Skip to content

अनावश्यक गरजा शारीरिक आणि मानसिक थकवा तयार करतात.

अनावश्यक गरजा शारीरिक आणि मानसिक थकवा तयार करतात.


आकांक्षा किरणराव आळणे,

लातूर.


‘गरज ही शोधाची जननी आहे.’ भावनिक गरज,शारीरिक गरज आणि आर्थिक गरज ह्या गरजांवर आपले आयुष्य अवलंबून असतं.
भावनिक गरज असते अपल्याला मुख्यतः प्रेमाची,आपुलकीची,आधाराची,कोणातरी आपल्याला समजून घ्यावे आपल्या भावनांची काळजी घ्यावी आपल्या मनाची काळजी घ्यावी असे सतत वाटत असते.ही भावनिक गरज पूर्ण करणं खूप महत्त्वाचे असते.

कुटुंब,मित्र-परिवार,life partner ही भावनिक पोकळी,भावनिक गरज पूर्ण करत असतात.एक तरी व्यक्ती असतेच तेवढी close जिच्या सोबत आपण मन मोकळं करतो,भावना व्यक्त करतो.भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी emotional quotient चांगला असणं खूप गरजेचे आहे.

शारीरिक गरज-‘गोष्ट छोटी आणि विषय मोठा…!!’ शारीरिक गरज म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नसून,आपल्याला कोणीतरी आपण जसे आहोत तसे accept करते ह्याचे ते validation असते.स्पर्शाद्वारे आपुलकी,आपलेपणा,हक्क व्यक्त करणे ह्या सर्व गोष्टी शारीरिक गरज ह्या संकल्पनेत समाविष्ट होतात.फक्त physical need म्हणून न बघता,आई-वडिलांची achievement नन्तर ची पाठीवरची शाबासकीची थाप,आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला हाथ ह्या स्पर्शाची ही मानवाला खूप ओढ असते;खूप गरज असते.

पण आजकालच्या पिढी ‘शारीरिक गरज’ ह्या विषयाला पराकोटीचे महत्व दिले आहे.भावनिक ओढ असो अथवा नसो शारीरिक गरज अधिकतम लोकांना फार महत्वाची वाटते.Ethics,Moral values ह्या सर्वांना डावलून फक्त शारीरिक गरज भागविण्यासाठी लोक सोयीस्कररित्या manipulate करत आहेत आणि होत आहेत.

आता काल-पर्वाच मी ‘तडप’ मूवी बघितला,RX-100 ह्या मूविचा तो remake आहे.स्टोरी खूप दमदार आणि तेवढीच हवाल-दिल करणारी.स्वतःच्या शारीरिक गरजेसाठी सिनेमातील heroine ने त्याला manipulate करून त्याचा वापर करून घेतलेला असतो.हिरो मात्र साधा सरळ आणि भोळा असतो खूप.

त्याला ते सर्व काही खरे वाटते तो तिच्या प्रेमात जवळपास पागल(obsessed) झालेला असतो.तिने तात्पुरती हवस मिटवण्याची युक्ती म्हणून त्याचा वापर केलेला असतो आणि शेवट होतो तो खूपच भयानक…!!!विचार करन्या पलीकडचे…!!!

ह्या गोष्टीमधून मला एवढेच सांगायचे आहे की,शारीरिक गरजेला का एवढे महत्त्व दिले जाते..??एक माणूस पूर्णपणे बरबाद होऊन गेला कारण तो सोयीस्कररित्या खेळावला गेला होता एक ‘हव्यासाचे खेळणे’ म्हणून…!!!

समोरची व्यक्ती त्या नात्याबद्दल serious नसेल तर जी व्यक्ती पूर्णपणे गुंतलेली,dedicated असेल त्या नात्यात,passionate असेल समोरच्याबद्दल तरी ती manipulate करणारी व्यक्ती आयुष्य किती बरबाद करू शकते ह्याची जाणीव त्या मूवी ने करून दिली.नात्यात गोष्टी clear असणं हा ही घटक महत्वाचेच आहे.

आजकाल तर शारीरिक गरज म्हणून लोकं relationship मध्ये राहतात फक्त,भावनिक आधार,काळजी,ह्याचा लवलेश ही त्यात दिसत नाही.असे लोक एक नन्तर दुसरं,दुसऱ्या नन्तर तिसरं प्रकरण ह्यात गुंतत जातात,addict होतात त्या गोष्टीसाठी,आणि गोष्टींचं,आयुष्याचा जो रस असतो,जी चव असते ते घालवून टाकतात.

प्रेम फुलनं त्यातून physical attachment होणे वेगळे.Mechanically फक्त शारीरिक गरजे पुरत जवळीक करणं वेगळं.कालांतराने ह्या गोष्टींना chase करून मानसिक आणि शारीरिक थकवा येतो सर्व गोष्टींबाबतीत.

ह्यात भर म्हणजे आर्थिक गरज.आज सगळे जण पैश्याच्या मागे धाव घेत आहेत.Over ambitious असणं तर जणू शाप आहे आजच्या काळात.फक्त ध्येयवेडे होऊन हाथ धुवून एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे आणि एकदा ती गोष्ट मिळाली की achievement चा टेंभा मिरवणे हेच generally चित्र समजात बघायला मिळते.

पण मित्रांनो ह्या सर्व गोष्टी खरच एवढ्या मह्त्वाच्या आहेत का.?intimacy ची उत्कट हाव,company मध्ये heavy package ची हाव,सतत आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी खटाटोप करत राहणे खरच आहे का एवढे गरजेचे..??की आपण चुकतोय कुठेतरी..??काही अनावश्यक गोष्टींना महत्त्व देऊन..??

कारण हे सर्व chase करताना आपण बघू शकतो की मानसिक स्थैर्य किती ढासळत चालले आहे;प्रामुख्याने तरुण पिढीचे.नुसती चढा-ओढ,नुसते स्वतःला प्रत्येक बाबतीत superior proove करण्यातच आज ची पिढी व्यस्त आहे.Social media वर सुध्दा किती ती स्पर्धा आहे photos ची,destinations ची.अमुक-अमुक ह्याने केरळ चे फोटो पोस्ट केलेत का,ठीक आहे मग मी गोवा चे photos पोस्ट करतो आणि मी किती भारी आहे त्याच्यापेक्षा हे सिद्ध करेन इथपर्यंत तरुण पिढी वेडी झाली आहे,competitive झाली आहे आणि अश्या अवाजवी उडण्याला हवा मिळाली नाहीतर हे लोक चक्क depression मध्ये जातात बर का..!!

म्हणजे मुळात ह्यांचा self esteem इतका low असतो की त्यांना समाजाकडून acceptance,validation नाही मिळाले तर हे स्वतःचे स्वत्व गमावून बसतात.खरच मनाने किती कमकुवत म्हणावे अश्या लोकांना.Self worth ही गोष्ट काही असते की नाही..??स्वतःचे मानसिक स्थैर्य ढासळेपर्यंत तुम्ही इतरांचे मत स्वतःवर लादून घेता..??खरच गरज आहे का ह्या सर्व गोष्टींची..??

होणार ती-suffering,घुसमट आणि मनाची घालमेल.Choice Is Yours.एक साधं-सरळ ethically correct आयुष्य जगायचं की लोकांना खूष करण्यासाठी आणि स्वतःच्या अवाजवी गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्य जगायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.
‘Simplicity never goes out of style’ हे खरे आहे फॅशन बाबतीत पण आणि आयुष्य जगताना ही..!!!

‘Simply-keep things simple.’


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!