अद्याप मिळाल नाही असे मिळवायचे असल्यास अद्याप केल नाही अशा गोष्टी करून बघा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात काही ना काही मिळवायचं असतं, achieve करायचं असतं. मला पूर्णपणे सर्व मिळाल असं कोणी कधी म्हणत नाही. अजून काहीतरी आहे जे मला मिळालेल नाही, मी मिळवणार. उदाहरणार्थ, चांगले गुण आहेत परंतु आदर्श विद्यार्थी पद मला मिळालेल नाही जे मला मिळवायचे आहे, बिझनेस सुरू केला आहे परंतु त्याला अपेक्षित उंची, स्थिरता मिळालेली नाही ती मिळवायची आहे, स्पर्धेत नंबर मिळणे असू दे किंवा एखाद्या गोष्टीच कौशल्य शिकणं असू दे. अशा अनेक गोष्टी असतात ज्या माणसाला अजून मिळालेल्या नसतात पण ते मिळवण्याची इच्छा मात्र असते. कारण माणूस जन्मतः कोणत्याही गोष्टी सोबत घेऊन आलेला नाही.
पण फक्त मला आतापर्यंत जे काही मिळालं नाही, ते मिळवायचे आहे असं म्हणून काही मिळत नसतं. कारण आयुष्य हे शेखचिल्लीच्या स्वप्नासारखं सोपं नसत. बरेचदा आपण गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतो पण त्या काही केल्या मिळत नाहीत याचं कारण म्हणजे आपण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने काम केलेली असतात जे काम मिळवलेलं असतं त्याच पद्धतीने नवीन गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतो.
ही नवीन गोष्ट मिळवण्यासाठी जे काही आपल्या मध्ये अपेक्षित बदल करणे गरजेचे आहे ते मात्र आपण करत नाही. उदाहरणार्थ, जर वार्षिक परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहे ते अद्याप मिळालेले नाहीत, त्यासाठी चाचणी परीक्षेच्या स्वरुपाचा अभ्यास केला तर मला तसे मार्क मिळतील का? तशी तयारी केली त्याच पद्धती वापरल्या तर मला हवे ते यश मिळेल का? नाही मिळणार कारण जी गोष्ट मिळवणार आहोत त्याच स्वरूप नवीन असत, त्यासाठी आपल्याला तसे बदल करावे लागतात, तशी मनाची तयारी करावी लागते. तर अपेक्षित गोष्ट मिळू शकते. कोणत्या गोष्टी करायच्या? तर त्या पुढीलप्रमाणे,
१. नीट प्लॅनिंग करणे: कोणतीही गोष्ट मिळवायचे असेल तर त्यासाठी नीट डिटेल प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं व आवश्यक आहे. बरेचदा आपण ठरवतो पण त्या गोष्टी होत नाहीत कारण तिथे नीट प्लॅनिंग केलेलं नसत. त्यातून निराशा येण्याची शक्यता असते. म्हणून जे काही मिळवायच आहे त्याचे डिटेल प्लॅनिंग आवश्यक आहे. या गोष्टीच स्वरूप, त्यासाठी लागणारे साहित्य, वेळ इत्यादी गोष्टी आधीपासून नियोजित करायला लागतात.
२. स्वतः बद्दल जागरूक असणे: कोणतीही गोष्ट मिळवताना सर्वात आधी स्वतः बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. स्वतःचे analysis करणे गरजेचं आहे. Self analysis मधून माझे गुण-अवगुण, क्षमता, कमतरता त्यातून मला मिळणाऱ्या संधी आणि उद्भवणारे धोके याबद्दल जागरूकता निर्माण होते आणि याचा आपल्याला नवीन गोष्ट मिळवताना फायदा होतो. कारण जेवढी आपल्याला स्वतःची जास्त माहिती असेल तेवढी आपण ती गोष्ट मिळवताना शारीरिक व मानसिक तयारी करणार. त्या दृष्टीने मेहनत करणार.
३. धोका पत्करायला शिका: नवीन गोष्ट करताना शिकताना अडथळे अडचणी धोके निर्माण होतात. अशावेळी आपली ते धोका पत्करायची तयारी असली पाहिजे. परिस्थितीपासून तर धोक्यापासून पळून न जाता त्यातून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल यासाठी आपली मानसिक आणि शारीरिक तयारी असणे गरजेचे आहे. तर आपण ती गोष्ट मिळवू शकतो.
४. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे: बरेचदा नवीन काही करताना आपली सुरुवात मला हे जमेल का नाही, मला अपेक्षित गोष्ट मिळाली नाही तर अशा विचारांनी होते. त्यामुळे ती गोष्ट करण्याचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. म्हणून कधी काही करायचं झाल्यास चुकीच्या, नकारात्मक विचारांनी सुरुवात न करता, आरोग्यदायी सकारात्मक विचारांनी जसे की मला माझे गुण-अवगुण क्षमता माहीत आहेत, जर मी प्रयत्न केले, योग्य ते नियोजन केले तर मला ही गोष्ट नक्की मिळेल अशा विचारांनी प्रेरित करा.
अशा प्रकारे स्वतःमध्ये आवश्यक बदल जे अजूनपर्यंत केले नसतील तर करून पाहा, प्रयत्न करा तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्यासाठी तुमचा मार्ग सुकर होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
