अतिशय सुंदर स्वयंपाक करणारी गृहणी घरात राहून ही उत्तम व्यवसाय करू शकते.
संयोगिता महाजन
नोकरी करणारी प्रिया सगळ्यांना हवं नको पाहायची..सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्यात तिला खूप आनंद वाटायचा. मटण खावं तर प्रिया वहिनीच्या हातचं …..ओहो अळूच्या वड्या …वाव काय खमंग केल्यात…बेस्ट ह…तुझ्या बायकोच्या हाताला चव आहे हं…जरा आम्हाला ही शिकव म्हणावं तिला..! नितेशला ऑफिस मध्ये अशा अनेक कॉम्प्लिमेंट्स मिळायच्या. प्रियाही सगळं एंजॉय करायची.
पण बघता बघता सगळं बदललं., कोरोनाच्या संकटामूळे प्रियाचा चांगला जॉब गेला.नितेश चा पगार कपात होऊन हाती पडू लागला.रोजचा ताळमेळ लावणे कठीण झाले.चिडचिडेपणा, अस्वस्थता,जॉब मिळणार की नाही याची दोलनामय अवस्था… आणि खर्च तर कमी नाहीच उलट जास्तच वाढलेले.. ! काय करावं ते सुचत नव्हतें.
प्रियाने शांत विचार करून मार्ग काढायला सुरुवात केली.तिने आपले आतापर्यंत झालेलं शिक्षण त्याची सर्टिफिकेट पाहत असताना डोळ्यात एक वेगळी चमक दिसली.डायटीशिएन चा कोर्स पूर्ण झालेला.त्यात हाताला फक्कड चव..एक नंबरची सुगरण.मग काय कोरोना पेंशट,त्यांचे घरचे,आणि इतरांना ही उपयोगी होईल असे हेल्दी डायट प्लॅन पॅकेज तयार केले.अन त्याची ऍड fb, इन्स्टा, व्हाट्सएपच्या माध्यमातून सगळीकडे चिपकवली.. बघता बघता चौकशीच्या पावसाची रिपरिप ऑर्डर मध्ये बदलली अन तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.आज ती अनेक सोशल ग्रुपवरून ऑर्डर घेते.झोमॅटो, स्वीगी वर तिचे पदार्थ हायरेटिंगवर दिसतात.
ही प्रिया दुसरी तिसरी कोण नाही…अशा अनेक प्रिया ताठ मानेने घरात राहूनच सुग्रास पदार्थांचा बिझनेस करताना दिसतात. कसलाही थाटमाट न करता हं. माझी गुजराती मैत्रीण नेरिशा अळूवडी,सुरळी वडी,बडीशेप,ओंदनवु,असे अनेक पदार्थ घरातूनच पार्सल करते…क्वालिटी जबऱ्या….👍तोबा वेटिंग..मग आहे कनई गंमत…!
प्रतीकच्या आई रोज व्हाट्सएपच्या स्टेटस ला आज अप्पे चटणी मिळेल, दम बिर्याणी मिळेल…..असे चिपकवतात तोपर्यंत ऑर्डर फुल्ल….वहिनी,लिज्जत, यळगुड,वारणा हे इथले ब्रँड घरातुन काम करून महिलांनी मोठे केले.कोल्हापूरमध्ये स्वयंसिद्धा महिलांना अफलातून व्यासपीठ उपलब्ध केलं आहे.उकडीचे मोदक ते पुरण पोळी पर्यंत घरगुती पदार्थांची रेलचेल अन त्यावर उडया ही तितक्याच..!फक्त चव असेल ना आपोआपच ब्रँडिंग होतच होत…..👍!!
पण अजूनही खूप जणींच्या हातात जादुई चव असून ही काय करू???कामच नाही..???मस्त चांगलं येत करायला पण मार्केटिंग कसे करू?????नाहीच खपल तर अंगावर पडेल मग???😢असे अनेक प्रश्न डोक्यात भुंग्यासारखे डोकं पोखरून काढतात पण उत्तरे मिळत नाही.?????
अशी कशी उत्तरे मिळतील सहजच ओ..????
त्यासाठी हवं ना स्वतःच्या पंखात बळ….आणि नसले तरी ते निर्माण करण्याची आतून अगदी आतून असलेली प्रबळ इच्छाशक्ती…!!!!!!कामातील बारकावे….निरीक्षण शक्ती चांगली हवीआणि मुळात तोंड गोड असावे लागते.फटकळ, अहंकारी नको हं..!आपल्या बोलण्या चालण्यातुन चार ओळखी अन त्यांच्या तोंडातून पुढे चार कस्टमर वाढतात हे आपल्या लक्षात सतत असावं लागतं.तुम्ही करता खूप भारी ओ… .👌 पण ते लोकांपर्यत पोहोचवयाला स्किल वापरतच नाही.😢
जितकं हार्ड तितकं फास्ट आणि त्यापेक्षाही अधिक व्यवसायात स्मार्ट असावं लागतं.आधीसारखे घरोघरी जाऊन काही करायची गरजच नाही.आज स्टेटस पासून सोशल साइटवर सहज कमीतकमी खर्चात जाहिराती होतात.सोशल मीडियाचा योग्य वापर,पॅकिंग उत्तम प्रकारे,स्वच्छताप्रिय,लोकांच्या आवडीनिवडी ओळखून त्या पदार्थांत नाविन्यपूर्णता आणणे हे एका खऱ्या सुगरणीला नक्कीच जमेल.
हे सगळं स्टार्टअप करायला मोठं हॉटेल असायला हवं वा रेस्टोच हवं असे नाही …एकदा चव आवडली की तुमच्या त्याच पदार्थांची रेस्टो चेन वाढायला ही वेळ नाही लागणार….जेव्हा ही मोठी स्वप्नं बघू ना ,तेव्हा मग उत्तम स्वयंपाक करणारी सुगरण खाद्यसंस्कृती वाढवायला नक्किच प्रयत्न करेल.
उत्तम प्रकारे स्वयंपाक करणारी स्त्री काय काय करून अर्थार्जन करू शकेल???गरम डबे ,कोरडे खाऊ, नाश्ता, पापड लोणची इ. पारंपरिक त्याचबरोबर रेसिपीज लिहिण्याची कला असेल तर ब्लॉग लिहू शकते, रेसिपीज बुक,कुकिंगचे क्लासेस, वर्कशॉप, You tube चॅनेल ,fb चे पेज असे अनेक पर्याय ती उपलब्ध करू शकते.पण त्यासाठी हवे…कुछ कर दिखाने की हिम्मत….!!!
हम भी कुछ कम नहीं…. म्हणत स्वतःच्या पंखावर आभाळ पेलायला ती स्वतः तयार हवी.मुळात स्वतःला हटके काहीतरी बेस्ट करून दाखवायची मनात ऊर्मी हवी.म्हणजे उत्कृष्ट स्वयंपाक येणारी आर्ट ही वेस्ट न जाता टेस्टीला बेस्ट असेल..फक्त आपला ब्रँड आपणच व्हायला शिकलं पाहिजे.!!!👍
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Shabdrachana sundar …
खूप सुंदर…अगदी खरंय..!! वाचनीय लेख, छान शब्दबंध आणि प्रेरणादायी मांडणी..!
Khupch chhan
खूप सुंदर लेख…👌👌❤️