Skip to content

अपमानाचा बदला घेण्यापेक्षा या सोप्या गोष्टी करून पहा!

अपमानाचा बदला घेण्यापेक्षा या सोप्या गोष्टी करून पहा!


सोनाली जे


अपमान ..प्रत्येकाला याचा सामना कधी ना कधी करावा लागतो च !! कधी आपली काही चूक नसताना , तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान ! आपला कोणी अपमान केला तरी शांत राहायचे. हा गांधीजी , आणि नेल्सन मंडेला यांनी आपल्याला शांती मंत्र दिला आहे.

तर आचार्य चाणक्य यांनी सांगितले की कोणी आपला अपमान केला तर पहिल्यांदा शांत राहणे तो तुमचा समजूतदारपणा झाला , परत दुसऱ्यांदा केला तेव्हा ही शांत राहणे म्हणजे तुम्ही महान आहात , आणि तिसऱ्यांदा कोणी अपमान केला आणि तरी तुम्ही शांत राहिले आहात तर तुम्ही मूर्ख आहात.

अर्थात प्रत्येकाच्या दृष्टीने त्यांनी त्यांची नीती मांडली आहे. आपल्याला वेळेनुसार आणि प्रसंगानुसार जे आचरण करणे सोपे जाईल तेच करावे.

अपमान कधी कोणाचे चुकीचे वर्तन , व्यवहार , बोलणे , वागणे यातून जाणवत असतो. मित्र मैत्रिणीकडून गोष्ट जमत नसेल म्हणून केला जातो, तर कधी आई वडिलांकडे सतत एखाद्या गोष्टींची मागणी करत राहिलो आणि ते जर चिडून म्हणले एव्हढे आहे तर स्वतः चे स्वतः कमव आणि घे..

पण यात आई वडिलांचा मुलांचा अपमान करण्याचा हेतू नसतो तर मुलांना परिस्थितीची जाणीव करून देणे असते , आणि एखादी गोष्ट घेण्याकरिता किती कष्ट करावे लागतात याची समज यावी हा हेतू असतो आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या मुलांच्या मध्ये motivation किंवा प्रेरणा निर्माण करणे हा हेतू असतो , परंतु मुलांना तुमचे तुम्ही कमवा असे म्हणले की तो अपमान वाटतो.

कधी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावरून , क्षमते वरून आपला अपमान करत असतात. एकतर्फी प्रेमात असेल किंवा प्रेमात पूर्णपणे दुसऱ्या व्यक्ती मध्ये involve झाल्यावर , मग शारीरिक दृष्ट्या असेल किंवा मानसिक दृष्ट्या गुंतून पडले असतील , जळी , स्थळी , काश्ठी , पाषाणी सर्वत्र आपलीच प्रेमाची व्यक्ती, खूप possesive झालों असू आणि समोरची व्यक्ती हे आपले प्रेम समजू शकत नसेल किंवा जरी ते प्रेम असेल तर ते मर्यादित , priority नुसार असेल तर , किंवा अगदी पुढे जावून त्या समोरच्या व्यक्तीने आधी जवळीक करून नंतर अंतर आणले.

कधी एकतर्फी प्रेमातून नकार हे अपमान पचवू न शकल्याने जी व्यक्ती खरेच खूप मनापासून गुंतलेली असते ती विचित्र , विक्षिप्त वागू लागते. कधी भांडणे , मारामाऱ्या तर नकार पचवू शकलो नाही म्हणून म्हणजेच अपमान झाल्यामुळे acid फेकणे यासारख्या विकृत गोष्टी घडत असतात. अर्थात एकतर्फी प्रेम असेल तर दुसऱ्या व्यक्तीची चूक नसताना तिला हे सहन करावे लागते .

तर दोघांकडून प्रेम असेल आणि त्यात ही एखादा जर जास्तच प्रेमाच्या आहारी गेला/ गेली असेल तर आपलीच व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही हा अपमानच वाटतो ..आणि मन दुखावत..सारखे सारखे असेच घडत गेले तर ती व्यक्ती विक्षिप्त वागू लागते. चूक कोणाची हा प्रश्न बाजूला राहतो कारण तसे बघितले तर दोघांची ही नाही.पण जो मानसिक दृष्ट्या कमकुवत , अपमान सहन करू शकत नाही तीच व्यक्ती विक्षिप्त ठरते.

आपला कोणी अपमान केला तर आपण चिडतो , त्याचा बदला घ्यावा ही वृत्ती निर्माण होते. ” Tit for Tat ” ” जसाश तसे ” असे वागण्याची इच्छा होते.

अपमानाचा बदला घेण्यापेक्षा या सोप्या गोष्टी करून पहा!

१. सोडून द्या.

तुमचा अपमान कोणी केला का केला या गोष्टीवर वाद घालून , वापली energy waste करण्यापेक्षा ती गोष्ट तिथेच सोडून द्या.

२. React करू नका :

कोणतीही परिस्थिती असो तेव्हा शांत राहायचे.. आपण चुकीचे असू किंवा नसू , त्याक्षणी काहीही सिद्ध करायला जावू नका. अपमान झाला म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे. पण शांत रहा..react करू नका.

३. Respond करा :

परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करा , काय झाले असे म्हणून समोरच्या व्यक्तीचा कंट्रोल गेला , अशी कोणती घटना घडली , काय चूक झाले किंवा आपले चूक नसेल तर कुठे गैरसमज झाले या गोष्टी विचारात घ्या. गरज असेल तर आपली चूक , परफॉर्मन्स , काम , अभ्यास , वर्तन , बोलणे , वागणे सुधारण्याचा प्रयत्न करा.

हा अपमान आपल्याला चुका दुरुस्त करण्याकरिता मिळालेली संधी आहे असे समजा.आणि चुका नसतील झाल्या तर समोरच्याचा गैरसमज दूर करण्याकरिता , त्याच्या वर्तन , बोलण्याचा अभ्यास करण्याची संधी समजा.

४. आपल्या स्वभावात / वागण्यात बदल करू नका : –

आपला स्वभाव आहे तसाच ठेवा इतरांच्या बोलण्याने किंवा वर्तनाने , झालेल्या अपमानामुळे आपले त्यांच्या सोबतचे वागणे आपला स्वभाव बदलू नका. त्याच्या विषयी मनात राग , द्वेष , चिडचिड , अगदी अलीकडच्या भाषेत खुन्नस ठेवू नका. त्याचे वागणे , बोलणे हा त्याचा स्वभाव आहे हे लक्षात घ्या. उलट अपमान करणारी व्यक्ती जर बोलत नसेल तर स्वतः पुढाकार घेवून बोला. ती ही शांत होईल.

५. संधी म्हणून बघा : –

काही वेळेस अपमान म्हणजे आपल्याला मिळालेली संधी म्हणून बघा. एखादी गोष्ट कमी असेल , चुकीची असेल तर ती सुधारणा करण्यासाठी मिळालेली संधी , प्रेरणा आणि motivation म्हणुन बघा.

६. अपमाना पेक्षा प्रगतीचा विचार करा : –

अपमान झालेल्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा विचार करू नका तर त्यातून स्वतः ची प्रगती कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करा. तसे प्रगतीचे मार्ग शोधा.

७. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींबरोबर चर्चा करा :

अपमान कोणी केला हे बाजूला ठेवा अनेकदा सामाजिक किंवा ऑफिस या ठिकाणी कोणी personal गोष्टी वरून अपमानित करत नाहीत ..कामाच्या स्वरूप , त्यातील उणिवा , चुका , किंवा स्पीड आणि ज्या पद्धतीने करावे हे अपेक्षित असेल तिथे चुकत असेल तर अपमान करतात.अशावेळी वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींबरोबर काम करण्याच्या पद्धती बद्दल चर्चा करा. त्यातून मार्ग काढा, त्यांचा guidance खूप बदल घडविण्याची शक्यता असते. मार्गदर्शन घेण्याकरिता लाज बाळगू नका किंवा कमीपणा ही नको.

८. अती भावनिक किंवा संवेदनशील होणे टाळा..

सगळेच भावनिक असतात असे नाही व्यवहारिक जगात त्यांच्या प्रमाणे व्यवहारिक असणे गरजेचे असते.

९. Deep breathe in ..breathe out करा. थोडक्यात breathing techniques वापरा.

१०. स्वतः ला नेहमी कशात तरी मग आपले आवडते छंद असतील, वाचन , व्यायाम असेल किंवा अगदी घरची आवराआवरी असेल त्यात गुंतवून ठेवा..बिझी राहिलात तर बाकी गोष्टींना जसे बदला घेणे किंवा त्यांच्यावर चिडणे यासारख्या गोष्टींना वेळ मिळणार नाही.

११ . मन आणि शरीर स्वास्थ्य राखण्याकरिता काही चांगले विचार जरूर ऐका..meditation करा..व्यायाम करा..

१२. नवीन शिकण्याचा ध्यास ठेवा.

१३. जे समोर आहे त्याचा स्वीकार करून त्यावर मात करून पुढे चालत रहा…

१४. जर वारंवार त्याच गोष्टीवरून अपमान झाला , आपली चूक नसेल तर आपली बाजू मांडून तुम्ही बरोबर आहात हे दाखवा. किंवा त्यानंतर ही तुम्ही केलेले नवीन बदल त्यांना दाखवा.नजरेस आणून द्या.

एकदा अपमान झाला म्हणजे ती नकारात्मक भावना आयुष्यभर मनात ठेवून तसे वागू नये. ही तात्पुरती गोष्ट होती असेच समजावे. त्या वेळेला , त्या परिस्थितीत समोरच्याने दिलेली ती प्रतिक्रिया होती एवढ्या सहज घ्या ती गोष्ट घ्या.

आयुष्य सुंदर आहे यशस्वीरीत्या पुढे जायचे असेल तर मनाचा मोठेपणा दाखवा. पक्षी हवेत उडण्याकरिता , भरारी घेण्याकरिता आपल्या पंखात ही तेवढी ताकद , शक्ती यावी लागते याची जसे काळजी घेतात आणि आधी छोटी छोटी भरारी घेतात. हवेत उंच वर भरारी घेण्याकरिता स्वतः ला तेवढे शक्तिशाली , सामर्थ्यवान बनवितात. तसेच आहे .

आयुष्यातले हे छोटे छोटे अपमान आपल्याला यशाच्या शिखरावर ( मग ते शैक्षणिक असेल , व्यवसायिक , आर्थिक , नोकरीत असेल किंवा नात्यामध्ये ) पोहचण्याकरिता आपल्यातल्या क्षमता वाढवीत असतात. आपल्याला मार्गदर्शन करतात.

आयुष्य सुंदर आहे , तात्पुरत्या गोष्टी मनाला लावून आयुष्य दुःखी करून घेवू नका. मिळालेली संधी म्हणून बघा. त्यातून मिळणारे यश आणि आनंद कायमस्वरूपी असेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अपमानाचा बदला घेण्यापेक्षा या सोप्या गोष्टी करून पहा!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!