Skip to content

अशी माणसं जेव्हा निघून जातात, तेव्हा आपल्याला वेदना का होतात ??

अशी माणसं जेव्हा निघून जातात, तेव्हा वेदना का होतात ??


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माणूस लहानपणापासूनच कोणाशी ना कोणाशी जोडलेला असतो. आधी आई-बाबा नंतर मित्र-मैत्रिणी व त्यानंतर येणारा सामाजिक परिवार. त्यामुळे नातेसंबंध हे आयुष्याचा एक अविभाज्य घटक असतातच आणि अशामध्ये जर आपल्या जवळची व्यक्ती जग सोडून निघून गेली आपल्यातून गेली तर वाईट वाटणं, अस्वस्थ वाटणं साहजिक आहे. परंतु यापलीकडे एक नात आहे, जे खूप घट्ट जोडलेल आहे ते आहे कलाविश्वाशी असणारं नातं.

कोरोना काळात आपण पाहिलं असेल की अनेक चांगले कलाकार हे जग सोडून निघून गेले. तेव्हा त्यांच्या जवळच्या नात्यात लोकाव्यतिरिक्तही सर्वात जास्त हळहळणारे अस्वस्थ होणारे, अगदी रडणारेसुद्धा अापण होतो. दोन वर्षांपूर्वी जेव्हा सुशांत सिंग राजपूत च्या मरणाची बातमी ऐकली तेव्हा अगदी मी ही खूप रडले होते.इतक्या कमी वयात आत्महत्या का केली असावी असा विचार करून मन दुःखी ही झालं. काही दिवसांपूर्वी साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार पुनीत राजकुमार हे जग सोडून निघून गेला. तेव्हा ही अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होत. त्यांच्या अंत्ययात्रेला खूप गर्दी झाली होती.

अमिताभ बच्चन यांना कुली पिक्चर जमीन गंभीर दुखापत झाली होती तेव्हा अनेकांनी प्रार्थना केली होती अमिताभ त्यातून बरे झाले व त्या दिवसाला ते त्यांचा दुसरा जन्म म्हणतात.

दोन दिवसांपूर्वी रमेश देव यांचे निधन झाले. सिनेसृष्टीचा खूप मोठा काळ गाजवला होता. त्याचप्रमाणे आज स्वरसम्राज्ञी लतादिदी आपल्यातून निघून गेल्या. त्यांना ओळखत नाही अशी खूप कमी लोक असतील. त्यांचा आवाज रेडिओ पासून सुरू होऊन आता युट्युब पर्यंत पोहोचला आहे. असा काही काळ त्यांनी आपल्या आवाजाने समृद्ध केला. अशी ही सर्व मंडळी जीव आपल्यातून निघून जातात तेव्हा आपलं मन मात्र खूप अस्वस्थ होत, हळवं होत. असं का?

याचं कारण म्हणजे त्यांचे कार्य. जेव्हा टीव्ही वगैरे नव्हते फक्त थिएटरमध्ये सिनेमा पाहायला मिळायचे ते पण सर्वांना शक्य होत असेल असं नाही. अशा काळात रेडिओवरून इतका सुंदर आवाज लोकांना ऐकायला मिळत असे. त्यांची अनेक गाणी जगण्याला प्रेरणा देत होती आयुष्य भरभरून जगायला लावणारी होती. कामाव्यतिरिक्त या लोकांचे आयुष्य आपल्याला जगण्याची प्रेरणा देत होते.

या कलाकारांनी केलेला अभिनय, त्यांचे हावभाव इतका सहज, सुंदर, नैसर्गिक असतो की ही सर्व लोक आपल्यातील आहेत असं आपल्याला वाटून जात. त्यांच्या मूव्ही च्या माध्यमातून आपण त्यांच्याशी इतके attach होतो की आपल्याला परकेपणा निघून जातो. अनेक जणांचा अख्खं आयुष्य लतादीदींचं गाणं एेकण्यात, ऐकवण्यात गेलेल असेल. ज्या व्यक्तीला आपण इतकी वर्ष बघतो पाहतो कधी कधी भेटतो देखील त्यांच्या अशा जाण्याने आपल्याला अस्वस्थता आली तर त्यात काही वावगे ठरणार नाही.

“काटो से खीच के ये आंचल
तोड के बंधन बांधे पायल
कोई रोको दिलं की उडान को
दिल वो चला
आज फिर जीने की तमन्ना है….”

आपल्या मार्गात येणारे अडथळे, बंधन बाजूला सारून आपल्या मनाला उभारी देणे, परत नव्याने जगणे हेच या जगण्यातून प्रतीत होते.
इतक्या सुंदर आणि यासारख्या अनेक गाण्यांच्या माध्यमातून लतादीदींची नाळ आपल्याशी जोडली गेली आहे. आपण अनेक पुस्तकं वाचतो, अनेक लोकांना आदर्श मानतो. का ? तर ती लोक जगायचं कास हे शिकवतात. त्याचप्रमाणे हे कलाकार त्यांच्या कलेतून, त्यांच्या माणूसपणातून आपल्याला प्रेरणा देत असतात.  आपल्यातले होऊन जातात. सुशांत अशाच एका सिनेमांमधील किती सुंदर वाक्य आहे पहा,

“जनम कब लेना है और मरना कब है हम डिसाईड नही कर सकते, तर जिना कैसा है वो हम डिसाईड कर सकते है”

अशी ही माणसं या वाक्यांना त्यांच्या अभिनयातून जिवंत करतात. आपल्याला उभारी देतात. फक्त सिनेमात नाही तर त्याच्या पलीकडेही त्यांचा त्यांच्या चाहत्यांशी असलेलं वागणं, त्याच्याविषयी असलेलं प्रेम त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर वाढवतात. हेच कारण आहे की आपल्यातील ही मंडळी गेल्यावर आपल्याला वाईट वाटतं. म्हणून हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की,
“जिवंतपणी सर्वच नाव घेतात खर कर्तृत्व यात आहे की गेल्यावरील लोकांनी लक्षात ठेवल पाहिजे.”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “अशी माणसं जेव्हा निघून जातात, तेव्हा आपल्याला वेदना का होतात ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!