आकर्षणाच्या नात्यापेक्षा मनाने जोडलेलं नात कायमच घट्ट टिकून राहते…
सौ. मिनल वरपे
नात कोणतंही असो जेव्हा त्याचा स्वीकार मनापासून असेल तेव्हा कितीही अडचणी आल्या.. संकट उभे राहिले.. तरीही त्या नात्यातील वीण कधीच न तुटता अधिक घट्ट होत जाते…
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली… तिच्याशी चार शब्द बोललो, दोन चार भेटी गाठी झाल्या, ती व्यक्ती नेहमीच माझ्याशी चांगलं बोलते म्हणून, ती व्यक्ती दिसायला छान आहे, त्या व्यक्तीचं बोलणं ऐकत रहावस वाटते असे हजारो कारण आपल्याकडे असतात कोणतंही नवीन नात मिळवताना.. मग ते नात कोणतंही असो.
पण ज्यावेळी खरचं आपल्याला त्या व्यक्तीची गरज असते, ती व्यक्ती सोबत हवी असते, अडचणीच्या वेळी त्या व्यक्तीची साथ हवी अस आपल्याला वाटत असते आणि ऐनवेळी ती व्यक्ती आपल्यासोबत नसेल तर अशावेळी किती सहज आपण तर नात तोडून मोकळं होतो.. त्या व्यक्तीला आपल्यापासून दूर करतो..
कारण जे नात मनापासून असते त्यामधे समजून घेण्याची क्षमता, इच्छा आपोआपच तयार होते. आपल्या व्यक्तीला काय आवडते, काय आवडतं नाही याची आपण काळजी घेतो, एकमेकांबद्दल तक्रारी कमी असतात आणि काही जाणवलं तरी एकमेकांशी बोलून ते मोकळे होतात.
पण जिथे वरवर दिसण्यावरून, बोलण्यावरून, समोरच्या व्यक्तीला तसेच इतरांना दाखवण्यासाठी म्हणा अस जे नात असते त्यामधे काही काळासाठी खूप सलगी निर्माण तर होते पण ती सलगी कायम टिकून राहील याची शंकाच असते..
काही मैत्री बघा जिथे एकमेकांबद्दल सतत टीका केली जाते आणि अशी मैत्री आयुष्यभरासाठी टिकत नाही.. लग्नाचं म्हंटल तर जे लग्न म्हणजेच जिथे जोडीदाराचा स्वीकार मनापासून नसतो तिथे ते नात नावापुरती असते काहीवेळेस वेगळे सुद्धा राहतात.. काहींना मोठ्यांचा धाक तर काहींना समाजाची भीती म्हणून ते नात पुढे ढकलत दिवस काढले जातात..
प्रेमात तर अनेकजण पडतात पण तेच प्रेम लग्नाच्या नात्यात उतरते जिथे एकमेकांना समजून घेतलं जाते नाहीतर उगाच वरवर दिसण्या बोलण्यावरून असेल एक आकर्षण म्हणून असेल तर त्याच्यात सहज दोघांच्याही वाटा बदलतात..
जे नात आतून मनापासून नसते त्या नात्यात एक शब्द सुद्धा ते नात तुटण्यासाठी पुरेसा असतो तिथे वेगळ्या कारणाची गरज पडत नाही.. एकमेकांबद्दल सतत तक्रारी असतात.. काहीही झालं तरी सहज गैरसमज करून एकमेकांबद्दल मतभेद निर्माण होतात.. समजून घेण्याची गरज वाटत नाही… लहानसहान गोष्टींवरून एकमेकांबद्दल इतरांना सांगणे… म्हणून अस नात असण्यापेक्षा नसलेलं उत्तम..
कारण कोणतही नात एक व्यक्ती जरी मनापासून स्वीकारत असेल तरी नात्याचा हा धागा जोडण्यासाठी दोन्हीकडून सारखाच प्रतिसाद मिळणे गरजेचे असते.. म्हणतात ना जस एका हाताने टाळी वाजत नाही.. वाद निर्माण व्हायला दोघं कारणीभूत असतात तसचं नात टिकवण्यासाठी सुद्धा दोघांनी एकमेकांना मनापासून स्वीकारणे, समजून घेणं, काळजी करणं गरजेचं असत तेव्हाच नात्यातल्या तक्रारी कमी होऊन नात घट्ट होते आणि हे तेव्हाच घडते जेव्हा आपण मनापासून ते नात स्वीकारलेले असत.
म्हणून आकर्षणाच्या नात्यापेक्षा मनाने जोडलेलं नात कायमच घट्ट टिकून राहते…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


