आजपासून मनाला भटकू देऊ नका, सर्वप्रथम स्वतःला महत्व द्या.
मयुरी महेंद्र महाजन
पुणे
“मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर ,
किती हाकलं हाकलं फिरी येस पिकावर”
बहिणाबाईंनी आपल्या कवितेच्या ओळीमध्ये मनाच्या व्याख्येचे अंतरंग मांडलेले आहेत मन ही खूप चंचल गोष्ट आहे स्वतःच्या मनावरती स्वतःचे अधिराज्य गाजवणे म्हणजे एक मोठी साधना आहे आणि साधनेच्या अभ्यासाने ते शक्य सुद्धा आहे, चंचल मनाला चंचलतेचे वरदान जन्मापासूनच मिळालेले असते..
बसलेले असतानाच आपण दुनियेची सैर करून येतो, ते निव्वळ मनाच्या चंचलतेमुळे, मन जितके अथांग तितकेचं विशाल सुद्धा आहे त्यामध्ये किती आणि काय सामावून घेण्याची ताकद आहे आपण याचा अंदाजसुद्धा लावू शकत नाही मनाची शक्ती अफाट अगणित आहे फक्त त्या शक्तीला ओळखण्यासाठी मनाला कुठेही भटकू न देता सर्वात आगोदर स्वतःला महत्त्व देणे महत्त्वाचे आहे …
बैलाला खुट्यावर बांधण्याईतके मनाला स्थिर ठेवणे सोपे नाही त्यासाठी ध्यान धारणा करण्या बरोबर साधना करणे आणि ती साधना रोज न चुकता करणे गरजेचे आहे तरच त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होईल…”मन तो भटँकता पंछी है जहा जाये भटक जाता है…” मनाच्या चंचलतेवर कितीतरी विनोद केले जातात म्हणजे मन जितके विशाल तितकेच अथांग सुद्धा आहे त्याची अथांगता जितके आपण त्याच्या आत शिरणार तितकीचं खोल आहे स्थिर असणारी गोष्ट कायम मजबूत असते परिस्थिती कशीही असली तरी कुठेही डगमगत नाही…. म्हणून स्थिर असणे महत्वाचे आहे ….
जेव्हा आपण नदीकाठावर एखाद्या रम्य आणि शांत स्थळी एकटेचं बसलेलो असतो तेव्हा नकळत त्या स्थिर असलेल्या पाण्याकडे आपले लक्ष जाते आणि त्या शांत असलेल्या पाण्याकडे बघितले की मनाला सुद्धा एक वेगळीचं शांती मिळते उसळणार्या लाटांची भिती नाही प्रवाहाबरोबर वाहत जाण्याची चिंता नाही…. बस निवांत आपली शांतता तसेच मन शांत असते… कुठे न भटकता जेव्हा आपल्याच मस्तीत गर्क असते तेव्हा कुणाविषयी द्वेष नाही मत्सर नाही ,कोण काय बोलले कोण काय म्हणते… या कुठल्याही गोष्टीचा प्रभाव नाही फक्त आपल्या मनावरती आपले अधिराज्य मानसिक स्तरावर अतिउच्च समाधान आणि प्ररमोच्य समाधानाचा आनंदच वेगळा….
जर आपल्या मनाला भटकू द्यायचे नसेल तर आपण ध्यान जरूर केले पाहिजे किंबहुना ध्यान त्याच्यासाठीच केले जाते बरेच जण असे म्हणतात की आम्हाला ध्यान करण्याची काही गरज नाही आम्ही आमचे मन स्थिर ठेवतो जर तुम्ही सुद्धा असा विचार करत असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल भारतीय म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ऋषी मुनींपासून ते आत्तापर्यंत अनेक संत महात्मे पर्यंत ध्यान करण्याला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे …
आणि ध्यान करणारी व्यक्ती संत किंवा बाबा होते हा गैरसमज सुद्धा दूर व्हायला हवा कारण मनुष्य प्राणी आपल्या आयुष्यात जसजसा प्रगत होत गेलेला आहे तसतसे त्याचे आयुष्य प्रत्येक वळणावर बदलत गेले आहे ….पूर्वीच्या जीवनशैलीमध्ये आणि आजच्या जीवनशैलीमध्ये भरपूर फरक आहे त्यासाठी वाढलेली जबाबदारी नातेसंबंध परमार्थ प्रपंच आणि स्वतःच्या इच्छा आकांक्षांचे उंचावलेले चेहरे मोहरे या सर्वांमध्ये बदल झालेत….
सर्वप्रथम आपण स्वतःला महत्त्व द्यायला हवे कारण शरीर जरी आपले असले तरी मन त्या शरीराला स्वीकारण्यात कसरत करते म्हणून आधी स्वतःवरती प्रेम करावे शरीर आणि मनाची नाळ जुळली की त्या मनाने कितीही भटकंती केली तरी ती स्थिर अवस्थेत येते चंचल असणार्या मनाला भटकू द्यायचे की स्थिर करून प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा आहे आपणच आपले महत्त्व देऊन ओळखू शकतो.
त्यासाठी आपण आपल्या मनाला चा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवावा मन कितीही चांगले असले तरी भटकंतीसाठी तेव्हाच होते जेव्हा त्या मनाला स्वतःला आपण महत्त्व दिलेले नसते कुणी महत्व देवो न दोवो आपण आपल्या स्वतःला महत्त्व दिलेच पाहिजे मनाचे डोही आनंद तरंग मनाच्या डोहात आनंदाचे तरंग असतात तो आनंद घ्यायचा सोडून जर आपण भटकत राहिलो तर त्याच्या आनंदाच्या डोहात आपल्या आनंदाची अनुभूती होणार कशी सतत विचारांची निरंतर चालणारी प्रक्रिया अन्य कुठे भरकटू नये.
यासाठी आपणच आपली मदत करू शकतो त्यासाठी आपणच आपल्या कितीतरी समस्यांचे निराकरण कुठल्याही धडपड करण्याविना शांततेच्या मार्गाने आरामात करू शकतो फक्त आवश्यकता आहे आपल्या निरंतर प्रयत्नांची आणि आपल्या प्रयत्ना वरती विश्वास ठेवण्याची अशक्य असे काहीच नसते जोपर्यंत आपण ते शक्य करत नाही प्रयत्न प्रामाणिक असतील आणि निष्ठा प्रखर असेल तर प्रत्येक ध्येय साध्य करता येते….!!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खुप छान पोस्ट