा आनंद मारू नका. उद्याची चिंता करावी .त्या साठी तजवीज ही करावी . कारण पैसा नसेल , तब्येत साथ देत नसेल तर खरेच कोणी नसते. कोणी विचारत ही नाही. आणि जरी विचारले .काळजी घेतली तरी त्यांना limits असतात. त्या पुढे तेही काही करू शकत नाहीत.
आज corona सारख्या जीवघेण्या रोगाची अनेक उदाहरणे बघितली आपण. अगदी तरुण पिढी सुधा अचानक यात भरडून निघाली. आज आता समोर असलेली व्यक्ती क्षणात आयुष्यातून निघून गेली. त्या व्यक्ती ला अनेक गोष्टी करायच्या होत्या . खूप काही स्वप्ने होती. पैसे साठवून भारत भ्रमण करायचे होते. घर घ्यायचे होते. गाडी घ्यायची होती. बायको ला घेवून मस्त , शांत एकांतात चार दिवस कुठे तरी जायचे होते.
त्याला अध्यात्म शिकायचे होते. हिंदू धर्मग्रंथ गीता , कोणाला कुराण वाचायचे होते. कोणाला आई बाबांना भेटायला जायचे होते तर कोणाला आई बाबा नी आपल्या करिता खूप काही केले आता त्यांच्या या वयात त्यांच्या करिता काही तरी करायचे होते. ते राहून गेले.
उद्या करिता , उद्याच्या मोठ्या आनंद किंवा सुख मिळविण्याकरिता आपण आजचा छोट्या गोष्टीतला आनंद ही गमावतो . मला मस्त आइस्क्रीम खायचे आहे पण नको तेवढीच बचत होईल .. अरे खा .. इच्छा झाली ना .खा ना. उद्या करिता छोटे आनंद मारू नका. आज काय मित्र मैत्रिणी भेटणार आहेत पण कसे जावू contribution नाही. अरे तुमच्याकडे कोणी लगेच पैसे मागते आहे का ? बरं नुसते भेटून या. भेटण्यातला आनंद गमावू नका ना !!!
जन्माला आलो एक दिवस मरण हे आहेच. म्हणजे आनंद आणि दुःख … तारुण्य आहे तर म्हातारपण आहेच की. . मग म्हातारपणात काय करायचे , कसे होईल याचे विचार करून तारुण्यातले आनंद गमवू नका ना !!
साखर , गोड पदार्थ आवडतात पण म्हातारपणी शुगर होईल या भीतीने कधीच गोड खायचे नाही असे करू नका ना !! रोज गोड खणाऱ्याना ही कधीच शुगर चा त्रास न होणारे ही लोक आहेत च की !!
तसेच मुलांचे शिक्षण आहे , त्यांचे classes , fees भरायच्या असतात पुढे खर्च अजून वाढणार या भीतीने मुलांचे आजचे आनंद मारू नका. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये त्यांची इच्छा असते ..ती पूर्ण करा. अगदी काही नाही तर तुमचा अमूल्य वेळ मुलांना द्या. तो ही त्यांना खूप आनंद देवून जातो.
आनंदी जीवनासाठी तुमची आनंदी जीवन जगण्याची इच्छा दुःखांच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
आनंद movie मध्ये आनंद कॅन्सर आहे आणि आता आयुष्य फार काळ नाही हे माहिती असून ही किती आनंदी , उत्साही दाखविला. उद्या मरणार याची खात्री आहे म्हणून मरणाच्या भीतीने आज दुःख करत बसला असे नाही तर उलट जेवढे आयुष्य उरले ते भरभरून जगण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी , इच्छा पूर्ण करायच्या राहिल्या त्या त्या आनंदाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
आयुष्यात सगळ्याच गोष्टी सगळ्यांना मिळत नाहीत. म्हणून ज्या मिळाल्या आहेत त्याचा मात्र आनंदाने उपभोग
घेणे गरजेचे.
आठवते अगदी लहान असताना माझ्याच मुलीला पहिल्यांदा मी खूप मोठी Cadbury घेवून दिली. ती एवढ्या आनंदात होती की एवढी मोठी Cadbury मिळाली. पण तिने ती Cadbury तशीच तिच्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या कपाटात ठेवून दिली मला माहिती च नव्हते. एकदा तिचे कपाट आवरताना मोठी Cadbury बघून मी आधी चिडले तिच्यावर. गुपचुप का ठेवलीस. पैसे कुठले घेतलेस. तर ती बिचारी रडत रडत आई नाही ग मी नाही आणली ही ..तूच दिली होतीस तेव्हा. पण ती एवढी मोठी Cadbury उघडली की उद्या संपेल या भीतीने मी ती उघडलीच नाही.
माझ्या डोळ्यात च पाणी आले. मी ती उघडुन बघितली तर ती खराब झाली होती. तिची तरी काय चूक लहान वयात पहिल्यांदा मिळालेली गोष्ट. संपू नये. या भीतीने. ती आहे तशी राहू दे .म्हणून तिने ती खाल्ली नाही. पण तेव्हापासून मी तिला जेव्हा जमेल तेव्हा एवढ्या Cadbury दिल्या की संपेल ही भीती आणि दुःख होईल असे मनात ही आणु नको. आज खा .संपव उद्या वाटले तर परत देईन . आणि दिली ही .
याची खात्री पटल्यावर आता मात्र ती आनंदाने आवडती Cadbury खावून आणि वर मला ही देवून मलाही आनंदी ठेवते आणि स्वतः ही आनंदी राहते.
उद्या शुगर आली तर खरेच गोड खाण्यावर बंधने येतील .म्हणून आज गोड खण्यातला आनंद मुक्तपणे घ्या. मिळवा. उद्या शुगर आली तर इच्छा झाली गोड खाण्याची तर तीच गोष्ट इतरांच्या पासून लपून छपून खाताना रंगे हाथ पकडतीलच .. पण तुम्च्यावरची ती बंधने अजून वाढतील.
असेच आहे लहान मुला मुलींमध्ये खेळला तर त्यांच्या सारखे लहान होवून निरगस्तेने छोटे छोटे आनंद मिळवाल. आनंदी राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण आपण आपले बालपण विसरून उगीच मोठे झालो असं वागत असतो. कधी तरी तुमच्यातला तोच बालिशपणा जागा ठेवा.
कधी तरी अचानक surprise picknic plan करा आणि जाता जाता उचला तुमच्या मित्राला बघा तुमची ही आनंदी राहण्याची इच्छा तुमचा मित्र ही किती आनंदाने साथ देईल तेव्हा.
इतरांची तुलना सोडून द्या हो. त्याच्या कडे तिच्याकडे हे आहे , माझ्याकडे हे नाही यात अडकु नका. तुमच्याकडे जे आहे त्याचा शोध घ्या आणि त्यातून आनंदी राहण्याच्या इच्छा तुम्हाला अजून आनंद देतील. आयुष्यात अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या करायच्या राहिल्या आहेत त्यांचे विचार करा. त्या गोष्टी पहिल्यांदा करताना किंवा परत ही करताना किती आनंद मिळतो .किती गोष्टी नव्याने समजतात. नव्याने केल्या जातात.
माझी मैत्रीण चारचाकी शिकण्याची इच्छा होती. चाळीशी उलटली आता काय शिकणार असे सगळ्यांनी तिला वेड्यात काढले. पण ती जिद्दीने शिकली. आणि तिच्या बरोबर जाताना नेहमी तिचे पहिल्यांदा गाडी चालवताना कशी भीती होती , चढावर कशा गमती जमती झाल्या आणि आता कसा आत्मविश्वास वाढला हे सांगताना तिच्या जागी मीच आहे असे वाटते. आता तिची आनंदाने गाडी चालवण्याची इच्छा होती त्याने तिच्या भीतीवर मात केली आणि इतरांच्या ही.
जीवनसाथी गेला म्हणून आपले आणि मुलांचं आयुष्य पुढे कसे होईल या भीती पोटी किंवा जोडीदार गेला याचे दुःख करत संपूर्ण आयुष्य काढणार का ? नाही ना !! किंवा लोक काय म्हणतील . मी नोकरी केली तर , अगदी पुढे जावून मुलांच्या भवितव्या करिता परत लग्न करायचे का नाही यात लोक काय म्हणतील म्हणून दाबून राहून , त्यांच्या भीतीने आपल्या गरजा , आपल्याला समाजापासून मिळणारे संरक्षण , आर्थिक मदत . आयुष्याला आधार हे नाकारू नका. जोडीदारासोबत चे आनंदी , सुखी लक्षात राहणारे अनेक क्षण आहेत ते आठवा. ते आपल्या सोबत आहेत हे लक्षात. ठेवा. शरीर नश्ट होणारच आहे. पण मन ते मनात आहेतच ना. त्यांच्या चांगल्या आठवणी , गोष्टी सोबत आहेतच की.
आयुष्य सुंदर आहे. ते अजून सुंदर करण्याकरिता, आनंदी जीवनासाठी तुमची आनंदी जीवन जगण्याची इच्छा दुःखांच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


