Skip to content

अतिविचार टाळण्यासाठी १० प्रभावी उपाय!!

अतिविचार टाळण्यासाठी १० प्रभावी उपाय!!


सोनाली जे.


जेव्हा एखाद्या गोष्टी चा, एखाद्या घडून गेलेल्या भूतकालीन घटनेचा किंवा पुढे काय घडेल या भविष्यकालीन घटनेचा किंवा एखादी व्यक्ती यांचा आपण सतत विचार करत असतो ..आणि त्याच सततच्या विचारांचे रूपांतर अतिविचारत होते..

हे अतिविचार टाळण्यासाठी चे दहा प्रभावी उपाय बघुयात .

१. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करू नये.. कारण भूतकाळात घडून गेलेली घटना आपण बदलू तरी शकत नाही…त्यामुळे तेव्हा असे झाले असे घडले हे विचार करून तुम्ही तुमचं वर्तमान आणि भविष्यकाळ ही बिघडवित असता..त्यामुळे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करू नये..

२. वर्तमानात जगा..भविष्यकाळाचा ही विचार करू नये…जसे भूतकाळाचा विचार करून झालेल्या घटना बदलू शकत नाही तसे भविष्यकाळाचा ही सतत विचार करू नये…कारण भविष्यकाळात असे होईल तसे होईल हे सगळे तर्क असतात..आणि तेव्हा काय घडेल ते वेगळेच…पण त्यामुळे आजचा वर्तमान तेवढा आपण बिघडवून टाकतो म्हणून कायम वर्तमानात जगा.

३. आवडते छंद जपा… कोणत्या तरी गोष्टींचे विचार करत बसण्यापेक्षा आपल्या वेळेचा सदुपयोग करून घ्या ..आवडत्या गोष्टी मध्ये..छंद जोपसण्यासाठी वेळ घालविला तर मनात बाकी विचार येणार नाहीत आणि अर्थात असे विचार करत बसण्यकरिता वेळच मिळणार नाही.

४. ध्यान धारणा..योगासन..प्राणायाम करा.. मेडिटेशन करा..चंचल मन स्थिर होण्याकरिता ध्यान धारणा..प्राणायाम करा..योगासन प्राणायाम करा..यातून एकाग्रता ही वाढेल…आणि वैचारिक स्थैर्य ही लाभेल.

५. मैदानी खेळ..किंवा बैठे खेळ… जीम…भरपूर श्रमाचे मैदानी खेळ खेळा ज्यातून इतकी शारीरिक दमणूक होईल की विचार करण्यास ही वेळ मिळणार नाही .त्याप्रमाणेच बैठे बुध्दीचे खेळ खेळा जसे की बुद्धिबळ..

६. आत्मपरीक्षण करा…एखाद्या गोष्टीत किंवा परिस्थिती मध्ये आपण कसे वागलो किंवा कसे वागतो..ती परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल याचे चिंतन करा..आत्मपरीक्षण करा.

७. Don’t expect and accept….
काही वेळेस आपण जी अपेक्षा ठेवतो तसे घडत नसते आणि ते तसे घडले नाही म्हणून आपण त्यावर विचार करत बसतो त्यापेक्षा अपेक्षा करू नका आणि जे वास्तव आहे त्याचा स्वीकार करा.

८. लोकांचा विचार करू नका…आपल्या बाबत कोणते ही निर्णय घेताना , विचार करताना आपल्याला काय उचित वाटते याच गोष्टींचा विचार करा बाकी लोक काय म्हणतील , किंवा त्यांना काय वाटेल याचे अतीविचार करू नका..

९. प्रोब्लेम चा जास्त विचार करू नका तो सोडविण्याचा solve करण्याचा प्रयत्न करा ..जसे की एखादी समस्या निर्माण झाली ..मला इंटरव्ह्यू ला जायचे आहे पण माझ्याकडे गाडी नाही म्हणून मी जाणार नाही यापेक्षा मी कसे जाणार वेळेत..त्याकरिता बाकी वाहने उपलब्ध आहेत का यांची माहिती घ्या..किती वेळ आधी निघाले तर पोहचू शकेन याचे calculation करा..प्रोब्लेम चे solution. शोधण्या ऐवजी आपण नेहमी प्रोब्लेम किती मोठा आणि कसा याचकडे लक्ष देत असतो..त्याऐवजी समस्या निराकरण करण्यावर भर द्या..

१०. निर्णय वेळेत घ्या…एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना अधिक विचाराने मन चलबिचल होते..आणि अजून जास्त मनाची चंचलता वाढते.त्यामुळे पटापट निर्णय घेण्याची सवय लावून घ्या.

अनेकदा आपण त्याच त्याच गोष्टी मनात धरून बसतो..त्याच त्याच गोष्टींवर चर्चा करतो.सततचा विचार करतो त्यापेक्षा वेळीच गोष्टी सोडून द्या..let go… आणि त्यामुळे विचार ही जातील आणि नवीन गोष्टींचा ध्यास ही वाढेल..



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!