आज हातात ज्या गोष्टी आहेत, उद्या त्या निसटून जाऊ शकतात, हे आपण स्वीकारायला हवं.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
रवींद्र ३५ वर्षांचा होता. लग्न देखील झालं होत. पण कामाच्या नावाने आनंद होता. तो काहीही काम करत नसे. रवींद्रच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय होता. चांगलं उत्पन्न मिळत होत. त्यामुळे पैशाची कधी गैरसोय झाली नाही. घर दार चांगलं चालत होता. पिढीजात व्यवसाय होता त्यामुळे त्यांचं सर्वांचं चांगलं चांगलेल होत. सर्व अगदी त्यात मुरलेले होते. रवींद्र याचं वातावरणात वाढला. जे काय हवं ते लगेच मिळायच. कधी कशाची कमतरता भासली नाही. लहानपणी पण नंतर तुला आपला व्यवसायच सांभाळायचा आहे अस बिंबवलं गेलं. म्हणून त्याने शिक्षणकडे पण फार लक्ष दिलं नाही. जेमतेम १२वी होईपर्यंत तो शिकला.
आपल्याला काय अस आणि तास दुकानातच बसायचं आहे. आपल्याकडे आयुष्यभर बसून खाऊ इतकं आहे. इतकं आपल्याला मिळत आहे. कश्याला चिंता करा? असा विचार तो करत होता. लग्न करताना राजेंद्र दुकानात वाग्रे जात होता. त्यामुळे मुलीच्या माणसांनी विचार केला शिक्षण कमी असल तरी घरचा व्यवसाय आहे. पैश्याची भविष्याची चिंता नाही. म्हणून त्यांनी लग्न लावून दिलं.
थोडे दिवस तो काम पाहत होता. पण लग्नाला काही दिवस झाल्यानंतर त्याने दुकानात जायचं, वडिलांना कामात मदत करायचं बंदच करून टाकल. त्यांना पण तो म्हणत असे, बाबा का इतके राबताय? आपल्याकडे खूप आहे. आराम करा. ते त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत. पण त्याला काही बोलत पण नसत. आपण कष्ट करतो तस त्याला त्याच्या मुलांना करायला लागू नये अस त्यांना वाटायचं.
नंतर त्यांना मुल देखील झाली. रवींद्रच्या बायकोला सुधाला आधीपासूनच त्याच हे वागणं, नुसत बसून खाणं पटत नव्हत. आता तर मुल म्हणजे जबाबदारी पण आली. म्हणून ती त्याला सारखी सांगत असे.
“अहो निदान मुलांसाठी तरी काम करा. तुमचे बाबा या वयात इतकं कष्ट करत असताना आपण त्यांच्या जीवावर बसून खाणं योग्य वाटत का? तुम्हाला या व्यवसायात पडायचं नसेल तर वेगळं काहीतरी काम करा. पण अस आयत सर्व उपभोगण योग्य नाही.” रवींद्र म्हणाला, काय बोलतेस तू. आई बाबा आपल्याला परके आहेत का? आणि इतकं सर्व कमावलं आहे ते कोणासाठी आपल्यासाठीच ना!
आणि लक्ष्मी सदैव घरात वास करत असताना आपल्याला काय गरज आहे झिजयाची. तुला पाहिजे ते वेळेवर मिळत ना! मग कश्याला नसती चिंता तुला? आपल्याकडे इतकं आहे की आपली मुल पण आरामात राहतील त्यात. तू त्याची बिलकुल काळजी करू नको. आणि मलापण त्रास देऊ नको. हे काम वैगरे मला जमणार नाही.”
त्याच्या या बोलण्याने सुधा हताश व्हायची. तिच्या मनात यायचं आपल्याकडे जे काही आहे ते कायम कधीच नसत. त्याचा काही भरवसा नसतो. म्हणून तिला वाटत असे की आपण आपल्या पायावर उभ राहील पाहिजे. तरच संकटकाळी तग धरू शकतो. हे यांना कोण समजावणार? तिला काही बोलताच येत नसे. पण काळजी मात्र होती.
सुधाची हीच काळजी नेमकी खरी ठरली. व्यवसाय कितीही चांगला, खूप काळापासून चालत असला तरी त्यात चढ उतार येत असतात. बाहेरून सर्व अलेबल वाटत असेल तरी जो त्यात आहे त्यालाच त्यातले कष्ट माहीत असतात. बरेच ठिकाणी पैसे गुंतवलेले असतात. व्यवसायाच्या फायद्यावर इतर गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्याच्या एकूणच उत्पन्नामध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्याचा बाकीच्या गोष्टीवर परिणाम होतो. नेमके तेच झालं. व्यवसायात बरेच दिवस झाले घट होत होती.
बाजारात नवनवीन व्यवसाय येत होते. लोकांची आवड बदलत होती. कापडाचे नवीन ब्रँड बाजारात येत होते. त्यामुळे रविंद्रच्या घराचा व्यवसाय मंदीत चालला होता. वडिलांनी फक्त हे घरी बोलून दाखवलं नाही इतकचं. पण त्यांना पण हे सर्व सांभाळता येत नव्हत. ते जुन्या पिढीतले होते. नवीन जगाशी त्यांना स्पर्धा करता येत नव्हती. शेवटी व्ह्ययचं ते झालं. पिढीजात व्यवसाय असून पण तो मोडकळीला आला. ज्यांनी ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांना परत तर द्यावे लागणार होते. त्यामुळे जे हातात होत ते सर्व देऊन टाकावं लागलं. देवाच्या कृपेने फक्त राहत घर फक्त राहील. पण आपला आपला म्हणून जो कमवलेला व्यवसाय होता त्यातल काही राहील नाही.
हे सर्व टाळता आला असत. कधी? जर रवींद्र ने यातल नीट शिक्षण घेतल असत. आपल्या व्यवसायाला नवीन जगाप्रमाणे आकार दिला असता तर. तर कदाचित त्यांना ही स्पर्धा झेपली असती. रवींद्र मात्र आहे ते कधी जाणारच नाही अस समजून बसला, आपल्या हातात आता जे आहे ते कधीतरी निसटून जाऊ शकत त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे हे सत्य च त्याने स्वीकारलं नाही आणि त्याची मोठी शिक्षा त्यांना भोगायला लागली. कारण दुसर काही करण्यासाठी पण जे शिक्षण लागत तेही त्याने नीट घेतल नव्हत आणि व्यवसायाबद्दल पण नीट जाणून घेतल नव्हत.या बेफिकिरी चा परिणाम आता सर्वच नव्याने सुरू करायला लागणार होता. तेही त्याने नीट कष्ट केले तर!
आपण अनेकदा एका परिस्थितीत असलो तर आपल्याला वाटत आपण नेहमीच अश्या गोष्टींमध्ये राहणार. आता सुबत्ता आहे म्हणजे नेहमी राहणार आहे.आपल्याला काही काळजी नको करायला. पण अस नसत. चांगली असुदे किंवा वाईट कोणतीही परिस्थितीत कधी तशीच टिकत नाही. अस समजून घेणं हीच एक वैचारिक चूक आहे. म्हणून आपण हे सत्य स्वीकारलं पाहिजे की या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. कायम टिकणाऱ्या नाहीत. म्हणून सगळ्यासाठी आपण तयार राहील पाहिजे. कारण, रावाचा रंक होतो आणि रंकाचा पण राव होतो….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
