Skip to content

आनंदी गाणी ऐकण्याचा आपल्या मानसिकतेवर खरंच परिणाम होतो का ?

आनंदी गाणी ऐकण्याचा आपल्या मानसिकतेवर खरंच परिणाम होतो का ?


सोनाली जे.


आनंदी गाणी ऐकण्याचा आपल्या मानसिकतेवर खरंच परिणाम होतो का ? तर याचे उत्तर आहे हो .. नक्कीच परिणाम होतो.

ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा ये झील सी नीली आँखें, कोई राज़ है इनमें गहरा तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया , तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया …

बघा हुं या गाण्यातून त्याचे प्रेम , तिच्या बद्दलचे किती गुण , भाव व्यक्त होतात. आणि त्याचा आणि तिचा भावपूर्ण चेहरा प्रेमात आकंठ बुडाला आहे तो आणि तिचे वर्णन करताना डोळे असतील , केस याला दिलेली आकर्षक उपमा यातून तिचा हसरा , लाजरा चेहरा डोळ्यासमोर येतो.
आपल्या मनातल्या भावना उत्कटतेने मांडताना शब्दांना संगीताची साथ दिली तर त्या खूप लवकर हृद्ययापर्यंत जावून पोहचतात. भिडतात. आणि त्यात हावभाव ,उत्साहही दिसतो. आपण नुसते ऐकीले तरी मन प्रफुल्लित , उत्साही होते.

संगीताचा वारसा हा हिंदुस्तान मधला . पण तसे तर पूर्वी देवादि देव ही संगीताचा लाभ घेत होतेच कि. राजदरबारात, अकबर बादशहाच्या दरबारात नवरत्नांपैकी एक रत्न संगीत पारंगत असलेला असेच की. अकबराच्या दरबारात तानसेन होता. अकबर बादशाह एकदा थोडे चिंताग्रस्त, राग अशा विचित्र मनस्थितीत असताना त्यांनी दरबारात तानसेन यांना गाणे म्हणण्यास सांगितले , आणि ते असेही म्हणाले की , तुझ्या संगीताने मनात शांती निर्माण होतें . त्या त्या प्रहरा नुसार राग गायला जात असे. तसे तानसेन यांनी दीपक राग आळवायला सुरू केला.

जसं जसे तल्लीन तेने आलाप वर आलाप घेतले जावू लागले तस तसे दरबारात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये चैतन्य , ऊर्जा निर्माण होवू लागली. आणि त्यामुळे राजदरबारात ले दिवे स्वयं प्रकाशित झाले. अकबर बादशहा सह संपूर्ण दरबार उजळून निघाला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद , हर्ष दिसू लागला. चिंता , राग कुठच्या कुठे पळून गेला.

तानसेन यांना तुमच्यात खरेच जादू आहे असे म्हणल्यवर ते म्हणाले यापेक्षा माझ्या गुरूंच्या संगीतात रोग बरे करण्याची शक्ती आहे. ” जो आवाज दिलं से निकलकर दिलों तक पहुंचती है , वह शरीर और मन की शांती पैदा करती है ! ”

संगीत यात किती महत्त्वपूर्ण अर्थ दडला आहे.

संगीत = सं + गी = मैत्री
गी + त = गाणे
सं + त = शांत

आपल्या आयुष्यात सात अंक याला खूप महत्त्व आहे. यात सात रंगांचे इंद्र धनुष्य, सप्तर्षी , सात स्वर , सात स्वरांचा त्यात ही प्रत्येक स्वराचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो.

आनंदी गाण्यात इतकी ताकद आहे की , ही गाणे ही कला म्हणून सादर केली जात नसावी तर आनंदी गाण्यांची निर्मिती ही भावनांचे , विचारांचे प्रकटीकरण करण्याकरिता, निराश असेल तर मन उत्साहित करण्याकरिता , सुरेल शब्दांच्या गुंफणी मधून प्रोत्साहन देण्याकरिता केलं जाते. ज्यातून मन हलके होते.

आनंदी गाणी आपल्याला तणावपूर्ण स्थितीतून बाहेर काढून , योग्य समायोजन करण्यास मदत करते. व्यक्तिगत विकास करण्याकरिता याचा उपयोग होतो.

खूप जास्त स्ट्रेस येतो , कंटाळा येतो , कोणाच्या मध्ये मिक्स होण्याची इच्छा होत नाही. एकटेच बसावे असे वाटते तेव्हा आपण आनंदी संगीत ऐकतो आणि मनावरचा ताण दूर होतो. कंटाळा जावून मन उत्साही , प्रफुल्लित होते. संगीतात विविध , वाद्ये , त्यांचा नाद यातून मन आणि वातावरण हे उत्साही , प्रफुल्लित, एकदम फ्रेश होते.

आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर तिथे शंख नाद , घंटा नाद , टाळ गजर , पखवाज वादन , मृदंग वादन ऐकत असतो .तसेच स्पष्ट आणि स्वच्छ उच्चारात मंत्रोच्चार ऐकत असतो. या मंत्रोच्चार आणि वाद्य नादमधून तिथले वातावरण प्रसन्न , मंत्रमुग्ध होत असते. आपण थोडा वेळ का होईना त्या वातावरणात आवर्जून बसतो. उत्साहित होतो. मन प्रफुल्लित आणि ताजे तवाने होते. निराशा असेल तर नव्या जोमाने कामाला लागते व्यक्ती.

इस्कॉन टेम्पल मध्ये जसे त्यांचे भजन , त्यात ताल असतो आणि त्यातून एक वातावरण निर्मिती होत असते त्यात सगळे अतिशय मोकळेपणाने समरस होतात. आपले सगळे दुःख , त्रास , हेवे दावे , विसरून त्या आनंदी भजनामध्ये , कृष्ण भक्ती मध्ये तल्लीन होतात. त्यातून ते अतिशय उत्स्फूर्तपणे आणि स्वच्छंदी पणे त्या नृत्यात ठेका धरून आत्म तल्लीन होतात. मुग्ध होतात. सगळे विसरून जातात. आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर , मनामध्ये अतिशय शांतता तर असतेच पण समाधान ही असते.

संगीतात ले काही राग मेघमल्हार , ज्यातून पावूस पडण्याची शक्ती म्हणजे लोक त्या प्रफुल्लित वातावरणात आनंदी आनंद मिळवीत असतात.

राग ललित , केदार हे मानसिक रोग बरे होण्याकरिता वापरले जातात. गायले , ऐकले जातात. राग आसावरी हा आत्मविश्वास वाढविण्यासाठी , तर राग बागेश्री हा निद्रानाश दूर करण्यासाठी वापरला जातो. राग दरबारी रात्री ऐकला तर मानसिक तणाव कमी होतो. तर राग भिमपलास सकाळी ऐकला तर सकाळच्या वेळेस असलेला मानसिक तणाव कमी होतो.

Neuro linguistic programme जो आपण म्हणतो तो आणि music therapy यातून मुलांच्या विकासाकरिता प्रयत्न केले जातात. त्यातून मुलांची एकाग्रता , स्मरणशक्ती , तल्लखता , ताल आणि लय बद्धता वाढते. मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक वाढीकरिता , विकासाकरिता याचा चांगला उपयोग होतो.

आनंदी संगीत हे आपल्यात चेतना निर्माण करत असते. गर्भावस्थेत माता जे आनंदी संगीत ऐकते त्याचा परिणाम ही बाळावर होत असतो. त्याची स्पंदने वाढत असतात. कार्यक्षमता वाढत असते. म्हणजे बाळाची वाढ आणि विकास ही आणि हालचाली ही वाढतात. जन्मल्यावर म्हणून बाळ आईचा आवाज ऐकला तरी शांत होत असते.

एखाद्या व्यक्तीच्या आवडीचे संगीत. किंवा आनंदी गाणी हे एक प्रकारे उत्प्रेरक म्हणून काम करत असते. ज्याचा उपयोग शारीरिक आणि मानसिक रोग निवारणासाठी केला जातो.

आनंदी गाणे ऐकले की आपण निराशा , उदासीनता यातून बाहेर पडतो. जसे बंद खोलीत कोंडले गेलो तिथून एकदम मोकळ्या हवेत तसे. उत्साह निर्माण होतो. प्रेरणा निर्माण होते. मानसिक स्वास्थ जर चांगले झाले तर शरीर स्वास्थ्य ही टिकून राहते. त्यामुळे रोगनिवारण करण्याकरिता आवडते आणि आनंदी संगीत अतिशय उपुक्त ठरते.

आनंदी संगीत म्हणले तर अगदी देव विचारात घेतले तर शंकराच्या हातात डमरू , सरस्वती देवी वीणा तर भगवान कृष्ण यांच्या हातात सुरेल बासरी .जी वाद्ये वेळप्रसंगी मनाला उभारी देत.

सगळ्यात महत्वाचे आपले आवडते आनंदी संगीत ऐकले की आपण सगळे विसरून जातो. जसे मनाविरुद्ध घटना असेल , वाईट अनुभव असतील , वाद असतील ते सगळे बाजूला राहते आणि आनंदी गाणे ऐकताना नव्याने उमेद निर्माण होते.
आयुष्य सुंदर आहे. आनंदी गाणी ऐकून आपली मानसिकता अजून निरोगी आणि शरिरासारखी सुदृढ , निकोप ठेवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!