अमीर खान, घटस्फोट आणि आपली मानसिकता !!!
टीम आपलं मानसशास्त्र
आताच आलेला चर्चेचा विषय.. सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांच्या पंधरा वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला..
ही बातमी ऐकताच सर्वांना एक वेगळा विषय मिळाला.. कोणी त्याबद्दल हे काय ही मोठी लोक यांचं काय सेकंदाला कपडे बदलावे तसे यांच्या आयुष्यात हे माणस बदलतात..तर कोणी म्हणते यांना कसला आलाय संसार .. लोकप्रियता मिळावी म्हणून हे लोक स्वतःचे खाजगी आयुष्य सुद्धा चव्हाट्यावर आणतात..
नुकताच एक विनोद सुद्धा वाचला की मी तर मोबाईचा सीम कार्ड सुद्धा 10वर्ष झालेत अजून नाही बदलला हा बायको कसा बदलतो.. खर तर हा विनोदाचा भाग बाजूला ठेवून प्रत्यक्ष विचार करून पाहिलं तर खूप गहण विषय आहे.
बघाना जी व्यक्ती त्याच्या चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका इतक्या सहजतेने साकारते .. की त्या भूमिकेतून जो संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो तो काहीच वेळ न लागता प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. त्याने आजपर्यंत जे जे चित्रपट केले एक व्यक्ती म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून, कोणाचा भाऊ, वडील तर कोणाचा मित्र, कोणाचा मुलगा तर कोणाचा पती म्हणून..पण प्रत्येक भूमिकेतून चांगली शिकवण देत कुठेतरी आपल्या विचारांमध्ये ज्याने बदल केला.
तसेच सोशल मीडिया मार्फत तर कधी सत्यमेव जयते या समाजापुढे उभ्या केलेल्या उत्तम कार्यक्रमातून त्याने देशाच्या समस्या समोर मांडल्या.. कदाचित त्याच्या चित्रपटातून या वेगवेगळ्या कार्यक्रमातून कित्येक विचारांमध्ये सुधारणा झाली असेल अनेक संसार सुद्धा मार्गी लागले असतील त्यांच्यातील वाद कमी झाले असतील…
पण जो असे विचार मांडतो .. समाजाला.. लोकांना चांगली शिकवण देण्याचा प्रयत्न करतो .. तो व्यक्ती त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात ते वागतो का..??? हा प्रश्नच आहे.
ज्याला सगळ्या भूमिका निभावताना स्वतःलाच बरच काही शिकायला मिळत असेल कस जगावं कसा संसार करावा.. कसे मित्र कमवायचे तर कशी नाती जपायचे.. तीच व्यक्ती या प्रत्येक बाबतीत जस सांगते तसं वागू का नाही शकत?? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहेच ..
जीच्यासोबत त्याने इतके वर्ष संसार केला आज त्याच बायकोसोबत घटस्फोट घेण्याचा विचार.. म्हणजे जो व्यक्ती इतरांना चांगले संदेश देऊ शकतो तो स्वतःच्या आयुष्यात मात्र कसा वागत असेल हे त्यालाच माहीत…
आपण अनेक चित्रपट पाहतो, मालिका बघायला आपल्याला आवडतात, कोणी चांगल काम केलं तर आपल्याला त्याच अनुकरण करायला आवडते, त्याचे विचार आवडतात, कोणी वाईट नकारार्थी भूमिका निभावत असेल तर आपल्याला त्याचा राग येतो..
आपण वेगवेगळे पुस्तक वाचतो, वेगवेगळ्या लेखकांचे साहित्य आपल्याला आवडतात, संसारावर आपण लेख वाचतो पण खर तर या सगळ्या वाचनातून आपल्याला शिकायला तर नक्कीच मिळते.. पण हे ज्याचं त्याला कळायला हवं की आपण संसार कसा करावा.. आपला संसार टिकण्यासाठी आपण काय काय बदल केले पाहिजेत.. आपलं नात भक्कम होण्यासाठी आपण किती आणि कोणते प्रयत्न केले पाहिजेत..
कोणाचं बघून, ऐकून आपण आपला संसार नाही घडवू शकत.. तर तो आपला आपल्याच पद्धतीने करावा लागतो.. कारण जी व्यक्ती इतकी उत्तम नवऱ्याची भूमिका निभावू शकते ती व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात मात्र काय विचार करते आणि काय वागते हे ज्याचं त्याला माहीत..
इथे नाही अमीर खान चुकतोय नाही ती थोर मंडळी ज्यांना काही बाबतीत प्रत्यक्ष जीवनातले धागे-दोरे विणता येत नाही. आपण सुद्धा या धागे-दोऱ्यांच्या विश्वात गुंतलेलोच आहोत. म्हणून याला-त्याला नावे ठेवणं सोपं आहे.
खरा प्रश्न तर हा आत्मचिंतनाचाच आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

